Rohit Sharma ला कॅप्टनशिपवरुन हटवल्यानंतर एका खेळाडूच्या करिअरची होऊ शकते दुर्दशा

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, रोहित शर्माचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर एका खेळाडूच करिअर सुद्धा संपू शकतं. महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाच्या कॅप्टनशिपवरुन पायउतार झाल्यानंतर सुरेश रैनाच आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं.

Rohit Sharma ला कॅप्टनशिपवरुन हटवल्यानंतर एका खेळाडूच्या करिअरची होऊ शकते दुर्दशा
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 18, 2023 | 7:38 AM

Rohit Sharma: टीम इंडियात आता रोहित शर्माच्या कॅप्टनशिपचा काही काळ शिल्लक आहे. रोहितच्या कॅप्टनशिपचे काही महिने शिल्लक राहिलेत, असं म्हणायला हरकत नाही. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात वनडे वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्यानंतर रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा प्रवास थांबण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्मा आता 35 वर्षांचा आहे. आता T20 मध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली दोघांच्या नावाचा विचार होत नाही. पुढच्यावर्षीपर्यंत वनडेमध्येही रोहितबाबत हेच निकष लावले जाऊ शकतात. रोहितनंतर हार्दिक पंड्या आणि श्रेयस अय्यर हे दोन प्लेयर कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार आहेत.

रोहितची कॅप्टनशिप गेल्यास एका प्लेयरला फटका

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, रोहित शर्माचा कर्णधारपदाचा कार्यकाळ संपुष्टात आल्यानंतर एका खेळाडूच करिअर सुद्धा संपू शकतं. महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाच्या कॅप्टनशिपवरुन पायउतार झाल्यानंतर सुरेश रैनाच आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं, हे सुद्धा तसच असेल. रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2023 चा वनडे वर्ल्ड कप जिंकला नाही, तर त्याला वनडे कॅप्टनशिपवरुन हटवलं जाऊ शकतं. रोहितच्या कॅप्टनशिपवरुन दूर होण्याचा टीम इंडियातील एका प्लेयरला फटका बसू शकतो.

हे सुद्धा वाचा

त्याला संधी देण्यासाठी रोहित-द्रविड जोडीज हे पाऊल

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केएल राहुलला टीम इंडियात जितकी संधी मिळालीय, कदाचितच तितकी संधी दुसऱ्या एखाद्या प्लेयरला मिळाली असेल. टी 20 आणि टेस्टमध्ये साधारण कामगिरी करुनही रोहित शर्माने केएल राहुलला भरपूर संधी दिलीय. वनडे क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून केएल राहुलची कामगिरी ढासळत होती, तेव्हा कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी त्याला नंबर 5 वर खेळण्याची संधी दिली. त्याशिवाय द्रविड आणि रोहित जोडीने राहुलकडे विकेटकिपिंगची अतिरिक्त जबाबदारी दिली. जेणेकरुन प्लेइंग इलेव्हनमध्ये त्याला जास्तीत जास्त संधी मिळेल. टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद होतील

मागच्यावर्षीपासून केएल राहुलच्या कामगिरीत सातत्य नाहीय. तो खराब प्रदर्शन करतोय, तरीही अजून टीम इंडियात स्थान टिकवून आहे. केएल राहुल 2022 टी 20 वर्ल्ड कपमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला. केएल राहुलने संपूर्ण वर्ल्ड कप स्पर्धेत 4, 9, 9, 50, 51 आणि 5 धावा केल्या. 2022 T20 वर्ल्ड कपमध्ये फ्लॉप ठरल्यानंतर केएल राहुलला टी 20 टीममधून ड्रॉप केलं. फक्त विश्रांतीच नाव दिलं. यावर्षी भारतात होणाऱ्या 2023 वर्ल्ड कपमध्ये केएल राहुल असाच फ्लॉप ठरला, तर टीम इंडियाचे दरवाजे त्याच्यासाठी कायमचे बंद होऊ शकतात. इशान किशन, संजू सॅमसन हे आक्रमक बॅट्समन संधीच्याच प्रतिक्षेत आहेत.

Non Stop LIVE Update
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा सुपर संडे; कुठे, कोणाच्या सभांचा धडका?.
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस
अमरावती मतदारसंघात नवनीत राणांसह 'या' दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस.