AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कर्णधार Shubman Gill याचा डबल धमाका, इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक Double Century

Shubman Gill Doubel Hundred : शुबमन गिल इंग्लंड विरुद्ध कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. शुबमनआधी कोणत्याच भारतीय कर्णधारा अशी कामगिरी करता आली नव्हती.

कर्णधार Shubman Gill याचा डबल धमाका, इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक Double Century
Shubman Gill Double HundredImage Credit source: Bcci x Account
| Updated on: Jul 03, 2025 | 8:33 PM
Share

भारतीय कसोटी संघाचा कर्णधार शुबमन गिल याने इंग्लंडच्या भूमीत इतिहास घडवला आहे. शुबमनने कर्णधार म्हणून आपल्या दुसऱ्याच कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध ऐतिहासिक द्विशतक ठोकलं आहे. शुबमनच्या कसोटी कारकीर्दीतील हे पहिलंवहिलं द्विशतक ठरलं आहे. शुबमनने या द्विशतकी खेळीसह अंसख्य विक्रम आपल्या नावावर केले आहेत. शुबमनला या मालिकेआधी रोहित शर्मा याच्या कसोटी क्रिकेटमधील निवृत्तीनंतर कर्णधार करण्यात आलं होतं. शुबमनने लीड्समध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात शतक केलं होतं.

दुसरा सामना,दुसरा दिवस आणि द्विशतक

शुबमनने बर्मिंगहॅममधील एजबेस्टन मैदानात इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटीतील दुसर्‍या दिवशी हे द्विशतक पूर्ण केलं. शुबमनने 122 व्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर एकेरी धाव घेत 200 धावा पूर्ण केल्या. शुबमनने द्विशतकासाठी 311 चेंडूचा सामना केला. शुबमनने 21 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने हे द्विशतक पूर्ण केलं.

पहिला आशियाई कर्णधार

शुबमन यासह इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. इंग्लंडमध्ये आतापर्यंत कोणत्याही आशियाई कर्णधाराला कसोटीत द्विशतक करता आलं नव्हतं. इंग्लंडमध्ये याआधी भारताकडून कर्णधार म्हणून मोहम्मद अझहरुद्दीन यांनी 179 धावा केल्या होत्या. अझहरुद्दीन यांनी 1990 साली मँचेस्टरमध्ये 179 धावा केल्या होत्या. तर आशियाई कर्णधार म्हणून इंग्लंडमध्ये सर्वाधिक 193 धावांचा विक्रम हा श्रीलंकेचा माजी कर्णधार तिलकरत्ने दिलशान याच्या नावावर होता. दिलशानने 2011 साली लॉर्ड्समध्ये ही कामगिरी केली होती.

कॅप्टन शुबमनचा डबल धमाका

शुबमन तिसरा भारतीय

शुबमनने या द्विशतकासह मानाच्या यादीत स्थान मिळवलं आहे. शुबमन इंग्लंडमध्ये द्विशतक करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. शुबमनआधी भारतासाठी दिग्गज राहुल द्रविड आणि सुनील गावसकर या दोघांनीच अशी कामगिरी केली होती.

गावसकर यांनी 1979 साली 221 धावा केल्या होत्या. त्यानंतर राहुल द्रविड याने 23 वर्षांनंतर 2002 साली ओव्हलमध्ये 217 धावांची खेळी केली. तर आता 23 वर्षांनंतर शुबमनने ही कामगिरी केली.

रवींद्र जडेजासह द्विशतकी भागादीरी

दरम्यान शुबमनने वैयक्तिक द्विशतकाआधी ऑलराउंडर रवींद्र जडेजा याच्यासह सहाव्या विकेटसाठी द्विशतकी भागीदारी केली. शुबमन आणि जडेजा या जोडीने सहाव्या विकेटसाठी 203 धावा जोडल्या. या जोडीने द्विशतकी भागीदारी करत भारतीय संघाला मजबूत स्थितीत पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. आता या संधीचा इतर फलंदाज कसा आणि किती फायदा घेतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.