AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : टीम इंडिया 20 वर्षांनी पुन्हा 107 धावांचा बचाव करणार? 2004 साली मुंबई कसोटीत काय झालेलं?

India vs New Zealand 1st Test : न्यूझीलंडला टीम इंडिया विरुद्ध पहिल्या कसोटीत विजयासाठी पाचव्या आणि अंतिम दिवसी 107 धावांची गरज आहे. मात्र टीम इंडियाने 20 वर्षांआधी केलेला कारनामा पाहता रोहितसेना हा सामना जिंकू शकते. जाणून घ्या 20 वर्षांपूर्वी काय झालेलं?

IND vs NZ : टीम इंडिया 20 वर्षांनी पुन्हा 107 धावांचा बचाव करणार? 2004 साली मुंबई कसोटीत काय झालेलं?
team india playing 11 rohit sharmaImage Credit source: bcci
| Updated on: Oct 19, 2024 | 6:47 PM
Share

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील पहिला कसोटी सामना हा अखेरच्या टप्प्यात आहे. उभयसंघातील सामन्यातील पहिला दिवस हा पावसामुळे वाया गेला. मात्र 3 दिवसांनंतर सामन्याचा निकाल लागणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. न्यूझीलंडने यजमान संघाला 46 धावांवर ऑलआऊट केल्यांनतर पहिल्या डावात 402 धावा केल्या. त्यामुळे न्यूझीलंडला 356 धावांची मोठी आघाडी मिळाली. मात्र टीम इंडियाने दुसऱ्या डावात जोरदार मुसंडी मारत न्यूझीलंडला चोख प्रत्युत्तर दिलं. टीम इंडियाने तिसऱ्या दिवसापर्यंत फक्त 3 विकेट्सच गमावल्या होत्या. मात्र चौथ्या दिवशी दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी झाली आणि डाव 462 वर आटोपला. टीम इंडियाने 106 ची आघाडी घेतल्याने न्यूझीलंडला 107 धावांचं आव्हान मिळालं. न्यूझीलंडसाठी हे आव्हान सोपं असलं तरी टीम इंडियाने 20 वर्षांपूर्वी 107 धावांचा यशस्वी बचाव करत सामना जिंकला होता. त्यामुळे टीम इंडिया पु्न्हा एकदा 2004 च्या घटनेची पुनरावृत्ती करणार का? याकडे साऱ्याचं लक्ष असणार आहे.

टीम इंडियाने 20 वर्षांपूर्वी काय केलेलं?

टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्ध 2004 साली 107 धावांचा यशस्वी बचाव करत 13 धावांनी विजय मिळवला होता. भारताने नाणेफेक जिंकत पहिल्या डावात 104 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने प्रत्युत्तरात 203 धावा करत टीम इंडिया विरुद्ध 99 धावांची आघाडी घेतली. टीम इंडियाने या प्रत्युत्तरात 205 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 107 धावांचं आव्हान मिळालं. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला 93 वर गुंडाळून विजय मिळवला. या दुसऱ्या डावात टीम इंडियाकडून तेव्हा हरभजन सिंह याने सर्वाधिक 5 विकेट्स घेतलेल्या. तर मुरली कार्तिकने तिघांना बाद केलं होतं. तसेच झहीर खान आणि अनिल कुंबळे या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

गंभीर ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार

टीम इंडियाने हा सामना जिंकलेला तेव्हा विद्यमान मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर विजयाचा साक्षीदार होता. गंभीरने त्याच सामन्यातून पदार्पण केलं होतं. तर आता गंभीर कोच आहे.अशात आता टीम इंडियाने पुन्हा एकदा असा कारनामा केल्यास गंभीर 20 वर्षांनी सलग दुसऱ्यांदा साक्षीदार होईल. आता टीम इंडियाचे गोलंदाज पाचव्या आणि शेवटच्या दिवशी कशी कामगिरी करतात? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.

रोहितसेना 20 वर्षांनी पुन्हा कारनामा करणार?

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, सर्फराज खान, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचीन रवींद्र, डॅरिल मिचेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मॅट हेन्री, टीम साउथी, एजाझ पटेल आणि विल्यम ओरूर्के.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.