Rahul Dravid : टीम इंडियापासून दूर झाल्यानंतर राहुल द्रविड आता ‘या’ टीमचे बनू शकतात हेड कोच
Rahul Dravid : राहुल द्रविड यांचा टीम इंडियाचे हेड कोच म्हणून कार्यकाळ संपला आहे. आता त्यांचा पुढचा रोल काय असणार? या विषयी उत्सुक्ता आहे. लवकरच या बाबत घोषणा होऊ शकते. राहुल द्रविड लवकरच एका टीमचे हेड कोच बनू शकतात.

राहुल द्रविड यांच्याबाबत एक मोठी बातमी समोर आलीय. ही न्यूज त्यांच्या नव्या रोल संदर्भात आहे. टीम इंडियासोबत कार्यकाळ संपल्यानंतर राहुल द्रविड यांचं एक वक्तव्य चर्चेत होतं. मी आता बरोजगार आहे, नवीन जॉब पाहिजे असं ते म्हणालेले. त्यानंतर राहुल द्रविड यांच्या बाबतीत वेगवेगळे अंदाज लावले जात होते. ते आयपीएलमध्ये केकेआर फ्रेंचायचीसोबत जाऊ शकतात असं बोललं जात होतं. पण आता समोर आलेल्या बातमीमुळे या चर्चांना पूर्णविराम मिळू शकतो. राहुल द्रविड IPL मध्ये राजस्थान रॉयल्सचे हेड कोच बनू शकतात.
T20 वर्ल्ड कप 2024 पर्यंत राहुल द्रविड यांचा टीम इंडियासोबत कॉन्ट्रॅक्ट होता. रिपोर्ट्नुसार राहुल द्रविड आयपीएल 2025 मध्ये राजस्थान रॉयल्सचे हेड कोच असतील. त्या संदर्भात अधिकृत घोषण लवकरच होईल. राहुल द्रविड आणि राजस्थान रॉयल्समध्ये चर्चा सुरु असल्याच वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने सूत्रांच्या हवाल्याने दिलं आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा लवकरच होईल.
राहुल द्रविड यांच्या कॅप्टनशिपखाली किती सामने जिंकले?
राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचा भाग असण्याची पहिली वेळ नाहीय. याआधी ते राजस्थान रॉयल्सचे कॅप्टन होते. राजस्थान रॉयल्सचे ते दुसरे कॅप्टन होते. राहुल द्रविड यांना राजस्थान रॉयल्सने 2012 साली कॅप्टन बनवलं होतं. 40 सामन्यात द्रविडने राजस्थानच नेतृत्व केलं. यात 23 मॅच राजस्थानने जिंकल्या. कॅप्टनशिप सोडल्यानंतर द्रविड 2014-15 मध्ये राजस्थान टीमचा मेंटॉर बनले. द्रविड टीम इंडियाच्या अंडर-19 संघाचे आणि A टीमचे कोच होते.
कोच म्हणून परफॉर्मन्स कसा?
द्रविड यांच्या कोचिंगखाली 2018 साली अंडर 19 टीम वर्ल्ड चॅम्पियन बनली. त्यानंतर बंगळुरु येथील नॅशनल क्रिकेट अकादमीत ते क्रिकेट ऑपरेशनचे हेड बनले. 2021 साली ते टीम इंडियाचे हेड कोच झाले. त्यांनी रवी शास्त्री यांची जागा घेतली. टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर त्यांचा हेड कोच पदाचा कार्यकाळ संपला. आता राजस्थान रॉयल्स टीमलाही त्यांच्याकडून अशाच अपेक्षा आहेत. 2008 नंतर दुसऱ्यांदा आयपीएल किताब जिंकण्याची प्रतिक्षा आहे.
