AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India T20 World Cup: एकदा विनर, दुसऱ्यांदा रनरअप, तिसऱ्यांदा Final मध्ये काय होणार?

Indian Cricket Team T20 World Cup 2024: टीम इंडियाची आयसीसी टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी वेळ ठरली आहे. टीम इंडियाने एकदा वर्ल्ड कप जिंकलाय तर एकदा उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं आहे.

Team India T20 World Cup: एकदा विनर, दुसऱ्यांदा रनरअप, तिसऱ्यांदा Final मध्ये काय होणार?
team india national anthem
| Updated on: Jun 29, 2024 | 6:45 PM
Share

टीम इंडिया 10 वर्षानंतर पुन्हा एकदा आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील अंतिम फेरीत खेळण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडियाचा अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिके विरुद्ध सामना होणार आहे. टीम इंडियाची ही फायनलमध्ये पोहचण्याची ही तिसरी आणि रोहित शर्माच्या नेतृत्वातील पहिली वेळ आहे. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्यांदा अंतिम फेरी गाठली आहे. एडन मार्करमच्या नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेने ही कामगिरी केली आहे. आता दोन्ही संघांनाही वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावण्याची समसमान संधी आहे. मात्र कोणती एकच टीम विश्व विजेता होणार, तर पराभूत संघाला उपविजेते पदावर समाधान मानावं लागणार आहे. टी 20 वर्ल्ड कप फायनल निमित्ताने आपण टीम इंडियाने याआधीच्या 2 फायनलमध्ये काय केलं होतं, हे जाणून घेऊयात.

टीम इंडियाने 2007 साली पहिल्याच टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत ट्रॉफी उंचावली होती. टीम इंडियाने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा थरारक विजय मिळवला होता. महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात टीम इंडियाने ही कामगिरी केली होती. त्यानंतर टीम इंडियाने 2014 साली अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. मात्र टीम इंडिया 7 वर्षांनी पुन्हा टी 20 वर्ल्ड कप जिंकण्यात अपयशी ठरली. अंतिम फेरीत श्रीलंकेने टीम इंडियाला पराभूत करत वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं.

17 वर्षांनंतर प्रतिक्षा संपवणार?

दरम्यान आता टीम इंडियाला रोहितच्या कॅप्टन्सीत 11 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी आणि 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. टीम इंडियाने अखेरची आयसीसी ट्रॉफी ही 2013 साली जिंकली होती. टीम इंडियाने 2013 साली आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी जिंकली होती. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्माला आपल्या कॅप्टन्सीत टीम इंडियाला 17 वर्षांनी टी 20 वर्ल्ड कप आणि 11 वर्षांनी आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्याची सुवर्णसंधी आहे.

दक्षिण आफ्रिका टीम : एडन मार्करम (कॅप्टन), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीझा हेंड्रिक्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, ॲनरिक नॉर्खिया, तबरेझ शम्सी, ओटनील बार्टमन, गेराल्ड कोएत्झी, ब्योर्न फॉर्च्युइन आणि रायन रिकेल्टन.

टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.