AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका! स्टार वेगवान गोलंदाज बराच काळ संघाबाहेर राहणार; कधीपर्यंत आणि का?

Prasidh Krishna News: टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे मैदानाबाहेर राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. न्यूझीलंड दौऱ्याआधी मोठी अडचण निर्माण झाली आहे.

न्यूझीलंड दौऱ्याआधी टीम इंडियाला मोठा झटका! स्टार वेगवान गोलंदाज बराच काळ संघाबाहेर राहणार; कधीपर्यंत आणि का?
| Updated on: Oct 06, 2026 | 5:07 PM
Share

वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० मालिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडचा दौरा करणार आहे. तिथे तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळवण्यात येणार आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा डाव्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे किमान तीन आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला आहे. ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत त्याचा सहभाग होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे टीम इंडियासमोर आव्हान उभे राहिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुवाहाटी येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान प्रसिद्ध कृष्णाला ही दुखापत झाली. वेस्ट इंडिजच्या डावाच्या ३१ व्या षटकात तो मैदान सोडून गेला आणि केवळ पाच षटकेच गोलंदाजी करू शकला. परिणामी तो न्यू चंदीगड येथे होणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यातूनही बाहेर पडला. प्रसिद्ध कृष्णा दुखापतीतून सावरण्यासाठी आणि पुनर्वसन सुरू करण्यासाठी बंगळूरु येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दाखल झाला आहे.

वैद्यकीय पथकाच्या मते, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी अंदाजे तीन आठवडे लागणार आहेत. त्यानंतर चौथ्या आठवड्यापासून तो पूर्ण वेगाने गोलंदाजीचा सराव पुन्हा सुरू करू शकेल. बरे होण्यासाठी लागणारा हा कालावधी लक्षात घेता संघ व्यवस्थापन त्याच्या बाबतीत कोणतीही जोखीम घेण्यास तयार नाही. म्हणूनच न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी त्याला विश्रांती दिली जाईल, असे मानले जात आहे.

या दुखापतीमुळे त्याच्या देशांतर्गत आणि कसोटी क्रिकेटच्या वेळापत्रकावरही परिणाम झाला आहे. ११ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीच्या पहिल्या फेरीत कर्नाटक संघ विजयवाडा येथे आंध्र प्रदेशविरुद्ध खेळणार आहे, पण तो या सामन्यांना मुकणार आहे. मात्र दिलासादायक बाब म्हणजे न्यूझीलंडविरुद्धची दोन सामन्यांची कसोटी मालिका १९ नोव्हेंबरला सुरू होत आहे. यासाठी आता एका महिन्यापेक्षा थोड्याच कालावधीत सुरू होत आहे. संघ व्यवस्थापन त्याला कसोटी सामन्यांसाठी पूर्णपणे ताजेतवाने आणि सामन्यासाठी तंदुरुस्त ठेवण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

या दौऱ्यासाठीचा भारतीय संघ या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. न्यूझीलंड दौऱ्यासाठीच्या संघात अनेक खेळाडूंचा समावेश केला जाऊ शकतो. पण त्याआधी या वर्षीच्या निवड प्रक्रियेबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष निवड समितीची बैठक या आठवड्यात ५ ते ११ ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. विशेष म्हणजे, मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ ४ ऑक्टोबर रोजी संपला. परंतु मंडळाने अद्याप त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केलेली नाही.

Follow Us
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हास
पदवीपेक्षा कौशल्याला महत्त्व! तरुणांना फडणवीसांचा मोलाचा संदेश; उल्हासनगरच्या विकासासाठीही मोठ्या घोषणा
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला...
गोव्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका! मांद्रे आणि गाल्जीबागा बीचला प्रतिष्ठित ब्लू फ्लॅग पुरस्कार
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना...
माफी मागा, अन्यथा महाराष्ट्रात फिरू देणार नाही; आनंदराज आंबेडकरांना राष्ट्रवादीचा इशारा!
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील चारा-पाणीटंचाईचे संकट
वाशिममध्ये दुष्काळाचे सावट! 23 गोशाळांमधील हजारो जनावरांवर चारा-पाणीटंचाईचे संकट
डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं...
Supriya Sule : डिलिमिटेशन विधेयकावर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? एका वाक्यात दिलं उत्तर
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने...
जळगाव महापालिकेच्या महासभेत राडा! इब्राहीम पटेल यांच्या वक्तव्याने भाजप-ठाकरे गट आमनेसामने, नगरसेवकांचा सभात्याग
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन
सेन्सॉर बोर्डाच्या अडवणुकीवर दिपाली सय्यद आक्रमक; 'महाराष्ट्र एपस्टाईन फाईल्स'साठी आंदोलनाचा इशारा!
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल
मोठी ऑफर की... 150 कोटींच्या आरोपावर भुजबळांचा संजय राऊतांना उलटसवाल; थेट...
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना विधान भोवलं
अजितदादांवरील वक्तव्याने वाद पेटला! आनंदराज आंबेडकरांना सुरज चव्हाणांचा थेट इशारा
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला...
सोनिया गांधींचं पुस्तक फाडणाऱ्यांना आशिष शेलारांचा खणखणीत टोला; संजय राऊतांवरही साधला निशाणा!