1,2..5, टीम इंडियाची ऐतिहासिक कामिगरी, 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असा कारनामा
Indian Cricket Team : टीम इंडियाचा उपकर्णधार ऋषभ पंत याने इंग्लंड विरुद्ध पहिल्या कसोटीत सलग 2 शतकं झळकावली. शुबमनसेनेने यासह भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अविस्मरणीय कामगिरी केली.

भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड दौऱ्यात शुबमन गिल याच्या नेतृत्वात पहिल्याच कसोटी सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. टीम इंडियाने इंग्लंड विरुद्ध पहिल्या डावात यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि उपकर्णधार शुबमन गिल या तिघांनी केलेल्या शतक खेळीच्या जोरावर 471 धावा केल्या. त्यानंतर टीम इंडियाने इंग्लंडला आघाडी मोडीत काढण्यापासून यशस्वीरित्या रोखलं. भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला पहिल्या डावात 465 धावांवर आऊट केलं. भारताने अशाप्रकारे 6 धावांची आघाडी मिळवली. टीम इंडियाकडून ‘यॉर्कर किंग’ जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक 5 विकेट्स मिळवल्या. तर प्रसिध कृष्णा याने इंग्लंडच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.
ऋषभ पंत एकमेव भारतीय विकेटकीपर
त्यानंतर भारताने दुसऱ्या डावातही कमाल केली. टीम इंडियाच्या 2 फलंदाजांनी सामन्यातील चौथ्या दिवशी शतकी खेळी केली. केएल राहुल याने कसोटी कारकीर्दीतील नववं तर इंग्लंडमधील तिसरं शतक झळकावलं. तसेच उपकर्णधार ऋषभ पंत याने इतिहास घडवला. पंतने कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून दोन्ही डावात शतक करणारा पहिला तर एकूण दुसरा विकेटकीपर ठरला.
टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी
ऋषभ पंत याने 130 बॉलमध्ये 12 फोर आणि 2 सिक्ससह 1 कसोटी कारकीर्दीतील आठवं शतक पूर्ण केलं. पंतच्या या शतकासह भारतीय कसोटी क्रिकेटच्या 93 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं. भारताकडून एकाच कसोटी सामन्यात 5 फलंदाजांची शतक करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. भारतीय कसोटी संघाला याआधी कधीही एकाच सामन्यात 5 शतकं करता आली नव्हती.
टीम इंडियाकडून 18 वर्षांपूर्वीचा स्वत:चा रेकॉर्ड ब्रेक
भारतीय संघाने यासह 2007 साली केलेला स्वत:चा विक्रम मोडीत काढला. भारताने 2007 साली एकाच सामन्यात 4 शतकं केली होती. भारताने तेव्हा माीरपूरमध्ये बांगलादेश विरुद्ध ही कामगिरी केली होती.
टीम इंडियाचे पंचरत्न
The first time in Test history that India have scored five centuries in a match 🔥 pic.twitter.com/uen3ejkljE
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 23, 2025
दरम्यान टीम इंडियाने दुसऱ्या डावात 90.2 ओव्हरमध्ये मोहम्मद सिराजच्या रुपात आठवी विकेट गमावली. भारताने 349 धावा केल्या आहेत. तसेच भारताने यासह 355 धावांची आघाडी मिळवली आहे. तसेच ऋषभ याने 118 धावा केल्या. तर केएल राहुल याने 137 धावांची खेळी केली. आता टीम इंडिया इंग्लंडसमोर किती धावांचं आव्हान ठेवते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
