ENG vs IND : मोहम्मद सिराजला मॅचविनिंग कामगिरीनंतर Icc कडून गिफ्ट, टीम इंडिया आनंदी
Mohammed Siraj and Prasidh Krishna Mens Test Bowling Rankings : मोहम्मद सिराज आणि प्रसिध कृष्णा या जोडीने उल्लेखनीय कामगिरी करत भारताला पाचव्या कसोटी सामन्यात इंग्लंड विरुद्ध विजयी करण्यात प्रमुख भूमिका बजावली.

टीम इंडियाने पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात इंग्लंडवर 6 धावांनी सनसनाटी विजय मिळवला. भारताचा हा 5 सामन्यांच्या मालिकेतील आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप 2025-2027 या साखळीतील दुसरा विजय ठरला. टीम इंडियाने या विजयासह इंग्लंडला मालिका विजयापासून रोखलं. तसेच मालिका 2-2 ने बरोबरीत सोडवली. या मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने धारदार बॉलिंगच्या जोरावर इंग्लंडच्या फलंदाजांना घाम फोडला. सिराजने या मालिकेत सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या. सिराज पाचव्या कसोटीचा हिरो ठरला. सिराजने या सामन्यात एकूण 9 विकेट्स घेतल्या सिराजला या कामगिरीसाठी ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. तेव्हापासून चारही बाजूला फक्त सिराज आणि सिराजचीच चर्चा पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता आयसीसीने सिराजचा पर्यायाने भारतीय संघाचा आणि चाहत्यांचा आनंद द्विगुणित केला आहे.
सिराजला इंग्लंड दौऱ्यात केलेल्या कामगिरीचा तगडा फायदा झाला आहे. आयसीसीने जारी केल्या ताज्या कसोटी क्रमवारीत अर्थात बॉलिंग रँकिंगमध्ये सिराजने मोठी झेप घेतली आहे. तसेच गोलंदाज प्रसिध कृष्णा यालाही फायदा झाला आहे.
सिराजची मोठी झेप
आयसीसीने जाहीर केल्या टेस्ट बॉलर रँकिंगमध्ये सिराजने मोठी उडी मारली आहे. सिराजने थेट 12 स्थानांची झेप घेतली आहे. सिराज यासह आता 15 व्या स्थानी पोहचला आहे. सिराजच्या खात्यात आता 674 रेटिंग पॉइंट झाले आहेत. तर प्रसिधनेही गरुड झेप घेतली आहे. प्रसिध 84 वरुन थेट 59 व्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. सिराजने पाचव्या कसोटीत 8 विकेट्स घेत सिराजला अप्रतिम साथ दिली होती.
सिराज-प्रसिध आयसीसी रँकिंगमध्ये चमकले
Big changes near the top of the Test rankings following the epic fifth Test between England and India at The Oval 😲
Details 👇https://t.co/O2f86GzxYs
— ICC (@ICC) August 6, 2025
यशस्वीची टॉप 5मध्ये एन्ट्री
दरम्यान टेस्ट बॅटिंग रँकिंगमध्येही भारताचा दबदबा पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वाल याने पुन्हा एकदा टॉप 5 मध्ये धडक दिली आहे. यशस्वीने इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यात 41.10 च्या सरासरीने 411 धावा केल्या. यशस्वीने अंतिम सामन्यात शतक केलं. यशस्वीला त्यामुळे 3 स्थानांचा फायदा झाला आहे. यशस्वीने 8 व्या क्रमांकावरुन पाचव्या स्थानी झेप घेतली आहे. यशस्वीच्या खात्यात 792 रेटिंग आहेत. तसेच इंग्लंडचा जो रुट पहिल्या स्थानी कायम आहे. दुसऱ्या स्थानी हॅरी ब्रूक आहे. तिसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज केन विलियमसन विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी फलंदाज स्टीव्हन स्मिथ चौथ्या स्थानी आहे.
