IND v ENG: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे अंतिम 11, 4 वेगवान गोलंदाजाना मिळू शकते संधी, ‘ही’ आहेत नावं

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 12, 2021 | 11:39 AM

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरु होण्यास काही तास शिल्लक राहिले आहेत. लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानात खेळवल्या जाणाऱ्या या सामन्यात भारतीय संघ नवी रणनीती आखणार आहे.

IND v ENG: दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारताचे अंतिम 11, 4 वेगवान गोलंदाजाना मिळू शकते संधी, 'ही' आहेत नावं
भारतीय क्रिकेट संघ

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना  आज (12 ऑगस्ट) भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. पहिला सामना पावसाच्या व्यत्ययामुळे अनिर्णीत सुटल्यामुळे आजचा सामना दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दरम्यान भारतीय संघातील एक महत्त्वाचा असा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) दुखापतग्रस्त झाल्याने भारतीय संघात काही बदल करणार असल्याचे संकत कर्णधार विराट कोहलीने (Virat Kohli) दिले आहेत. दरम्यान शार्दूलच्या अनुपस्थितीमुळे फलंदाजीत अधिक फरक पडणार नसून गोलंदाजीची अधिक गरज भारताला पडणार असल्याचं त्यानं म्हटलं. ज्यामुळे भारतीय संघात 4 वेगवान गोलंदाज खेळवले जाण्याची दाट शक्यता आहे.

विराटने दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये त्याच्या मते शार्दूलच्या जागी कोणी तगडा फलंदाज न खेळवता दोन्ही डावात 20 विकेट्स घेण्यात अधिकाधिक योगदान करणारा गोलंदाज खेळवण्यावर अधिक भर आहे. त्यामुळे एकतर आर आश्विनची (Ravichandran Ashwin) एक गोलंदाज अष्टपैलू म्हणून वर्णी लागू शकते किंवा वेगवान गोलंदाजीचे अनेक पर्याय भारताकडे उपलब्ध आहेत.

इशांत आणि उमेशमध्ये एकाला संधी

भारताकजे सध्या चांगल्या दर्जाचे वेगवान गोलंदाज आहेत. पहिल्या सामन्यात इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि उमेश यादव (Umesh Yadav) बेंचवर होते. मात्र दुसऱ्या सामन्यात शार्दूलला दुखापत झाल्याने यांच्यातील एका संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यात इशांतचा लॉर्ड्सवरील 2014 सालचा रेकॉर्ड पाहता त्याला संघात स्थान मिळण्याची अधिक संधी आहे. याशिवाय पहिल्या सामन्यातील बुमराह, सिराज आणि शमी ही जोडी आहेच. अशारितीने भारत 4 वेगवान गोलंदाज खेळवू शकतो. पण या सर्वात आऱ आश्विनला खेळवायचे असल्याच कोणत्या खेळाडूला विश्रांती द्यावी? हा मोठा प्रश्न भारतीय संघासमोर आहे.

‘भारतीय फलंदाजी मजबूत’

कोहली शार्दूलच्या दुखापतीबद्दल म्हणाला, ”शार्दुलच्या संघात नसल्याने भारतीय फलंदाजीवर अधिक फरक पडणार नाही. भारताकडे अगदी शेवटपर्यंत चांगले फलंदाज आहेत. त्यात मी, पुजारा आणि रहाणे यांनी आतापर्यंत खास योगदान न देताही आम्ही चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे आज आम्ही चांगली कामगिरी करुन भारताची फलंदाजी आणखी ताकदवर बनवू. त्यामुळे शार्दूलच्या जागी गोलंदाजीमध्ये अधिक चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूची गरज भारतीय संघाला आहे.”

20 विकेट घेणंच आमचं लक्ष्य

कोहलीने सामन्याच्या रणनीतीबाबत म्हणाला, ‘‘आम्हाला आजच्या सामन्यात सावध कामगिरी करणं गरजेचं आहे. आमच्याकडे पहिल्या टेस्टमध्ये उत्तम कामगिरी करणारा शार्दूल नल्याने 20 विकेट कसे घ्यायचे आणि यासाठी कोणता बोलिंग अटॅक वापरायचा याचा विचार करणे गरजेचे आहे. आम्ही दोन्ही डावात इंग्लंडला सर्वबाद करुनच पराभव करण्याच्या विचारात आहोत.” कोहली पुजारा आणि रहाणेच्या फॉर्मवर म्हणाला की, ”मागील काही सामना अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा खास कामगिरी करु शकलेले नाहीत. पण सामन्यात वैयक्तीपणे खेळाडू कसा खेळतो यापेक्षा संपूर्ण संघ कसा खेळतो. यावर अधिक गोष्टी अवंलंबून असतात.’’

हे ही वाचा

IND v ENG Live Streaming: भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा कसोटी सामना, Live Match कधी, कुठे?

IND vs ENG : भारताचा हातातोंडाशी आलेला विजय पावसाने हिरावला, पाचव्या दिवसाचा खेळ रद्द, पहिली कसोटी अनिर्णित

IND vs ENG : सामना अनिर्णीत सुटल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट म्हणतो, आणखी 40 ओव्हर मिळाले असते तर…

(Team india playing 11 for second test against England India vs England 2nd test starts soon)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI