ICC ODI Rankings मध्ये हिटमॅनचा धमाका, बाबरला पछाडत रोहित दुसऱ्या स्थानी
Rohit Sharma vs Babar Azam Icc Odi Ranking : पाकिस्तानचा फलंदाज बाबर आझम विंडीज विरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये फ्लॉप ठरला. बाबरच्या या हारकीरीचा भारतीय कर्णधार रोहित शर्मा याला फायदा झाला.

आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ताजी एकदिवसीय क्रमवारी जारी केली आहे. या वनडे रँकिंगमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याला मोठा फायदा झाला आहे. रोहित शर्मा याने अखेरचा एकदिवसीय सामना हा 9 मार्च 2025 रोजी खेळला होता. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्चला न्यूझीलंडचा धुव्वा उडवत आयसीसी चॅम्पियन्स 2025 ट्रॉफी जिंकली होती. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून 5 महिन्यांपेक्षा अधिक कालावधी बाकी आहे. मात्र त्यानंतरही रोहितला रँकिंगमध्ये फायदा झाला आहे. पाकिस्तानचा अनुभवी फलंदाज बाबर आझम याच्या निराशाजनक कामगिरीमुळे रोहितला फायदा झाला आहे.
वेस्ट इंडिजने मायदेशात पाकिस्तानचा 3 सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने धुव्वा उडवत एकदिवसीय मालिका जिंकली. बाबर आझम या मालिकेत फ्लॉप ठरला. बाबरला या मालिकेतील 3 सामन्यांमध्ये फक्त 56 धावाच करता आल्या. बाबरला या खराब कामगिरीचा फटका बसला. तर दुसऱ्या बाजूला रोहितला याचा फायदा झाला. बाबरची या निराशाजनक कामगिरीमुळे वनडे बॅट्समन रँकिंगमध्ये घसरण झाली आहे. तर रोहितने झेप घेतली आहे. रोहितला एका स्थानाचा फायदा झाल्याने तो दुसऱ्या स्थानी पोहचला आहे. तर बाबरची दुसऱ्या स्थानावरुन तिसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
शुबमन गिल पहिल्या स्थानी
भारताचा युवा फलंदाज शुबमन गिल याने वनडे रँकिंगमध्ये दबदबा कायम राखला आहे. शुबमन पहिल्या स्थानी कायम आहे. शुबमनच्या खात्यात 784 रेटिंग पॉइंट आहेत. शुबमनही चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये खेळला होता. शुबमनने त्या स्पर्धेतील एकूण 5 सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 188 धावा केल्या होत्या. तर रोहितने 36 च्या सरासरीने 5 सामन्यांमध्ये 180 धावा केल्या होत्या.
विराट कितव्या स्थानी?
तिसऱ्या स्थानी असलेल्या बाबर आझम याच्या खात्यात 751 रेटिंग आहेत. तर भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली चौथ्या स्थानी आहे. विराटच्या नावावर 736 रेटिंग आहेत. तसेच शुबमन, रोहित, विराट व्यतिरिक्त टॉप 10 मध्ये श्रेयस अय्यर याचाही समावेश आहे. श्रेयस 704 रेटिंगसह आठव्या स्थानी आहे.
विराट-रोहित ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार!
दरम्यान रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी टी 20I आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे ही अनुभवी जोडी आता एकदिवसीय क्रिकेटमध्येच खेळताना दिसणार आहे. टीम इंडिया आता मायदेशात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 3 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यामुळे या मालिकेनिमित्ताने चाहत्यांना रोहित-विराटला मैदानात पाहता येणार आहे.
