AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 2 खेळाडूंची पहिल्यांदाच निवड

India vs Australia Women Odi Series 2026 : भारतीय एकदिवसीय संघात श्रीलंकेविरुद्धच्या टी 20i मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण करणाऱ्या वैष्णवी शर्मा हीचा समावेश करण्यात करण्यात आला आहे. जाणून घ्या वेळापत्रक.

IND vs AUS : ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 2 खेळाडूंची पहिल्यांदाच निवड
BcciImage Credit source: Bcci
Sanjay patil
Sanjay patil | Updated on: Jan 17, 2026 | 11:49 PM
Share

भारतीय महिला क्रिकेट संघ डब्ल्यूपीएल अर्थात वूमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यात यजमान संघाविरुद्ध 15 फेब्रुवारी ते 6 मार्च दरम्यान एकदिवसीय आणि टी 20i मालिका खेळणार आहे. तसेच उभयसंघात एकमेव कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. बीसीसीआय निवड समितीने टी 20i आणि एकदिवसीय या दोन्ही मालिकांसाठी शनिवारी 17 जानेवारीला भारतीय महिला संघाची घोषणा केली आहे. तर लवकरच एकमेव कसोटी सामन्यासाठी संघ जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती बीसीसीआयने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन दिली आहे.

टी 20i आणि एकदिवसीय मालिकेत प्रत्येकी 3-3 सामने खेळवण्यात येणार आहेत. उभयसंघात 15 ते 21 जानेवारी दरम्यान टी 20i मालिकेचा थरार रंगणार आहे. त्यानंतर 24 फेब्रुवारी ते 1 मार्च दरम्यान एकदिवसीय मालिकेचं आयोजन करण्यात आलं आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय महिला संघात कुणाला संधी मिळालीय? हे जाणून घेऊयात.

हरमनप्रीत-स्मृतीवर मोठी जबाबदारी

हरमनप्रीत कौर हीच्याकडेच दोन्ही मालिकेतील कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर स्मृती मंधाना उपकर्णधार म्हणून हरमनप्रीतला नेहमीप्रमाणे सहकार्य करणार आहे.

भारतीय संघात एकदिवसीय मालिकेसाठी 2 नव्या चेहऱ्यांना संधी

बीसीसीआय निवड समितीने वैष्णवी शर्मा आणि जी कामलिनी या दोघींचा पहिल्यांदाच एकदिवसीय संघात समावेश केला आहे. या दोघांनी मायदेशात श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून पदार्पण केलं होतं. तसेच काश्वी गौतम हीचं कमबॅक झालं आहे.

भारतीय महिला संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा

भारतासमोर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आव्हान काय?

भारतीय महिला संघाला आतापर्यंत ऑस्ट्रेलियात एकदिवसीय मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे यंदा हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ अनेक वर्षांची प्रतिक्षा संपवणार का? हे पाहणं अधिक महत्त्वाचं ठरणार आहे.

भारत-ऑस्ट्रेलिया एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक

पहिला सामना, 24 फेब्रुवारी, गाबा

दुसरा सामना, 27 फेब्रुवारी, होबार्ट

तिसरा सामना, 1 मार्च, होबार्ट

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी वुमन्स टीम इंडिया : हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), शफाली वर्मा, रेणुका ठाकूर, श्रीचरणी, वैष्णवी शर्मा, क्रांती गौड, स्नेह राणा, दीप्ती शर्मा, रिचा घोष (विकेटकीपर), जी कमलिनी (विकेटकीपर), काशवी गौतम, अमनजोत कौर, जेमिमाह रॉड्रिग्स आणि हरलीन देओल.

Follow Us
साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे...
Devendra Fadnavis : साहेब पाण्याचा थेंब नाही, बाजारात गेलो होतो पण...मुख्यमंत्र्यांपुढे हात जोडत शेतकरी ढसा ढसा रडला
निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून...
Ram Kadam : निवडणूक आयोगावर बोलताना राऊतांची जीभ घसरली; त्या वक्तव्यावरून राम कदमांचा पलटवार
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी...
Shiv Sena Symbol : शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाणाचा फैसला पुन्हा लांबला! आजची सुनावणी झालीच नाही; आता पुढे...
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती
IIT पवई प्रकरणात मोठा ट्विस्ट! साहिल वाकोडेचा iPhone पोलिसांच्या हाती, ChatGPT संदर्भांतील आरोपाचं काय होणार?
देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल
Kapil Sibal : देश असाच चालणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय?; कपिल सिब्बलांचा सवाल, नेमकी काय केली मागणी?
निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर..
Satej Patil : निवडणुका असत्या तर...; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सतेज पाटलांचा सरकारवर थेट आरोप
निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत
Election Commission : निवडणूक आयोगात चाललंय काय? निवडणूक आयुक्तांमध्येच बिनसलं? 10 महिन्यांत 14 वेळा आक्षेप! वाचा प्रकरण काय?
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
चंद्रपूरच्या तुकूमचा राजाची अनोखी मूर्ती, कडधान्यांपासून साकारलेला गणपती
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड पोलिसांची डीजे आवाजावर कारवाई, 80 मंडळांवर गुन्हे
भाजपमध्ये संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी
BJP : भाजपमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल; महाराष्ट्राच्या प्रभारीपदी कोणाची वर्णी