AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : 24 तासांत टीम इंडियानं घेतला बदला, वेस्ट इंडिजच्या पराभवाची 3 कारणं जाणून घ्या….

दुसरा T20I सामना 5 गडी राखून गमावल्यानंतर भारतानं तिसरा T20I 24 तासांनी 7 विकेट्सनं जिंकला. यासह टीम इंडियानं 5 टी-20 सामन्यांच्या मालिकेत पुन्हा एकदा 2-1 अशी आघाडी घेतली आहे. अधिक जाणून घ्या...

VIDEO : 24 तासांत टीम इंडियानं घेतला बदला, वेस्ट इंडिजच्या पराभवाची 3 कारणं जाणून घ्या....
Ind vs WI 3rd T20IImage Credit source: social
| Updated on: Aug 03, 2022 | 6:49 AM
Share

नवी दिल्ली : Ind vs WI 3rd T20I सामन्यात मंगळवारी दिवसाची सुरुवात टीम इंडिया संघाच्या (Team India)  पराभवाच्या बातमीनं सुरू झाली. मात्र, बुधवारची सकाळ वेस्ट इंडिजच्या (Ind vs WI) पराभवाची आणि टीम इंडियाच्या विजयाची बातमी घेऊन आली आणि पुन्हा एकदा टीम इंडियाचं कौतुक होऊ लागलं, चाहत्यांनी देखील सोशल मीडियावर (Social Media) पोस्टचा वर्षाव सुरू केला. टीम इंडियानं 24 तासांत वेस्ट इंडिजविरुद्ध बदला घेतला. परिस्थिती तशीच होती. टीम इंडियासमोर वेस्ट इंडिजच्या टीमनं गुडघे टेकवले असा हा सामना झाला. यासह पाचव्या टी-20 सामन्याच्या सीरिजमध्ये टी इंडियानं पुन्हा एकदा 2-1ची आगेकुच केली आहे. भारतानं दुसरा टी 20I हा पाच विकेटनं पराभूत झाल्याच्या 24 घंट्यानंतर तीसरा T-20I सामना सात विकेटनं जिकला. पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघानं विजय खेचून आणला आहे.

तिसऱ्या T20I मध्ये भारतानं नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजला प्रथम फलंदाजी दिली. प्रथम खेळताना वेस्ट इंडिजनं 20 षटकांत 5 बाद 164 धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियानं हे लक्ष्य एक षटक शिल्लक असताना म्हणजे 19व्या षटकातच 3 विकेट्स गमावून पूर्ण केले. आता विजयाची ती 3 कारणे पाहूया जी भारतीय संघाचे 3 चेहरे आहेत.

सूर्यकुमार यादव

रोहित शर्माच्या निवृत्त दुखापतीनंतर सूर्यकुमार यादवनं भारताला विजय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. यामध्ये तो यशस्वी ठरला. त्यानं संघाला ती गती दिली, त्यामुळे उर्वरित फलंदाजांचे काम सोपे झाले. सूर्यकुमार यादवनं 44 चेंडूंत 8 चौकार आणि 4 षटकारांसह 76 धावा केल्या.

हा व्हिडीओ पाहा

ऋषभ पंत

सूर्यकुमार यादवनं चांगली सुरुवात केली, तर ऋषभ पंतनं नाबाद खेळीनं शेवटपर्यंत पोहोचण्याचं काम केलं. पंतनं 26 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकारासह नाबाद 33 धावा केल्या.

हा व्हिडीओ पाहा

भुवनेश्वर कुमार

भारताच्या विजयात भुवीची भूमिकाही नाकारता येणार नाही. त्यानं 4 षटकात 35 धावा देत 2 बळी घेतले. यातील एक विकेट धोकादायक काईल मायर्सची होती. ज्याने 73 धावा केल्या. दुसरी विकेट कॅरेबियन कर्णधार निकोलस पूरनची होती, जर तो विकेटवर थांबला असता तर तो मोठा धोका बनू शकतो. पण भुवीने लवकरच त्याचे पाय उपटले. आणि भारताला विजयासाठी एकूण 170 पेक्षा कमी धावा होत्या.

सोशल मीडियावर पोस्टचा वर्षाव

टीम इंडियाच्या विजयानं सोशल मीडियावर क्रिकेटप्रेमींनी पोस्टचा वर्षाव केल्याचं दिसून आलं. भारताच्या विजयाच्या या पोस्ट होत्या. 24 तासांत भारतानं वेस्ट इंडिजचा पराभव घेतला आणि पुन्हा एकदा यशोशिखरावर जाऊन बसल्याचं बोललं जातं होतं.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.