Video : मिस फिल्ड आणि भर मैदानात शिवीगाळ? उमरान मलिक आऊट ऑफ कंट्रोल

मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) अडवता येणारा बॉल सोडला. त्यामुळे उमरान मलिकचा (Umran Malik) पारा चढला.

Video : मिस फिल्ड आणि भर मैदानात शिवीगाळ? उमरान मलिक आऊट ऑफ कंट्रोल
Image Credit source: सोशल मीडिया
Follow us
| Updated on: Jan 11, 2023 | 8:38 PM

Mohmmed Siraj Abused Umran Malik : टीम इंडियाने (Indian Cricket Team) श्रींलेकेवर (Sri Lanka) पहिल्या एकदिवसीय सामन्यात 67 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली. सामन्यादरम्यान टीम इंडियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. मात्र अपेक्षित फिल्डिंग झाली नाही. मोहम्मद सिराजने (Mohmmed Siraj) अडवता येणारा बॉल सोडला. त्यामुळे उमरान मलिकचा (Umran Malik) पारा चढला. संतापलेल्या मलिकने सिराजसाठी अपशब्द वापरले. उमरानने सिराजला मिस फिल्डिंग केल्याने शिवीगाळ केल्याचंही काही जणांचा दावा आहे. या मिस फ्लिडींगचा आणि उमरान मलिकने वापरलेल्या अपशब्दांचा व्हीडिओ व्हायरल होतोय. (team india umran malik abused to mohmmed siraj due to miss field against sri lanka ind vs sl 1st odi at guwahati baraspara cricket stadium)

नक्की काय झालं?

हा सर्व प्रकार श्रीलंकेच्या बॅटिंगदरम्यान 33 व्या ओव्हरमध्ये घडला. उमरान बॉलिंग टाकत होता. ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर श्रीलंकेचा फलंदाज चमीका करुणारत्नेने लॉन्ग ऑफच्या दिशेने शॉट मारला. मोहम्मद सिराज त्या दिशेला होचा. मात्र सिराजला बॉल अडवता आला नाही. त्यामुळे श्रीलंकेला 4 धावा मिळाल्या.

हे सुद्धा वाचा

उमरान मलिक मोहम्मद सिराजवर संतापला

सिराजच्या मिस फिल्डमुळे श्रीलंकेला 4 रन्स मिळाल्याचं उमरानच्या लक्षात आलं. त्यानंतर उमरानचा पारा चढला. उमरानने सिराजला नको ते बोलायला सुरुवात केली. यावेळेस उमरान कॅमेऱ्यात कैद झाला. दरम्यान याआधीही श्रीलंका विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात भारतीय फलंदाज दीपक हुड्डाने अंपायरला शिवीगाळ केल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता.

सामन्याचा धावता आढावा

श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाने विराट कोहलीच्या शतकी खेळीच्या जोरावर निर्धारित 50 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावून 373 धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 374 धावांचं मिळालं. श्रीलंकेला 8 विकेट्स गमावून 50 ओव्हरमध्ये 306 धावाच करता आल्या.

दरम्यान या मालिकेतील दुसरा आणि महत्त्वाचा सामना हा 12 जानेवारीला कोलकातामधील इडन गार्डनला खेळवण्यात येणार आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याची संधी आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.