विराट कोहलीचा तिसऱ्या कसोटीदरम्यान मोठा निर्णय, ड्रेसिंग रुम सोडत.., पाहा व्हीडिओ
Virat Kohli IND vs AUS 3rd Test : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने या सामन्यादरम्यान मोठा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात ब्रिस्बेनमध्ये तिसरा कसोटी सामना खेळवण्यात येत आहे. टीम इंडियाने चौथ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत यशस्वीरित्या फॉलोऑन टाळण्यात यश मिळवलं. भारताने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 445 च्या प्रत्युत्तरात 9 विकेट्स गमावून 252 धावा केल्या आहेत. टीम इंडिया अजूनही 193 धावांनी पिछाडीवर आहे. जसप्रीत बुमराह आणि आकाश दीप या जोडीने नाबाद 39 धावांची भागीदारी करत फॉलोऑन टाळला. त्याआधी टीम इंडियाची बिकट स्थिती झाली होती. टीम इंडियाचे बहुतांश फलंदाज अपयशी ठरले. कॅप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी निराशा केली. विराटला अवघ्या 3 धावाच करता आल्या. त्यामुळे विराटने या सामन्यादरम्यान मोठा निर्णय घेतला. विराटने दुसऱ्या डावातील बॅटिंगआधी नेट्समध्ये जाऊन सराव करण्याचा निर्णय घेतला.
सामन्यातील तिसऱ्या दिवशी (16 डिसेंबर) टॉप ऑर्डरमधील भारतीय फलंदाज अपयशी ठरले. विराट कोहली ऑफ साईडच्या दिशेने जाणाऱ्या चेंडूसोबत छेडछाड करुन आपली विकेट गमावली. विराटवर या मुळे टीका झाली. विराटने हा बॉल सोडायला पाहिजे होता, असं मत अनेकांनी व्यक्त केलं. तर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर ड्रेसिंग रुममध्ये शॅडो प्रॅक्टीस करताना दिसून आले.
हरभजन सिंह काय म्हणाला?
विराटच्या नेट्स प्रॅक्टीसचा व्हीडिओ स्टार स्पोर्ट्सने पोस्ट केला आहे. या व्हीडिओत हरनभजन सिंह हा विराटच्या सरावाबाबत बोलताना दिसतोय. हरभजनने विराटच्या या सरावाबाबत पआपलं मत व्यक्त केलं.
“विराटने नेट्समध्ये जास्तीत जास्त बॉल खेळण्याचा प्रयत्न करावा, ज्यामुळे त्याला कमबॅक करता येईल. हा फिल गेम आहे. तुम्ही जितकं जास्त खेळाल तितकंच चांगलं वाटेल आणि मैदानात जाऊन जास्त धावा करु शकता. त्यामुळे आशा करतो की गिल आणि विराट दोघेही मैदानात जातील तेव्हा शतकी खेळी करतील”, असं हरभजनने म्हटलं.
विराटचा कसून सराव
#HarbhajanSingh shares his mantra: The more you play, the better you get. Watch as he reviews #ViratKohli & #ShubmanGill putting in the hard yards in the nets!#AUSvINDOnStar 👉 3rd Test, Day 4 | LIVE NOW on Star Sports! #ToughestRivalry #BorderGavaskarTrophy pic.twitter.com/hKm7IVHvBd
— Star Sports (@StarSportsIndia) December 17, 2024
तिसऱ्या कसोटीसाठी ऑस्ट्रेलिया प्लेइंग ईलेव्हन : पॅट कमिन्स (कॅप्टन), उस्मान ख्वाजा, नाथन मॅकस्वीनी, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, एलेक्स कॅरी (विकेटकीपर), मिचेल स्टार्क, नाथन लियोन आणि जोश हेझलवूड.
तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप आणि नीतीश कुमार रेड्डी.
