AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Virat Kohli : विराटकडून वनडे क्रिकेटमधील निवृत्तीचे संकेत! झिरोवर आऊट झाल्यानंतर तो फोटो व्हायरल

Virat Kohli 2nd Consecutive Duck : विराट कोहली याला दुसऱ्या सामन्यातही त्याच्या लौकीकाला साजेसं असं काहीच करता आलं नाही. विराटने सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाल्यानंतर काय केलं? जाणून घ्या.

Virat Kohli : विराटकडून वनडे क्रिकेटमधील निवृत्तीचे संकेत! झिरोवर आऊट झाल्यानंतर तो फोटो व्हायरल
Virat Kohli Duck Team IndiaImage Credit source: Social Media
| Updated on: Oct 23, 2025 | 11:45 AM
Share

टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज विराट कोहली याने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात घोर निराशा केली. विराट एडलेड ओव्हलमध्ये भोपळा फोडण्यात अपयशी ठरला. विराटची एकदिवसीय क्रिकेटमध्ये या मालिकेत झिरोवर आऊट होण्याची ही सलग दुसरी वेळ ठरली. विराटने 4 चेंडूंचा सामना केला. मात्र विराटला खातं उघडता आलं नाही. झिरोवर आऊट झाल्यानंतर विराटच्या चेहऱ्यावर नाराजी दिसत होती. विराट या निराशेसह ड्रेसिंग रुमच्या दिशेने निघाला. यावेळेस क्रिकेट चाहत्यांनी विराटला स्टँडिंग ओव्हेशन देत सन्मान दिला. विराटनेही चाहत्याचं अभिवादन स्वीकारलं. त्यानंतर विराटने केलेल्या एका इशाऱ्यामुळे तो लवकरच एकदिवसीय क्रिकेटमधूनही निवृत्त होणार असल्याचं म्हटलं जात आहे. विराटचा ऑस्ट्रेलिया विरूद्धचा तिसरा आणि अंतिम सामना हा त्याच्या एकदिवसीय कारकीर्दीतील शेवटचा सामना असल्याचं म्हटलं जात आहे.

विराट सलग दुसऱ्यांदा झिरोवर आऊट

विराट पर्थमध्ये रविवारी 19 ऑक्टोबरला झाला होता. विराट पर्थमध्ये 8 चेंडूंचा सामना केल्यानंतरही 1 धावही करण्यात अपयशी ठरला. त्यामुळे विराट एडलेडमध्ये कमबॅक करेल, असा विश्वास चाहत्यांना होता. तसेच विराटची या मैदानातील कामगिरीही अफलातून राहिली आहे. त्यामुळे विराट त्याच्या आकडेवारीला साजेशी खेळी करत कमबॅक करेल, असं वाटलं होतं. मात्र विराटला काहीच करता आलं नाही. झेव्हीयर बार्टलेट याने विराटला एलबीडब्ल्यू करत मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला.

विराटकडून निवृत्तीचे संकेत!

विराट कोहली आऊट झाल्यानंतर मैदानाबाहेर जायला निघाला. विराट बाउंड्री लाईनजवळ येताच स्टेडियममधील चाहत्यांनी उभं राहत त्याने दिलेल्या एकदिवसीय क्रिकेटमधील योगदानासाठी त्याचे आभार मानले. विराटने ग्लोव्हज दाखवत एका प्रकारे आपला हा या मैदानातील शेवटचा सामना असल्याचंही अप्रत्यक्ष दाखवलं. त्यामुळे विराट तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

टीम इंडियासाठी ‘करो या मरो’ सामना

दरम्यान टीम इंडिया या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्या सामन्यात डीएलएसनुसार 7 विकेट्सने पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडियाला दुसऱ्या सामन्यातच मालिका गमवायची नसेल तर कोणत्याही स्थितीत विजयी व्हावं लागणार आहे. त्यामुळे आता टीम इंडिया कशी कामगिरी करते? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...