AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : नववर्षात टीम इंडियासमोर या संघाचं आव्हान, खेळणार 8 सामने

Indian Cricket Team : टीम इंडिया मायदेशात सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टी 20i मालिका खेळणार आहे. तर त्यानंतर एकूण 3 सामन्यांची एकिदिवसीय मालिका पार पडणार आहे.

Team India : नववर्षात टीम इंडियासमोर या संघाचं आव्हान, खेळणार 8 सामने
team india young brigadeImage Credit source: axar patel x account
| Updated on: Jan 07, 2025 | 11:20 PM
Share

टीम इंडियाला 2024 वर्षाचा शेवट अपेक्षेनुसार करता आला नाही. टीम इंडियाला सिडनीत झालेल्या पाचव्या आणि अंतिम कसोटी सामन्यात पराभूत व्हावं लागलं. यजमान ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमने यासह इतिहास बदलला. ऑस्ट्रेलियाने मायदेशात 2014-2015 नंतर बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकली आणि 10 वर्षांची प्रतिक्षा संपवली. टीम इंडियाने या मालिकेसह बरंच काही गमावलं. टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या शर्यतीतून बाहेर पडली आणि गेल्या 2 वर्षांची मेहनत व्यर्थ ठरली. आता मात्र टीम इंडिया या हा पराभव विसरुन नववर्षात दणक्यात सुरुवात करण्याच्या हिशोबाने मैदानात उतरणार आहे.

टीम इंडिया नववर्षात एकाच संघाविरुद्ध टी 20i आणि वनडे सीरिज खेळणार आहे. या दोन्ही मालिका मायदेशात होणार आहेत. इंग्लंड क्रिकेट टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. उभयसंघातील टी 20i मालिकेत 5 सामने होणार आहेत. तर 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. सूर्यकुमार यादव टी 20i सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. तर रोहित शर्मा एकदिवसीय संघाची धुरा सांभाळणार आहे. बीसीसीआय निवड समिती या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघांची घोषणा पुढील काही दिवसांमध्ये घोषणा करणं अपेक्षित आहे. तर दुसर्‍या बाजूला इंग्लंडने दोन्ही मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी 22 जानेवारीला संघ जाहीर केला. जॉस बटलर

इंडिया-इंग्लंड टी 20i सीरिजचं वेळापत्रक

पहिला सामना, बुधवार 22 जानेवारी, इडन गार्डन

दुसरा सामना, शनिवार 25 जानेवारी, चेन्नई

तिसरा सामना, मंगळवार 28 जानेवारी, राजकोट

चौथा सामना, शुक्रवार 31 जानेवारी, पुणे

पाचवा सामना, रविवार 2 फेब्रुवारी, मुंबई

वनडे सीरिज

पहिला सामना, गुरुवार 6 फेब्रुवारी, नागपूर

दुसरा सामना, रविवार 9 फेब्रुवारी, कटक

तिसरा सामना, बुधवार 12 फेब्रुवारी, अहमदाबाद

टी 20 सीरिजसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कर्णधार) रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, गुस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, जेमी स्मिथ, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

वनडे सीरिज आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी इंग्लंड टीम : जोस बटलर (कॅप्टन), जोफ्रा आर्चर, गस ऍटकिन्सन, जेकब बेथेल, हॅरी ब्रूक, ब्रायडन कार्स, बेन डकेट, जेमी ओव्हरटन, लियाम लिव्हिंगस्टोन, आदिल रशीद, जो रूट, साकिब महमूद, फिल सॉल्ट आणि मार्क वुड.

मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप
मुंबई अन ठाण्यात कोणचा महापौर? गंभीर आरोप करत मनसे नेत्याचा गंभीर आरोप.
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान.
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?.
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट.
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?.
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?
15 मिनिटांमुळे स्वप्न भंगलं! भाजप उमेदवार उशिरा पोहोचला अन् घडलं काय?.
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!
भाजप इच्छुक आक्रमक... मंत्र्यांच्या PA अन् नातेवाईकाला उमेदवारी!.
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान
कार्यालय फोडणाऱ्यांना ठाकरे सेनेकडून तिकीट, उदय सामंतांचं मोठं विधान.
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्..
मनसेचा अनोखा प्रचार, राज ठाकरेंच्या शिवतीर्थबाहेर रेल्वे इंजिन अन्...
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात
RPI आठवले गटाचा माजी जिल्हाध्यक्ष तुरुंगातून निवडणुकीच्या रिंगणात.