6 महिन्यांत वडील-भावाला गमावलं, बहिणीला कॅन्सर, आकाश समस्यांवर मात करत असा ठरला भारताच्या विजयाचा ‘दीप’
Akash Deep Success Story : आकाश दीप गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरला आहे. आकाशने इंग्लंड विरूद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 10 विकेट्स घेऊन भारताला जिंकवण्यात निर्णायक भूमिका बजावली. या निमित्ताने आपण आकाशचा बिहार ते टीम इंडियापर्यंतचा प्रवास कसा होता? हे जाणून घेऊयात.

संधीचं सोनं करणं काय असतं? हे टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज आकाश दीप याने सिद्ध करुन दाखवलं. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याला इंग्लंड दौऱ्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यातून (2-6 जुलै) वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली. त्यामुळे बुमराहच्या जागी बिहारचा असलेल्या आकाश दीप याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये संधी देण्यात आली. आकाशने या सामन्यातील दोन्ही डावात एकूण 10 विकेट्स घेतल्या. आकाशने 10 विकेट्स घेण्यासह टीम इंडियाला बर्मिंगॅहममध्ये कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील पहिलावहिला विजय मिळवून देण्यात निर्णायक भूमिका बजावली. भारताने हा सामना तब्बल 336 धावांच्या फरकाने जिंकला. आकाशच्या या यशामागे त्याची कठोर मेहनत, अभ्यास, कौटुंबिक...
