चेतेश्वर पुजारा, उमेद यादव, सैनी काऊंटी क्रिकेटमध्ये जोमात

एकीकडे टीम इंडिया टी-20 विश्वचषकाची तयारी करत असताना दुसरीकडे भारताबाहेर चाललेल्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. तर मध्येच आझम आणि विराटच्याही बातम्या येत आहेत. याविषयी अधिक जाणून घ्या...

चेतेश्वर पुजारा, उमेद यादव, सैनी काऊंटी क्रिकेटमध्ये जोमात
चेतेश्वर पुजारा, उमेद यादव जोमातImage Credit source: social
Follow us
| Updated on: Sep 19, 2022 | 7:34 PM

नवी दिल्ली : काऊंटी क्रिकेट (County Cricket) सध्या चांगलंच चर्चेत आहे. कारण, याठिकाणी चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि उमेश यादव (Umesh Yadav) जोमात दिसतायत. एकीकडे टीम इंडिया टी-20 विश्वचषकाची तयारी करत असताना दुसरीकडे भारताबाहेर चाललेल्या सामन्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. मध्येच बाबर आझम आणि विराट कोहलीच्याही बातम्या येता आहेत. मात्र, यात काऊंटी क्रिकेटमधून थेट फटकारे आणि षटकारांच्या हेडलाईन्सच समोर येत आहेत. याविषयी सविस्तर जाणून घ्या…

चेतेश्वर पुजारा

चेतेश्वर पुजाराला सातत्यानं कमी धावा केल्यानं त्याला भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आलंय. यानं आंतरराष्ट्रीय कारकीर्द पुन्हा सुरू करण्यासाठी ससेक्स काउंटी संघात सामील होण्याचा निर्णय घेतला. अनेक भारतीयांनी आपली कारकीर्द टिकवण्यासाठी काउंटी क्रिकेटमध्ये सामील होण्याचा मार्ग स्वीकारला. यामुळे अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंना फॉर्ममध्ये परत येण्यास मदत झाली.

भारतीय क्रिकेटपटूंनी कठीण इंग्लिश परिस्थितीत स्वत:ची चाचणी घेत कोणत्याही फॉरमॅटमधील सर्वोत्तम फलंदाजी किंवा गोलंदाजीत प्रभुत्व मिळवलेलं दिसतं. कौंटी क्रिकेटमध्ये भारतीय क्रिकेटपटूंच्या दीर्घ अनुपस्थितीनंतर काही खेळाडू या हंगामात इंग्लंडला गेले आहे.  या सीजनमध्ये भारताला काऊंटी क्रिकेटमध्ये चांगलाच फायद झाला आहे. पुजारानं दुसऱ्या डावात शतक बनवलं. पुजारानं टॉम हेन्ससोबत 351 धावांची भागीदारी केली.

वॉशिंगटन सुंदर

सुंदरनं जुनमध्ये लंकाशायरला साईन केलं. त्यानं तीन काऊंटी चॅम्पियनशिप खेळले आणि तो सगळ्या रॉयल लंडन वनडे सामन्यासाठी उपलब्धही होता. जुलैमध्ये नॉर्थम्पटनशायरविरुद्ध आपल्या पहिल्या सामन्यात सुंदरनं पाच विकेट घेतले. दुसऱ्या डावात नाबाद 34 धावा बनवून लंकाशायरला विजय मिळवून दिला.

उमेश यादव

काऊंटीमध्ये आपल्या डेब्यू सामन्यात यादवनं तीन विकेट घेतले. 41 धावांत 44 धावा बनवल्या. तरीही तो नाबाद राहिला. रॉयल लंडन चषकात आपल्या पहिल्या सामन्यात उमेशनं पाच विकेट घेऊन प्रतिस्पर्धी लोकांना आपला दम दाखवून दिला.

नवदीप सैनी

सैनीनं वनडेमध्ये वारविकशायरविरुद्ध पाच विकेट घेतल्या. सैनीनं लंकाशायरविरुद्ध चांगली खेळी केली. त्यानं दोन सामन्यात अकरा विकेट घेतल्या.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.