AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

12 बॉलमध्ये 2 SIX मारले, तरच पावरप्ले, Free Hit फॅन्स ठरवणार, The 6IXTY टुर्नामेंट बद्दल जाणून घ्या सर्वकाही

आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचे तीनच फॉर्मेट (Cricket Format) आहेत. पण देशांतर्गत आणि लीग स्टेजवर क्रिकेटमध्ये काही मजेशीर फॉर्मेटस पहायला मिळत आहेत.

12 बॉलमध्ये 2 SIX मारले, तरच पावरप्ले, Free Hit फॅन्स ठरवणार, The 6IXTY टुर्नामेंट बद्दल जाणून घ्या सर्वकाही
the 6ixty tournamentImage Credit source: cpl twitter
| Updated on: Jun 23, 2022 | 1:37 PM
Share

मुंबई: आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेटचे तीनच फॉर्मेट (Cricket Format) आहेत. पण देशांतर्गत आणि लीग स्टेजवर क्रिकेटमध्ये काही मजेशीर फॉर्मेटस पहायला मिळत आहेत. इंग्लंडमध्ये (England) ‘द हंड्रेड’ नावाने एक स्पर्धा खेळली जाते. त्याचवेळी टी 10 फॉर्मेटही मोठ्या प्रमाणात लोकप्रिय होतय. कॅरेबियन प्रीमियर लीगच्या आधी 10 ओव्हरचा एक फॉर्मेट लाँच होणार आहे. The 6IXTY नावाने हा फॉर्मेट ओळखला जाईल. 24 ते 28 ऑगस्ट दरम्यान सेंट किट्स मध्ये ही स्पर्धा खेळली जाईल. The 6IXTY लीग मध्ये 60 चेंडूंचा सामना होईल. पण याचे नियम टी 10 लीग पेक्षा खूप वेगळे असतील. या फॉर्मेटच्या नियमांबद्दल जाणून घ्या.

The 6IXTY टुर्नामेंटचे नियम

  1. The 6IXTY फॉर्मेटमध्ये 10 ऐवजी 6-6 विकेटचा खेळ होईल. म्हणजे 5 विकेट पडल्यानंतर टीम Allout.
  2. या फॉर्मेटमध्ये एक पावरप्ले 2 ओव्हरचा असेल. पण संघाला तिसऱ्या ओव्हरमध्येही पावरप्ले मिळू शकतो. फक्त त्यासाठी एक अट पूर्ण करावी लागेल. पावरप्लेमध्ये फलंदाजी करणाऱ्या टीमने पहिल्या दोन ओव्हरमध्ये दोन षटकार ठोकले, तर तिसरा पावरप्ले मिळेल.
  3. The 6IXTY मध्ये एका एन्डकडून 30 चेंडू टाकले जातील. त्यानंतर दुसऱ्या एन्डकडून 30 चेंडू. क्रिकेटमध्ये दर 6 चेंडूंनंतर एन्ड बदलतो.
  4. The 6IXTY फॉर्मेटमध्ये एखादा संघ 45 मिनिटात 10 ओव्हर्स पूर्ण करु शकला नाही, तर शेवटच्या ओव्हरमध्ये मैदानावरुन एक फिल्डर कमी करण्यात येईल.
  5. The 6IXTY मध्ये फॅन्सही मिस्ट्री फ्री हिट साठी व्होट करु शकतात. व्होटिंग APP आणि वेबसाइटच्या माध्यमातून यासाठी मतदान होईल. सामन्यादरम्यान फॅन्सना वाटलं की, एखादा चेंडू नो बॉल असायला पाहिजे होता, पण पंचांनी दिला नाही. तर व्होटिंगच्या माध्यमातून फ्री हिटचा निर्णय घेतला जाईल. फ्री हिटच्या नियमानुसार, फलंदाज त्या चेंडूवर बाद होणार नाही.

कुठले संघ खेळणार?

The 6IXTY स्पर्धेत CPL मधील सर्व सहा संघ सहभागी होतील. महिला सीपीएलमधल्या तीन संघांमध्येही या फॉर्मेटमध्ये सामना होईल. ही स्पर्धा कॅरेबियन प्रीमियर लीगच्या आधी होईल.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.