The Hundred : इंग्लंडच्या ‘अप्सरा’सारख्या महिला खेळाडूचा हवेत उडी मारत सुंदर झेल, व्हिडीओ एकदा पाहाच
इंग्लंडच्या महिला खेळाडूने घेतलेल्या एक कॅचचा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. इंग्लंडच्या एका खेळाडूने हवेत उडी मारत एका हातात झेल घेत सर्वांना अवाक् करून टाकलं. व्हिड़ीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

क्रिकेटच्या मैदानात अनेक अफलातून कॅच घेतलेले तुम्ही पाहिले असतील. आता महिला खेळाडूही दमदार फिल्डिंग करताना दिसत आहेत. अशातच इंग्लंडच्या महिला खेळाडूने घेतलेल्या एक कॅचचा व्हिडीओ व्हायरल झालेला पाहायला मिळत आहे. इंग्लंडमध्ये आता द-हंड्रेड लीग खेळवली जातेय. महिला आणि पुरूष दोन्ही स्पर्धा एकाचवेळी सुरू आहेत. ओव्हल इनविंसिबल्स वूमन्स आणि ट्रेंट रॉकेट्स वूमन्समधील सामन्यामध्ये इंग्लंडची खेळाडू मॅडी विलियर्सने हवेत उडी घेत कडक कॅच घेतला.
द – हंड्रेड स्पर्धेमध्ये 31 सामना ओव्हल इनविंसिबल्स वूमन्स आणि ट्रेंट रॉकेट्स वूमन्स यांच्यात पार पडला. पहिल्यांदा बॅटींगसठी उतरलल्या ट्रेंट रॉकेट्स संघाला 100 बॉलमध्ये फक्त 98 धावाच करता आल्या. ॲशले गार्डनर हिने 26 बॉलमध्ये 43 धावांची खेळी केली. यामध्ये तिने 5 चौकार आणि 2 षटकार मारले.
ओव्हल इनविंसिबल्स संघाकडून मारिझान कॅप हिने 20 बॉलमध्ये फक्त 8 धावा देत 3 विकेट घेतल्या तर तब्बल 12 डॉट बॉल टाकले. मारिझान कॅपला मिळालेल्या तीन विकेटमधील एक विकेट मिळण्यात मॅडी विलियर्सटा मोठा वाटा राहिला. मॅडी विलियर्सने हवेत उडी मारत एका हातात झेल घेत सर्वांना अवाक् करून टाकलं.
पाहा व्हिडीओ:-
😱 A one-handed catch! 😱
How good from Mady Villiers?! 🙇#TheHundred | #RoadToTheEliminator pic.twitter.com/eCBhW2k9ha
— The Hundred (@thehundred) August 14, 2024
दरम्यान, मारिजाने कॅप हिच्या गोलंदाजीवर ब्रायोनी स्मिथ हिने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण बॉल बॅटवर पूर्णपणे न बसल्याने 30 यार्डच्या आतमध्येच बॉल गेला. त्यावेळी मिड विकेटवर उभ्या असलेल्या मॅडी विलियर्सने डाव्या बाजूला उडी मारत एका हाताने कॅच पकडला.
