टेन्शन वाढले! टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूमची गुपिते माहिती असलेला खेळाडू श्रीलंकेत करणार कोंडी, झालं असं की..
भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होत आहे. ही मालिका भारतासाठी खूपच महत्त्वाची आहे. असं असताना भारतीय संघासमोर एका खेळाडूचं खूप मोठं आव्हान आहे. त्याला कारणही तसंच आहे. सर्व गुपितं माहिती असल्याने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.

India vs Sri Lanka: भारतीय संघ दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. हा दौरा भारतासाठी वाटतो तितका सोपा नाही. भारतीय संघासमोर बरीच आव्हानं या मालिकेत असणार आहेत. एक तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2027 ची अंतिम फेरी गाठण्याचं आव्हान असल्याने मालिका जिंकणं भाग आहे. त्यानंतर तिथल्या फिरकीला मदत करणाऱ्या खेळपट्ट्या पाहता सावधपणे सामना खेळावा लागणार आहे. असं असताना श्रीलंकेच्या गोटात असलेल्या एका खेळाडूमुळे टेन्शन वाढलं आहे. कारण या खेळाडूला भारतीय संघाच्या ड्रेसिंग रुममधील जवळपास सर्व गुपितं माहिती आहेत. भारताचं क्रिकेट आणि रणनिती काय असू शकते याचा अंदाज त्याला आहे. त्यामुळे भारतासाठी दोन सामन्यांची कसोटी मालिका वाटते तितकी सोपी नाही. चला जाणून घेऊयात त्या खेळाडूबाबत..
मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टनकडून टेन्शन!
श्रीलंकेच्या गोटात असलेला खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून गॅरी कर्स्टन आहे. दोन वर्षांसाठी श्रीलंकेच्या हेड कोचची जबाबदारी त्याच्या खांद्यावर टाकली आहे. गॅरी कर्स्टनने दक्षिण अफ्रिकन क्रिकेटसाठी बरंच योगदान दिलं आहे. त्यानंतर त्यांनी प्रशिक्षकपदाचा मार्ग स्वीकारला आणि टीम इंडियापासून सुरूवात केली. गॅरी कर्स्टन तीन वर्षे टीम इंडिया सोबत राहिले. त्याने 2008 ते 2011 या कालावाधीत भारताचं प्रशिक्षकपद भूषवलं. त्यांच्या कोचिंगमध्ये 2 एप्रिल 2011 मध्ये भारताने वनडे वर्ल्डकप जिंकला होता. इतकंच काय तर कसोटीमध्ये भारताने या कालावधीतच पहिलं स्थान पटकावलं होतं. तसं पाहिलं तर गॅरी कर्स्टन आणि टीम इंडियाचं नातं जुनं आहे. कोचिंग करून बराच अवधी उलटला असला तरी भारतीय क्रिकेटची समज आहे. गॅरी कर्स्टन यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीलंकन संघ योग्य रणनिती आखू शकते. त्यामुळे शुबमन गिलच्या नेतृत्वातील संघाच्या अडचणी वाढू शकतात.
भारत श्रीलंका कसोटी मालिका
भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी मालिकेला 15 ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. पहिला कसोटी सामना गॉलमध्ये खेळला जाणार आहे. त्यानंतर दुसरा कसोटी सामना 23 ऑगस्टपासून कोलंबोत असेल. या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय श्रीलंकेतील लोकल संघासोबत 7 ऑगस्टपासून तीन दिवसीय सराव सामना खेळणार आहे.