AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

2019 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान घेतलेल्या’त्या’ फोटोतील गूढ आता आलं समोर, मयांक अग्रवाल याने केला मोठा खुलासा

Mayank Agarwal : 2019 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान एक फोटो व्हायरल व्हायरल झाला होता. या फोटोत मयांक अग्रवाल, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, एमएस धोनी आणि ऋषभ पंत दिसत आहे. पण या फोटोतील एक गूढ समोर आलं होतं. त्याची उकल आता कुठे झाली आहे.

2019 वर्ल्डकप स्पर्धेदरम्यान घेतलेल्या'त्या' फोटोतील गूढ आता आलं समोर, मयांक अग्रवाल याने केला मोठा खुलासा
गेली चार वर्ष 'त्या' फोटोबाबत बरंच काही सांगितलं गेलं, आता मयांक अग्रवाल याने सत्य आणलं समोर
| Updated on: Sep 28, 2023 | 7:55 PM
Share

मुंबई : वनडे वर्ल्डकप 2019 स्पर्धा इंग्लंडमध्ये झाली. या स्पर्धेत टीम इंडियाचं आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आलं होतं. पण एका फोटोमुळे जोरदार चर्चा रंगली होती. या फोटोतील गूढ गेली चार वर्षे कायम होतं. या फोटोत एमएस धोनी, जसप्रीत बुमराह, मयांक अग्रवाल, ऋषभ पंत आणि हार्दिक पांड्या दिसत आहे. हा सेल्फी हार्दिक पांड्याने घेतला होता आणि सोशल मीडियावर पोस्ट केला होता. पण हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांनी कमेंटमध्ये प्रश्न विचारला होता. त्यामुळे कमेंट वाचल्यानंतर या फोटोत काहीतरी रहस्य आहे, अशी चर्चा रंगली होती. या फोटोला हार्दिक पांड्या याने बॉईज डे आऊट असं कॅप्शन दिलं होतं. फोटोत पाच जण दिसत आहेत. पण ऋषभ पंत यांच्या खांद्यावर ठेवलेला हात कोणाचा याबाबत प्रश्न पडला होता. आता कुठे चार वर्षांनी या प्रश्नाची उकल झाली आहे.

नेमकं काय आहे त्या गूढ फोटोत?

हार्दिक पांड्या याने हा फोटो 4 जुलै 2019 ला पोस्ट केला होता. भारताने बांगलादेश सामन्यापूर्वी हा फोटो समोर आला होता. ऋषभ पंत याच्या खांद्यावर हात कोणाचा आहे? धोनीचे दोन्ही हात स्पष्टपणे दिसत आहेत.बुमराहने दोन्ही हात धोनीच्या खांद्यावर ठेवले आहे. तर मयांक अग्रवाल एकदम पाठी उभा आहे. त्यामुळे इतक्या लांबून हात ठेवणं शक्य नाही, अशी थेअरी मांडण्यात आली.

अखेर या कोड्याचं उत्तर खुद्द मयांक अग्रवाल याने दिलं आहे. ट्विटरवर त्याने याबाबतचा खुलासा केला आहे. “बरीच वर्षे शोध घेतल्यानंतर, चर्चा आणि थेअरी मांडल्यानंतर मी देशाला यामागचं खरं सत्य सांगणार आहे. हा हात माझा असून मी ऋषभ पंतच्या खांद्यावर ठेवला आहे” , असं मयांक अग्रवाल याने सांगितलं. तसेच या फोटोबाबत ज्या अफवा उडाल्या आहेत त्या सर्व खोट्या आहेत, असंही त्याने पुढे सांगितलं.

जखमी विजय शंकर याच्या जागी मयांक अग्रवाल याला संघात संधी मिळाली होती. अष्टपैलू विजय शंकर पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिज विरुद्धचा सामना खेळला होता. मात्र पायाच्या बोटाला गंभीर दुखापत झाली आणि बरी होण्यासाठी 3 आठवड्यांचा अवधी पाहीजे होता. त्यामुळे 1 जुलैला आयसीसीने अग्रवालची रिप्लेसमेंट दिली.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.