IPL 2022, LSG vs RCB, Playing 11 : बंगळुरू आणि लखनौची एकच अडचण, नेमकी काय आहे अडचण, जाणू घ्या…

आज कोलकाताच्या ईडन गार्डनमध्येच लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने असणार आहे.

IPL 2022, LSG vs RCB, Playing 11 :  बंगळुरू आणि लखनौची एकच अडचण, नेमकी काय आहे अडचण, जाणू घ्या...
LSG vs RCB
Follow us
| Updated on: May 25, 2022 | 9:16 AM

मुंबई : आयपीएलच्या (IPL 2022) प्लेऑफ (IPL Playoff) राऊंड मंगळवारपासून सुरू झाला आहे. पहिल्या क्वार्टर फायनलमध्ये गुजरात टायटन्स (GT) आणि राजस्थान रॉयल्स (RR) अशी टक्कर रंगली. आज कोलकाताच्या ईडन गार्डनमध्येच लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आमने सामने असणार आहे. दोन्ही संघापैकी कोणता संघ पराभूत होईल ते स्पर्धेतून बाहेर जाईल. अशा स्थितीत या बाद फेरीच्या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमधील योग्य खेळाडूची निवड सर्वात महत्वाची आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांच्या इलेव्हनबद्दल बोलायचं झाल्यास त्यांच्या शेवटच्या सामन्यामधून फारसा बदल अपेक्षित नाही. आधी लखनौबद्दल बोलूया. तो संघ पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी आहे. केएल राहुल कर्णधार असलेल्या टीमने लीगच्या दरम्यान प्लेइंग इलेवनमध्ये जास्त बदल केलेला नाही.

फलंदाजीत कोणताही बदल नाही

लखनौने शेटच्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला हरवलं. ज्यामध्ये संघने तीन बदल केले. परंतु राहुल आणि डी कॉक या सलामीच्या जोडीने संपूर्ण 2o षटके खेळल्यामुळे त्यांना फलंदाजीसाठी काय बदल करण्याची संधी नाही मिळाली. संघाने या सामन्यासाठी एविन लुईस आणि मनन वोहराला सहभागी केलं होतं. मात्र, त्यांना फलंदाजी मिळालीच नाही. यातच त्यांना आता सामन्यात खेळवलं जाऊ शकतं. कारण मागच्या काही सामन्यापासून फलंदाजीकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे असं दिसून आलं. दुसरीकडे लखनौची गोलंदाजी एकदम उत्तम आहे. आवेश खान, मोहसिन खान, जेसन होल्डर यांच्या खेळीसोबत रवी बिश्नोई आणि क्रुणाल पंड्याच्या स्पिन जोडी चांगला प्रभाव पाडू शकते. क्रुणालची फिटनेस एक अडचण असू शकती. कारण, तो मागच्या सामन्यात नाही खेळू शकला.

हे सुद्धा वाचा

हर्षलच्या फिटनेचा मोठा प्रश्न

दुसरीकडे बंगळुरूने थोडे कष्ट आणि नशिबाच्या जोरावर शेवटचा संघ म्हणून प्लेऑफ गाठले. बंगळुरूने या मोसमातील बहुतांश प्रसंगी त्यांची प्लेइंग इलेवन कायम ठेवली आणि काही बदल केले. त्याचा परिणाम कामगिरीवरही दिसून आला आहे. विराट कोहली फॉर्ममध्ये परतताना दिसत असून अशा स्थितीत सलामी चांगली होण्याची अपेक्षा आहे. ही बंगळुरूसाठी दिलासादायक बाब आहे. रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक आणि महिपाल लोमोर यांनी ही फलंदाजी मजबूत केली आहे.

संभाव्य प्लेइंग इलेवन

लखनौ : केएल राहुल (कर्णधार), क्विंटन डी कॉक, एविन लुईस, दीपक हुडा, मनन वोहरा, मार्कस स्टॉइनिस, क्रृणाल पांड्या, जेसन होल्डर, मोहसीन खान, आवेश खान, रवी बिश्नोई

बंगळुरू : फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमोर्ड, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, हर्षल पटेल, जोश हेजलवूड, सिद्धार्थ कौल

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.