AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा एकाच ओव्हरमध्ये असा मोडला ‘घमंड’

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेला मिशेल स्टार्क याला शेवटच्या ओव्हरमध्ये हैदराबादच्या बॅट्समनने चांगलाच धुतला. शेवटच्या आणि निर्णायक ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कला चार सिक्स लागले. अतिशय रंजक झालेल्या या सामन्यात हैदराबादचा ४ धावांनी पराभव झाला.

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडूचा एकाच ओव्हरमध्ये असा मोडला 'घमंड'
| Updated on: Mar 24, 2024 | 1:50 PM
Share

आयपीएल 2024 : शनिवारी आयपीएल 2024 चा तिसरा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला गेला. केकेआरने हा सामना जिंकला. कोलकाताने हैदराबादचा 4 धावांनी पराभव केला. सनरायझर्स हैदराबाद 19व्या ओव्हरमध्ये आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या मिचेल स्टार्कला एका ओव्हरमध्ये चार सिक्स मारले आणि सामना पूर्णतः उलटला.

मिचेल स्टार्क सनरायझर्स हैदराबादकडून 19 वी ओव्हर टाकायला आला होता. हैदराबादला विजयासाठी 39 धावांची गरज होती. स्टार्क अप्रतिम बॉलिंग करुन सामना जिंकेल असं वाटत होतं. पण SRH चा पॉवर हिटर हेनरिक क्लासेनने स्टार्कच्या ओव्हरची सुरुवात सिक्सने केली. दुसऱ्या चेंडूवर एकही धाव मिळाली नाही. तिसरा चेंडू वाईड राहिला.

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूने (क्लासेन) सलग दोन चेंडूंवर 2 षटकार मारत आपले अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या चेंडूवर क्लासेनने सिंगल घेतली आणि आता शाहबाज अहमद स्ट्राईकवर होता. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्यानेही सिक्स मारला. अशाप्रकारे हैदराबादने स्टार्कच्या एका षटकात २६ धावा केल्या.

मिचेल स्टार्क हा आयपीएल इतिहासातील लिलावात विकला गेलेला सर्वात महागडा खेळाडू आहे. आयपीएल 2024 च्या मिनी लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने त्याला 24.75 कोटी रुपयांची मोठी रक्कम देऊन विकत घेतला.

4 धावांनी पराभव

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अशा परिस्थितीत कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 208 धावा केल्या. 209 धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्सने 7 विकेटच्या मोबदल्यात 204 धावा केल्या. केवळ 4 धावांनी त्यांचा पराभव झाला.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.