IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 साठी अशी आहे प्लेइंग इलेव्हन, टीम इंडियाची प्रथम फलंदाजी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरु आहे. भारताने या मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकत टीम इंडिया मालिका खिशात घालण्याच्या प्रयत्नात आहे. तर ऑस्ट्रेलिया मालिकेत कमबॅकसाठी सज्ज आहे. चला जाणून नाणेफेकीचा कौल आणि प्लेइंग इलेव्हन बाबत

IND vs AUS : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसऱ्या टी20 साठी अशी आहे प्लेइंग इलेव्हन, टीम इंडियाची प्रथम फलंदाजी
IND vs AUS : तिसऱ्या टी20 साठी दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काय बदल? जाणून घ्या नाणेफेकीचा कौल आणि इतर बाबी
Follow us
| Updated on: Nov 28, 2023 | 6:51 PM

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा टी20 सामना गुवाहटीच्या बरसापारा क्रिकेट मैदानात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना आहे. भारताने पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभवाच पाणी पाजलं आहे. मालिकेत 2-0 ने आघाडी घेतली आहे. भारताने तिसरा सामना जिंकताच मालिका खिशात घालणार आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय कितपत योग्य ठरतो हे येत्या चार तासात स्पष्ट होईल. ही खेळपट्टी फलंदाजांना मदत करणारी आहे. त्यामुळे मोठी धावसंख्या उभी राहील असा क्रीडा जाणकारांना अंदाज आहे. पण दव पडलं असल्याने गोलंदाजी करताना दुसऱ्या डावात अडचणींचा सामना करावा लागू शकतो.  याआधीच्या दोन सामन्यात दोनशेच्या पार धावा झाल्या होत्या. पहिल्या सामन्यात भारताने 209 धावांचं आव्हान पेललं होतं. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर 235 धावांचं आव्हान दिलं होतं. पण ऑस्ट्रेलियाला 191 धावाच करता आल्या.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू वेड म्हणाली की, आम्ही गोलंदाजी करू.दव लवकर स्थिरावला पाहिजे. मैदान आधीच खूप ओले आहे आणि एक मोठा घटक बनू शकतो. आम्ही दोन सामन्यात मागे पडलो, पण प्लेयर्स चांगल्या स्थितीत आहेत. हा सामना महत्त्वाचा आहे म्हणून ट्रॅव्हिस हेड, केन रिचर्डसन आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांना संघात स्थान दिलं आहे.

भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. मुकेश कुमार या सामन्यासाठी उपलब्ध नाही. त्यामुळे प्लेइंग इलेव्हनमध्ये आवेश खान याला संधी मिळाली आहे. सूर्यकुमार यादव याने नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर सांगितलं की, “प्रथम फलंदाजी करताना आनंद होत आहे. दव लवकर आल्याने आश्चर्य वाटले नाही. आम्हाला फक्त तेच करायचे आहे, गेम प्लॅन्स आहेत आणि स्वतःला व्यक्त करायचे आहे. आम्ही संघात एक बदल केला असून आवेशने मुकेशची जागा घेतली आहे. त्याचे लग्न होत आहे आणि आम्ही त्याला शुभेच्छा देतो.”

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

भारत (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, तिलक वर्मा, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, एरॉन हार्डी, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा, केन रिचर्डसन

Non Stop LIVE Update
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल
ईव्हीएमवरून ठाकरेंचे भाजपवर हल्लाबोल, फडणवीसांनी केला एकच सवाल.
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन
फडणवीसांवर अब्रुनुकसानीचा खटला दाखल करा, सुनेत्रा पवारांना कुणाच आवाहन.
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप
महिलाच्या आडून-लपून..., जरांगे पाटलांचा पुन्हा फडणवीसांवर गंभीर आरोप.
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना
शिंदे फडणवीस सरकारमुळे कलाकारांना राजाश्रय - सोनाली कुलकर्णीच्या भावना.
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?
कपिल पाटलांचा राजीनामा, नवा पक्ष स्थापन करणार; पक्ष सोडण्याच कारण काय?.
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार
यंदा भाकरी फिरणार...अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून तुफान प्रचार.
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?
माझी पोरं पण म्हणतात, ए बघ जरा आपली आई... सुळे नेमकं काय म्हणाल्या?.
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं
नवनीत राणा भाजपात प्रवेश करणार? पक्षप्रवेशाच्या चर्चेंवर स्पष्ट म्हटलं.
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास
अररर बाबा...कॉपी पुरवणाऱ्यांचा सुळसुळाट; विद्यार्थी पास, प्रशासन नापास.
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी
शेगांवच्या श्री संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भक्तांची मांदियाळी.