WTC फायनलच्या आठवडाभरानंतर साऊथीचा गौप्यस्फोट, ‘रोहितची विकेट मिळाली अन् न्यूझीलंडने…’

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या आठवडा भरानंतर न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने काही गुपितं उघड केलीत, काही इन्ट्रेस्टिंग खुलासे केलेत. (Tim Southee reveal Secret Rohit Sharma Wicket Delivery India vs New Zealand WTC Final 2021)

WTC फायनलच्या आठवडाभरानंतर साऊथीचा गौप्यस्फोट, 'रोहितची विकेट मिळाली अन् न्यूझीलंडने...'
टीम साऊथी आणि रोहित शर्मा
Follow us
| Updated on: Jun 29, 2021 | 8:52 AM

मुंबई :  जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2021) आठवडा भरानंतर न्यूझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज टीम साऊथीने (tim Southee) काही गुपितं उघड केलीत, काही इन्ट्रेस्टिंग खुलासे केलेत. रोहित शर्माची (Rohit Sharma) विकेट कशी प्लॅन करुन मिळवली, त्याच्या विकेटसाठी किती कष्ट घेतले, याचा खुलासा टीम साऊथीने केला होता. स्पर्धेच्या अगोदर खूप दिवस प्लॅन करत होतो. कष्ट करत होतो, त्याचं मिळाल्याची भावना टीम साऊथीने बोलून दाखवली. किवी संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा 8 विकेट्सने दणदणीत पराभव केलाय. (Tim Southee reveal Secret Rohit Sharma Wicket Delivery India vs New Zealand WTC Final 2021)

साऊथीची मास्टरक्लास गोलंदाजी

न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताचे दोन्ही सलामीवीर शुभमन गिल आणि रोहित शर्मा दुसर्‍या डावात टिम साउथीच्या बोलिंगवर आऊट झाले. हे दोन्ही बळी कीवी गोलंदाज साऊथीने त्याच्या मास्टरक्लास गोलंदाजीद्वारे टिपले. पहिल्यांदा त्याने गिलला थ्री क्वार्टर सीम बॉल टाकून तंबूत पाठवलं. हा चेंडू खेळपट्टीवर पडल्यानंतर आतमध्ये आला आणि गिलला काहीही समजण्यापूर्वी त्याला तंबूच्या दिशेने जायला लागलं. दुसरीकडे रोहित शर्मा ज्या चेंडूवर बाद झाला तो क्रिकेटमध्ये सारखा दिसत नाही, किंबहुना फार कमी गोलंदाजांकडे तो चेंडू टाकण्याची कला आहे. हा चेंडू आत आला पण रोहितला वाटलं की तो स्टम्पमध्ये जाणार नाही. असा विचार करून त्याने चेंडू सोडला आणि तो त्याच्या पॅडवर आदळला. पंचांनी त्याला एलबीडब्ल्यू घोषित केले.

माझ्याकडे स्पीड नाही पण…

मला वाटते कोणताही खेळाडू आपल्या खेळात सुधारणा करण्याचा प्रयत्न करतात. माझ्याकडे जास्त वेग नाहीय. त्यामुळे मला वेगळ्या मार्गाने विकेट घेण्याचा प्रयत्न करावा लागला. मी माझ्या आऊट स्विंगवर जास्त अवलंबून आहे. वैविध्य ठेवायला मला आवडतं किंबहुना ती माझी गरज आहे. परंतु ड्यूक बॉल कुकाबुरा बॉलपेक्षा अधिक स्विंग होतो, म्हणून या बॉलने खेळण्यासाठी मालिकेपूर्वी कठोर परिश्रम घ्यावे लागले. या दोन्ही बाजूंनी चेंडू स्विंग करण्यासाठी प्रयत्न करावे लागले..’

इंग्लंड दौऱ्यावर जाण्याआधी ते स्कील शिकून घेतलं…

न्यूझीलंडचे गोलंदाजी प्रशिक्षक शेन जर्गेसन म्हणाले की इंग्लंडला जाण्यापूर्वी टिम साऊथीने लिंकनच्या शिबिरामध्ये या नव्या बदलांवर काम केले. ते म्हणाले, ‘माझ्यामते रोहितच्या विकेटसाठी टिम बर्‍याच दिवसांपासून काही गोष्टींवर काम करत होती. साऊथी नेहमी सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. मला असे वाटते की आमच्या संघातील प्रत्येक गोलंदाजांच्या बाबतीत असेच आहे आणि गेल्या दोन वर्षांत त्याचे निकाल दिसून आले आहेत. त्याची सुरुवात मेमध्ये लिंकनमधील आमच्या शिबिराच्या दरम्यान झाली.”

“त्यावेळी साऊथी इनस्विंगवर काम करत होता. निकाल येणयासाठी त्याला थोडा वेळ लागला. यामध्ये चेंडू एखाद्या आउटस्विंगर सारखा पडत होता परंतु तो इनस्विंग करीत होता. यात कदाचित पारंपारिक इनस्विन्गरपेक्षा अधिक वेग असेल आणि त्याचे श्रेय टिम साऊथीला जाते. दुसऱ्या डावांत रोहितची विकेट मिळाली अन् न्यूझीलंडने तिथेच विजयाचा पाया रचल्याचं” शेन जर्गेसन म्हणाले.

(Tim Southee reveal Secret Rohit Sharma Wicket Delivery India vs New Zealand WTC Final 2021)

हे ही वाचा :

‘कॉफी विथ अनुष्का’, WTC पराभवाचं दु:ख विसरुन विराट कोहली रोमँटिक डेटवर!

भारत WTC फायनल सामन्यात पराभूत, विल्यमसन म्हणतो, ‘भारतीयांनो तुम्ही महान, एका मॅचमधून सगळंच कळत नसतं!’

यूएईमध्ये सामने, मात्र आयोजनाचे अधिकार भारताकडेच, T20 वर्ल्डकपसंदर्भात मोठा निर्णय, पाहा शेड्यूल….

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.