RCB vs CSK : छोट्या ग्राऊंडवर मोठी फटकेबाजी करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज, धावांचा पाऊस पडणार?

रंगतदार सुरु असलेल्या आयपीएलमधील आजचा चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चँलेजर्स बंगळुरु यांच्यातील सामना अधिक रंगतदार असणार आहे. यामागे एक खास कारण आहे.

RCB vs CSK : छोट्या ग्राऊंडवर मोठी फटकेबाजी करण्यासाठी दोन्ही संघ सज्ज, धावांचा पाऊस पडणार?
आरसीबी विरुद्ध सीएसके

IPL 2021: यंदाची आयपीएल स्पर्धा (IPL 2021) अगदी रंगतदार सुरु आहे. राजस्थानने अखेरच्या षटकात पंजाबवर मिळवलेला विजय किंवा गुणतालिकेत खालच्या स्थानी असलेल्या केकेआरने बलाढ्य मुंबईला नमवलेला सामना सारचं भारी सुरु आहे. अशामध्ये आज होणारा चेन्नई सुपरकिंग्स (CSK) आणि रॉयल चँलेजर्स बंगळुरु (RCB) यांच्यातील सामनाही भारी ठरणार आहे. यामागे एक खास कारण आहे, ते म्हणजे सामना खेळवण्यात येणारं शारजाहचं मैदान (Sharjah Stadium).

इतर मैदानांच्या तुलनेत छोटं असणारं शारजाहचं मैदान अगदी पूर्वीपासून धडाकेबाज फलंदाजीसाठी प्रसिद्ध आहे. शारजाहवर क्रिकेटचा देव सचिनची ऑस्ट्रेलिया विरुद्धची 134 धावांची तुफानी खेळी असेल किंवा मागील काही वर्षांपासून आयपीएलमधील धुरंधर खेळाडूंची षटकांची आतषबाजी. साऱ्यासाठी शारजाह प्रसिद्ध आहे. त्यामुळे आजही सीएसके आणि आरसीबी हे संघ एक या छोट्या ग्राऊंडवर मोठी फटकेबाजी करुन मोठी धावसंख्या उभी करण्याची दाट शक्यता आहे. त्यातच दोन्ही संघ गुणतालिकेत दुसऱ्या आणि तिसऱ्य़ा स्थानावर असल्याने पुढे कोणता संघ पोहोचणार हे पाहण्यासाठी आजच्या सामन्याकडे सर्वांचेच लक्ष्य लागून आहे.

सीएसके विरुद्ध आरसीबी Head To Head

आतापर्यंत झालेल्या आयपीएल स्पर्धांमध्ये सीएसके आणि आरसीबी 26 वेळा आमने सामने आले आहेत. यामध्ये चेन्नईचे पारडेच जड असून त्यांनी तब्बल 17 वेळा विजय मिळवला आहे. तर आरसीबी 9 वेळाच विजय मिळवू शकली आहे. आज होणारा सामना शारजाहच्या स्टेडियममध्ये होणार आहे. या मैदानाचा विचार करता षटकारांची बरसात होण्याची मोठी शक्यता आहे. त्यामुळे आजचा सामना क्रिकेट रसिकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.

आजच्या सामन्यात दोन्ही संघाचे संभाव्य 11

 रॉयल चँलेजर्स बंगळुरु- विराट कोहली (कर्णधार), देवदत्त पडीक्कल, केएस भारत, ग्लेन मॅक्सवेल, एबी डीव्हिलीयर्स, सचिन बेबी, वनिंजू हसरंगा, कायल जेमिसन, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युझवेंद्र चहल.

चेन्नई सुपरकिंग्स –एमएस धोनी (कर्णधार-विकेटकीपर), ऋतुराज गायकवाड़, फाफ डुप्लेसी, मोईन अली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रवींद्र जाडेजा, ड्वेन ब्रावो, शार्दुल ठाकूर, दीपक चाहर, जॉश हेजलवुड

हे ही वाचा

Hardik Pandya : मुंबईच्या दोन्ही सामन्यात संधी नाही, हार्दिक पंड्या T 20 विश्वचषकातूनही बाहेर पडणार?

IPL 2021: आधी गोलंदाजांनी जखडलं, मग अय्यर-त्रिपाठीने फोडलं, KKR चा मुंबईवर 7 विकेट्सनी विजय

Eoin Morgan : मुंबईविरुद्ध सोपा विजय, तरीही कोलकाताच्या कर्णधाराला मोठा झटका

(Todays IPL match between CSK vs RCB will be played on Sharjah Stadium so big score will be on score board)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI