AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

U19 World Cup | सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित, टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?

U 19 World Cup 2024 Semi Final | अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये पोहचण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा कायम राखली आहे. सेमी फायनलसाठी एकूण 4 संघ निश्चित झाले आहेत.

U19 World Cup | सेमी फायनलसाठी 4 संघ निश्चित, टीम इंडियासमोर कुणाचं आव्हान?
| Updated on: Feb 04, 2024 | 10:46 AM
Share

मुंबई | अंडर 19 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेचा थरार गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. साखळी फेरी पार पडल्यानंतर शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी सुपर 6 फेरीतील अखेरचा सामना पार पडला आणि सेमी फायनलसाठी 4 संघ अखेर निश्चित झाले. आता या 4 संघांमध्ये एका ट्रॉफीसाठी चांगलीच रस्सीखेच आणि चढाओढ पाहायला मिळणार आहे. पाकिस्तानने बांगलादेशवर 5 धावांनी थरारक विजय मिळवला. पाकिस्तान यासह सेमी फायनलमध्ये पोहचणारी चौथी टीम ठरली. त्याआधी टीम इंडिया, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीसाठी क्वालिफाय केलं होतं.

पहिला सेमी फायनल सामना केव्हा?

अंडर 19 वर्ल्ड कप 2024 मधील पहिला सेमी फायनल सामना हा मंगळवारी 6 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आमनेसामने असणार आहेत. तर दुसरा सामना हा 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सामन्यात टीम इंडियाला फायनलमध्ये पोहचण्यासाठी दक्षिण आफ्रिके विरुद्ध 2 हात करावे लागणार आहेत. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल.

टीम इंडिया अजिंक्य

दरम्यान टीम इंडियाने या स्पर्धेत उदय सहारन याच्या नेतृत्वात सर्व सामने जिंकले आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीत सलग 3 आणि त्यानंतर सुपर 6 मध्ये दोन्ही सामन्यात विजय मिळवला. विशेष बाब म्हणजे टीम इंडियाने हे पाचही सामने धावांनी जिंकले आहेत. टीम इंडियाने साखळी फेरीत अनुक्रमे बांगलादेश, आयर्लंड आणि यूनाटेड स्टेटसचा धुव्वा उडवला. तर त्यानंतर सुप 6 मध्ये न्यूझीलंड आणि त्यानंतर नेपाळला पराभूत केलं.

सेमी फायनलसाठी 4 टीम फिक्स

टीम इंडियाचे शतकवीर

टीम इंडियाच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत उल्लेखनीय कामगिरी केली. मुशीर खान याने आयर्लंड विरुद्ध 118 धावांची खेळी केली. त्यानंतर यूनायटेड स्टेटस विरुद्ध सोलापूरच्या अर्शीन कुलकर्णी याने शतक झळकावलं. त्यानंतर पुन्हा मुशीर खान याने शतकी खेळी करत 131 धावा केल्या. मुशीरने न्यूझीलंड विरुद्ध हा धमाका केला. तर त्यानंतर बीडच्या सचिन धस आणि उदय सहारन या जोडीने नेपाळ विरुद्ध शतकी खेळी केली. सचिनने 116 आणि उदयने 100 धावा केल्या.

वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया | उदय सहारन (कर्णधार), आदर्श सिंग, अर्शीन कुलकर्णी, मुशीर खान, सचिन धस, प्रियांशू मोलिया, अरावेली अवनीश (विकेटकीपर), मुरुगन अभिषेक, सौम्य पांडे, राज लिंबानी, नमन तिवारी, आराध्या शुक्ला, इनेश महाजन, धनुष गौडा, रुद्र पटेल , प्रेम देवकर , मोहम्मद अमान आणि अंश गोसाई.

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.