
अंडर 19 वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या 23व्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात श्रीलंकेची वाट लागली. नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारली. हा निर्णय सर्वच बाजूने योग्य ठरला. कारण श्रीलंकेने फलंदाजी करतानाच नांगी टाकली होती. श्रीलंकेचा संपूर्ण संघ 18.5 षटकात 58 धावांवर बाद झाला. या सामन्यात श्रीलंकेचे 8 खेळाडू एकेरी धावांवर राहिले. तर एका खेळाडूला खातंही खोलता आलं नाही. कविजा गामजेने 10 आणि चमिका हीनातिगाला याने 14 धावा केल्या. म्हणजेच एकाही खेळाडूला 20 धावांचा आकडा गाठता आला नाही. हे आव्हान ऑस्ट्रेलियाने सहज गाठलं. यासाठी फक्त एक विकेट गमवावी लागली. ऑस्ट्रेलियाने 12 षटकात 1 गडी गमवून दिलेलं आव्हान गाठलं.
नामिबियाच्या विंडहोकमध्ये 23 जानेवारीला हा सामना खेळला गेला. या सामन्यात श्रीलंकेची सुरूवात संथ गतीने आणि विकेटने झाली. या डावाच्या तिसऱ्या षटकापासून श्रीलंकेला धक्के मिळण्यास सुरुवात झाली. संघाची धावसंख्या 3 असताना दोन विकेट पडल्या. दोन्ही विकेट चार्ल्स लॅछमंडने घेतल्या. त्यानंतर विल बायरॉम आला आणि त्याने श्रीलंकन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवण्यास सुरुवात केली. त्याच्या भेदक माऱ्यापुढे श्रीलंकेचा संघ अवघ्या 58 धावांवर बाद झाला. विल बायरॉमने 6.5 षटकं म्हमजे 41 चेंडू टाकले. यात त्याने श्रीलंकेचा निम्मा संघ तंबूत पाठवला. त्याने 6.5 षटकात फक्त 14 धावा दिल्या आणि पाच विकेट काढल्या.
A dominant display from Australia to remain unbeaten heading into the Super Six 💪#U19WorldCup 📝: https://t.co/qdGwnBph0E pic.twitter.com/909ch2sia8
— ICC Cricket World Cup (@cricketworldcup) January 23, 2026
ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेने दिलेलं आव्हान सहज गाठलं. पहिल्या षटकात विल मलाजुकची विकेट तेवढी श्रीलंकेला मिलाली. त्याने मागच्या सामन्यात सर्वात वेगवान शतक ठोकलं होतं. मात्र त्यानंतर एकही विकेट हाती लागली नाही. उलट लाजिरवाण्या पराभवाला सामोरं जावं लागलं. ऑस्ट्रेलियाने 62 धावा केल्या आणि 9 विकेट राखून हा सामना जिंकला. श्रीलंकेचा कर्णधार विमथ दिनसारा म्हणाला की, निराश आहोत. त्यांनी खरोखरच चांगली गोलंदाजी केली पण आज आपला दिवस नव्हता. पुढच्या फेरीसाठी पात्र ठरल्याबद्दल खूप आनंद झाला. प्रत्येक सामन्यावर लक्ष केंद्रित करू आणि आमचे सर्वोत्तम प्रयत्न करू.