Asia Cup 2025 : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान सामना रद्द? मोठी अपडेट समोर
India vs Pakistan Match Asia Cup 2025 : बहुप्रतिक्षित आणि आगामी आशिया कप 2025 स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामना हा 14 सप्टेंबरला होणार आहे. मात्र त्याआधी या सामन्याला तीव्र आणि वाढता विरोध आहे. त्यात आता या सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

आशिया कप 2025 स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. यंदा गतविजेत्या भारताकडे या स्पर्धेच्या यजमानपदाचा मान आहे. मात्र त्यानंतरही या स्पर्धेतील सर्व सामने हे यूएईमध्ये आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेत एकूण 8 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेत 14 सप्टेंबरला भारत विरुद्ध पाकिस्तान महामुकाबला होणार आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर अनेक बाबतीत बहिष्कार घातला आहे. याला क्रीडा क्षेत्रही अपवाद नाही. भारतीय संघाने वर्ल्ड चॅम्पियन्स लिजेंड 2025 स्पर्धेतही पाकिस्तान विरूद्धच्या एकूण 2 सामन्यांवर बहिष्कार घातला. त्यानंतर आशिया कप स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याला वाढता विरोध आहे. त्यानंतर आता या स्पर्धेतील भारत-पाकिस्तान सामन्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
सामना रद्द होणार?
भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार का? यापेक्षा टीम इंडियाच या सामन्यावर बहिष्कार घालणार का? या भूमिकेकडेही क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आहे. भारतीय संघाने पाकिस्तान विरुद्ध खेळू नये, अशी भारतीय क्रिकेट चाहत्यांची भावना आहे. वर्ल्ड चॅम्पियन्स ऑफ लिजेंड्स स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी साखळी फेरीनंतर उपांत्य फेरीत पाकिस्तान विरुद्ध खेळण्यास नकार दिला. त्यामुळे आता आशिया कप स्पर्धेतही चाहत्यांना भारतीय संघाकडून अशाच भूमिकेची आशा आहे. या सामन्याबाबत यूएई क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी काय म्हटलं हे सविस्तर जाणून घेऊयात.
यूएई क्रिकेट बोर्डाचे ऑपरेटिंग ऑफीसर सुभान अहमद यांच्यानुसार, आशिया कप स्पर्धेत या दोन्ही संघात सामना होणार आहे. “आम्ही कोणतीही हमी देऊ शकत नाही. मात्र आशिया कप स्पर्धेची तुलना डब्ल्यूसीए सारख्या स्पर्धेसह करणं योग्य नाही”, असं द नेशनलने सुभान यांच्या हवाल्याने म्हटलं आहे.
सुभान अहमद म्हणाले?
आशिया कप स्पर्धेत सहभागी होण्याआधी सरकारची परवानगी घेतली जाते. त्यामुळे या स्पर्धेत Wcl सारखं काही होणार नाही, अशी आशा आहे”, असंही सुभान यांनी नमूद केलं आणि भारत-पाकिस्तान सामना होऊ शकतो, असा आशावाद व्यक्त केला.
दरम्यान याआधी क्रिकेट चाहत्यांना भारत-पाकिस्तान सामन्याची कायमच प्रतिक्षा असायची. चाहत्यांना भारतीय संघ पाकिस्तानला कशी पराभूत करते हे पाहण्यासाठी चाहते उत्साही असायचे. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांच्या मृत्यूनंतर भावना तीव्र झाल्या. संतापाची लाट उसळली. त्यामुळे पाकिस्तानसोबत कोणत्या प्रकारचे संबंध नको, अशी भावना भारतीयांची आहे.
