Saurabh Netravalkar: सूर्यकुमारचा कॅच सोडणं महागात पडलं, सौरभने ऑन कॅमेरा सांगितलं…

Saurabh Netravalkar dropped Suryakumar Yadav catch: सौरभ नेत्रवाळकर याने आपला माजी सहकारी असलेला सूर्यकुमार यादव आता आंतरराष्ट्रीय पातळीवर निर्णायक सामन्यात कॅच सोडला. सौरभने कॅच सोडला तेव्हा सूर्या अवघ्या 1 धावेवर खेळत होता.

Saurabh Netravalkar: सूर्यकुमारचा कॅच सोडणं महागात पडलं, सौरभने ऑन कॅमेरा सांगितलं...
Saurabh Netravalkar dropped Suryakumar Yadav catch
Follow us
| Updated on: Jun 13, 2024 | 12:28 AM

टीम इंडियाने आयसीसी टी 20 वर्ल्ड कप 2024 स्पर्धेतील 25 व्या सामन्यात यजमान यूनायटेड स्टेटसचा पराभव करुन सुपर 8 फेरीत प्रवेश केला. टीम इंडियाने यूएसएने विजयासाठी दिलेल्या 111 धावांचं आव्हान 3 विकेट्स गमावून सहज पूर्ण केलं, मात्र त्याआधी आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची बिकट स्थिती झाली होती. मुळ मुंबईकर असलेला यूएसएचा गोलंदाज सौरभ नेत्रवाळकर याने विराट कोहली याला झिरोवर आऊट केलं. इतकंच नाही, तर कॅप्टन रोहित शर्मा याला 3 धावांवर मैदानाबाहेरचा रस्ता दाखवत टीम इंडियाची स्थिती 2 बाद 10 अशी केली. त्यानंतर ऋषभ पंत 18 धावा करुन आऊट झाला. टीम इंडियाचा स्कोअर 3 आऊट 39 असा झाला. मात्र त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 67 धावांची नाबाद विजयी भागीदारी केली. सौरभकडून या भागीदारीदरम्यान एक मोठी घोडचूक झाली. सौरभने सूर्याचा निर्णायक कॅच सोडला. सौरभने या कॅचबाबत यूएसएच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली. सौरभ काय म्हणाला? हे जाणून घेऊयात.

सौरभ नेत्रवाळकर काय म्हणाला?

सौरभने आपल्या कोट्यातील 4 ओव्हरमध्ये 18 धावांच्या मोबदल्याच विराट आणि रोहित यांची विकेट घेतली. यूएसएने टीम इंडियावर घट्ट पकड मिळवली होती. सौरभने सूर्याचा कॅच पकडला असता तर ती पकड आणखी घट्ट झाली असती, मात्र सौरभने तो कॅच सोडला. सौरभने टीम इंडियाच्या डावातील 13 व्या ओव्हरमधील चौथ्या बॉलवर सूर्या 1 धावेवर असताना कॅच सोडला. सौरभने उलट दिशेने धावत कॅच घेण्याचा प्रयत्न केला. सौरभच्या हातात कॅच जवळपास आला होता. मात्र अखेरच्या क्षणी निसटला. सूर्याला अशाप्रकारे 1 धावेवर जीवनदान मिळालं. सूर्याने याचा फायदा घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला आणि नाबाद 50 धावांची खेळी केली. सौरभने यूएसएच्या पराभवानंतर माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह आणि नवजोत सिंह सिधू यांच्याची संवाद साधला. सौरभने या दरम्यान या 2 माजी क्रिकेटपटूंच्या विविध प्रश्नांची उत्तर दिली. सौरभने या दरम्यान “सूर्याचा कॅच महागात पडला”, असं म्हटलं.

युनायटेड स्टेट्स प्लेइंग ईलेव्हन: आरोन जोन्स (कर्णधार), स्टीव्हन टेलर, शायन जहांगीर, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), नितीश कुमार, कोरी अँडरसन, हरमीत सिंग, शॅडली व्हॅन शाल्कविक, जसदीप सिंग, सौरभ नेत्रवाळकर आणि अली खान.

टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कॅप्टन), विराट कोहली, ऋषभ पंत, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज.

Non Stop LIVE Update
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.