AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढच्या सामन्यात बघूयात..! प्रफुल हिंगेने विकेट काढल्यानंतर केलेल्या वक्तव्यावर वैभवचे प्रशिक्षक संतापले

आयपीएल स्पर्धेत वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ घोंघावत आहे. पण प्रफुल हिंगेने या वादळाला पहिल्याच चेंडूवर रोखलं. त्यामुळे सनरायझर्स हैदराबादचा विजय सोपा झाला. आता वैभव सूर्यवंशी विरुद्ध प्रफुल हिंगे असं नवं द्वंद्व सुरू झाला आहे.

पुढच्या सामन्यात बघूयात..! प्रफुल हिंगेने विकेट काढल्यानंतर केलेल्या वक्तव्यावर वैभवचे प्रशिक्षक संतापले
पुढच्या सामन्यात बघूयात..! प्रफुल हिंगेने विकेट काढल्यानंतर केलेल्या वक्तव्यावर वैभवचे प्रशिक्षक संतापलेImage Credit source: PTI
| Updated on: Apr 14, 2026 | 6:03 PM
Share

Vaibhav Sooryavanshi vs Praful Hinge: आयपीएल 2026 स्पर्धेत आता नवं द्वंद्व सुरू झालं आहे. सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज प्रफुल हिंगे आणि राजस्थान रॉयल्सचा आक्रमक फलंदाज वैभव सूर्यवंशी यांच्यात सामना पाहायला मिळणार आहे. कारण या स्पर्धेत दोन्ही संघांचा पहिला सामना पार पडल्यानंतर शाब्दिक चकमक सुरू झाली आहे. आयपीएल स्पर्धेतील 21व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादच्या प्रफुल हिंगेने वैभव सूर्यवंशीसह चार जणांना तंबूचा रस्ता दाखवला. त्याच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थान रॉयल्सचा संघ बॅकफूटवर गेला. त्याने पहिल्या षटकात तीन विकेट काढल्या. आतापर्यंत लीग स्पर्धेच्या इतिहासात अशी कामगिरी कोणी केली नाही. या तीन विकेटमध्ये पहिली विकेट वैभव सूर्यवंशीची होती. त्याला खातंही खोलता आलं नाही. या सामन्यास सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा 57 धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर प्रफुल हिंगेने सर्वोत्तम विकेट ही वैभव सूर्यवंशीची होतं असं सांगितलं.

प्रफुल हिंगेने सामनावीराचा पुरस्कार मिळाल्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या विकेटबाबत भाष्य केलं. कारण वैभव सूर्यवंशी या स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात आहे. त्याने दिग्गज गोलंदाजांना दिवसा तारे दाखवले आहेत. पण हिंगेच्या पहिल्याच चेंडूवर त्याला बाद होत तंबूत परतावं लागलं. दिग्गज गोलंदाजांना जे जमलं नाही ते प्रफुल हिंगेने केलं. या विकेटबाबत हिंगेने केलेलं वक्तव्य सोशल मीडियावर वेगाने वायरल होत आहे. हिंगेने सांगितलं की, सामन्यापूर्वीच सहकाऱ्यांना सांगितलं होतं की वैभव सूर्यवंशीला पहिल्याच चेंडूवर बाउंसर टाकून बाद करेल. मी फक्त त्यालाच आऊट करू इच्छित होतो.

प्रफुल हिंगेच्या या वक्तव्यानंतर वैभव सूर्यवंशीच्या प्रशिक्षक मनीष ओझा यांचा संताप झाला आहे. त्यांनी टीव्ही 9 हिंदीशी चर्चा करताना सांगितलं की, ‘जर एखादा खेळाडू बोलून शतक झळकावत असेल किंवा विकेट घेत असेल, तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्यापेक्षा मोठा खेळाडू असू शकत नाही, असे मला वाटते. क्रिकेट मैदानावर खेळला जातो, बोलून नाही. हो, हिंगेने चांगली गोलंदाजी करून विकेट घेतली, पण गोलंदाज आधीच बोलून कोणाला बाद करू शकतो यावर माझा विश्वास नाही. जर तो बोलून कोणाला बाद करू शकत असेल, तर पुढच्या सामन्यात तो काय करतो ते पाहूया.’

वैभव सूर्यवंशी आणि प्रफुल हिंगे यांचा या स्पर्धेत पुन्हा आमनासामना होणार आहे. हा सामना 25 एप्रिलला जयपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात कोण वरचढ ठरतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. त्यामुळे या सामन्याची रंगत आणि ओढ शा‍ब्दिक चकमकीमुळे आणखी वाढली आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...