AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला फलंदाजीही करू दिली नाही, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी धक्कादायक निर्णय

भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा टी20 सामना मॅन्चेस्टर येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीला जागा मिळणार की नाही? याची चर्चा सुरू आहे. असं असताना संघ व्यवस्थापनाने एक धक्कादायक निर्णय घेतला. त्यामुळे वैभवच्या चाहत्यांना धक्का बसला आहे.

IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला फलंदाजीही करू दिली नाही, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी धक्कादायक निर्णय
IND vs ENG: वैभव सूर्यवंशीला फलंदाजीही करू दिली नाही, दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी धक्कादायक निर्णयImage Credit source: GETTY IMAGES
| Updated on: Jul 03, 2026 | 8:48 PM
Share

Vaibhav Sooryavanshi: भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून पाच सामन्यांची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवून आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. असं असताना दुसऱ्या सामन्यात वैभव सूर्यवंशीला प्लेइंग 11 मध्ये स्थान मिळणार का? याची चर्चा रंगली आहे. पण आता एका बातमीने त्याच्या चाहत्यांचा हिरमोड होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, वैभव सूर्यवंशीला मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डमध्ये होणाऱ्या टी20 सामन्यात संधी मिळणार नाही. दुसऱ्या टी20 सामन्यापूर्वी भारतीय संघाने नेट्समध्ये घाम गाळला. पण आश्चर्याची बाब म्हणजे या सरावात वैभव सूर्यवंशीला फलंदाजीची संधी मिळाली नाही. त्यामुळे दुसऱ्या टी20 सामन्यातही वैभव सूर्यवंशीला बेंचवरच बसावं लागेल हे स्पष्ट दिसत आहे.

संजू सॅमसन खेळणार!

मॅन्चेस्टर टी20 सामन्यापूर्वी टीम इंडियाने सराव केला. या सरावात पहिल्या सामन्यात फेल गेलेल्या संजू सॅमसनने खूप मेहनत घेतली. आयर्लंडविरुद्धच्या मालिकेतही काही खास करू शकला नव्हता. त्याने मालिकेतील दोन सामन्यात फक्त 6 धावा केल्या. तर इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात फक्त 1 धाव करून बाद झाला. त्यामुळे त्याच्या जागी वैभवला संधी द्यावी, असा एक मतप्रवाह होता. मात्र संजू प्लेइंग 11 चा भाग असेल हे स्पष्ट दिसत आहे.

वैभवसाठी रणनिती तयार

वैभव सूर्यवंशी इंग्लंडविरुद्ध खेळणार की नाही हे अद्याप अस्पष्ट आहे. पण त्याच्यासाठी इंग्लंड संघाने रणनिती आखली आहे. हॅरी ब्रूकनंतर सॅम करननेही सांगितलं की, 15 वर्षीय फलंदाजासाठी पूर्णपणे तयार आहोत. इंग्लंडची खेळपट्टी भारतापेक्षा वेगळी आहे. ही खेळपट्टी संथ आहे आणि वैभवला येथे धावा करणं सोपं नसेल. सूर्यवंशी चांगला खेळाडू आहे. पण त्यालाही इतर खेळाडूंप्रमाणे चांगले वाईट दिवस पाहावे लागतील.

वैभवला संधी द्या, कपिल देव यांची सूचना

वैभव सूर्यवंशीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळावी यासाठी एक मतप्रवाह आपली बाजू जोरकसपणे मांडत आहे. दुसरीकडे, माजी कर्णधार कपिल देव यांनीही वैभव सूर्यवंशीला संधी मिळायला हवी असं सांगितलं आहे. कपिल देव यांनी सांगितलं की, सूर्यवंशीकडेही सचिन आणि विराटसारखं टॅलेंट आहे. दुसरीकडे, रवि शास्त्रीही समालोचन करताना वैभव सूर्यवंशीला संधी देण्याची मागणी करत आहेत. पण टीम इंडियाचा प्लान काही वेगळाच असल्याचं दिसत आहे.

Follow Us
त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
Video | त्र्यंबकेश्वर ज्योर्तिलिंग मंदिरात १२ ऑक्टोबरपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद
विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
Video : विजय वडेट्टीवार यांचा सत्ताधाऱ्यांवर मतचोरीचा आरोप; आंदोलनाचा इशारा
महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद
Video : महाराष्ट्रातून मान्सूनची माघार, दुष्काळाचं संकट गडद, पीक नुकसान, पाणीटंचाईचे भीषण संकट.
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का
नाशिक TCS धर्मांतरण प्रकरण, निदा खानला आणखी एक धक्का, नवऱ्याने उचललं मोठं पाऊल
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही...
गर्जना मोर्चा ही फक्त झलक; सत्ताधाऱ्यांना जनतेचा रोष कळला नाही... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारल
उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल; ‘व्होटचोरी’पासून दुष्काळापर्यंत सरकारला घेरलं!
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं...
ज्ञानेश कुमारचं थोबाड लावून... भाषणाच्या सुरुवातीलाच राज ठाकरे असं काय म्हणाले?
निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
Raj Thackeray MNS | निवडणुकीनंतर महाराष्ट्रात सन्नाटा हा कसला विजय होता? -राज ठाकरे
ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
Thackeray Garjana Morcha : ठाकरे बंधूंच्या गर्जाना मोर्चात तुफान गर्दी, ड्रोनदृश्य पहाच
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल,
राजा- उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात एकाच गाडीतून मोर्चास्थळी दाखल, मोर्चाला सुरुवात