IND vs AUS Test : Venkatesh Prasad यांनी केएल राहुलच्या बाबतीत सत्य समोर आणलं, BCCI कडे उत्तर आहे का?

KL Rahul Selection : खरंतर केएल राहुलची कामगिरी खूपच खराब आहे. त्यामुळे त्याच्या निवडीवर अनेकांना आश्चर्य वाटतय. वेंकटेश प्रसाद, तर सातत्याने केएल राहुलच्या टीममधील निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत.

IND  vs AUS Test : Venkatesh Prasad यांनी केएल राहुलच्या बाबतीत सत्य समोर आणलं, BCCI कडे उत्तर आहे का?
venkatesh prasad - KL RahulImage Credit source: AP/Instagram
Follow us
| Updated on: Feb 20, 2023 | 12:25 PM

KL Rahul Selection : ऑस्ट्रेलिया विरुद्ध उर्वरित दोन कसोटी सामने आणि वनडे सीरीजसाठी टीम जाहीर झाली आहे. टीम इंडियात पुन्हा एकदा केएल राहुलला स्थान मिळालय. खरंतर केएल राहुलची कामगिरी खूपच खराब आहे. त्यामुळे त्याच्या निवडीवर अनेकांना आश्चर्य वाटतय. वेंकटेश प्रसाद, तर सातत्याने केएल राहुलच्या टीममधील निवडीवर प्रश्नचिन्ह निर्माण करतायत. केएल राहुलमुळे शुभमन गिलसह अन्य टॅलेंटेड खेळाडूंवर अन्याय होतो, असं त्यांचं म्हणणं आहे. केएल राहुलची टीममध्ये निवड झाल्यानंतर वेंकटेश प्रसाद यांनी काही आकडे सादर केलेत. या आकड्यांवरुन वेंकटेश प्रसाद यांनी केएल राहुलपेक्षा शिखर धवनची कामगिरी किती चांगली आहे, ते दाखवून दिलय. वास्तव हे आहे की, शिखर धवन आज क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटपैकी एकाही टीममध्ये नाहीय.

आकडे दाखवून पोल-खोल

नागपूर त्यानंतर दिल्ली कसोटीत केएल राहुलला प्लेइंग 11 मध्ये स्थान देण्यावर वेंकटेश प्रसाद यांनी प्रश्न उपस्थित केले होते. यावरुन टि्वटरवर त्यांचा काही दिग्गज भारतीय क्रिकेटपटूंसोबत वादविवाद झाला. आता केएल राहुलची बॉर्डर-गावस्कर सीरीजच्या तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी टीममध्ये निवड झालीय. त्यावेळी वेंकटेशन प्रसाद यांनी आकडे दाखवून राहुलची पोल-खोल करण्याचा प्रयत्न केलाय.

दोघांमध्ये सर्वोत्तम कोण?

वेंकटेश प्रसाद यांनी लेटेस्ट टि्वटमध्ये केएल राहुल आणि शिखर धवन यांचे आकडे समोर ठेवलेत. दोघांमध्ये सर्वोत्तम कोण? हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. ओपनर म्हणून कोणाची कामगिरी उजवी आहे? ते प्रसाद यांनी सांगितलय. प्रसाद यांनी आकड्यांच्या माध्यमातून केएल राहुलवर निशाणाच साधला नाही, तर आपल्या स्टाइलमध्ये सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह निर्माण केलय. शिखर धवन केएल राहुलपेक्षा चांगला ओपनर असल्याचं सांगितलं. कोणाची कामगिरी सरस?

मायदेशात टेस्ट मॅच असो किंवा परदेशात केएल राहुलपेक्षा शिखर धवनची कामगिरी सरस आहे. त्याची सरासरी बेस्ट आहे. राहुलपेक्षा शिखर धवनचे आकडे चांगले आहेत. असं असताना शिखर धवन टीमच्या बाहेर आणि राहुल इन टीम कसा?

Non Stop LIVE Update
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य
लिहून ठेवा... ४ जूननंतर शिंदे तुरूंगात किंवा... बड्या नेत्याचं वक्तव्य.
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?
घटना बदलणार की नाही...प्रकाश आंबेडकरांची पंतप्रधान मोदींकडे मागणी काय?.
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले...
काँग्रेसमध्ये पक्ष विलीन? शरद पवाारंच्या वक्तव्यावर दादा म्हणाले....
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट
तेव्हा शिंदेंचं बंड फसलं, नाहीतर २०१३ मध्येच...; विचारेंचा गौप्यस्फोट.
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?
शरद पवारांबद्दल 'ते' विधान अन् एका दादांवर दुसरे दादा नाराज?.
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका
पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार? निवडणुकीच्या रणधुमाळीत धमाका.
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?
मोठी कारवाई, नाकाबंदीत ATM कॅश व्हॅनमधील 4 कोटींची रोकड कुठं जप्त?.
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत
चंद्रकांत पाटलांच्या त्या वक्तव्याने अजितदादा नाराज, बोलून दाखवली खंत.
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य
आता ठाकरेंसमोर एवढाचं प्रश्न.. पवारांच्या मुलाखतीवर शिरसाटांचं वक्तव्य.
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल
लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात आणखी एका निवडणुकीचं वाजल बिगूल.