AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘…म्हणून के. एल. राहुलला संघात ठेवलंय’, अखेर रोहित शर्माने केला खुलासा

गेल्या अनेक दिवसांपासून राहुलला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही कसोटीमध्ये राहुल अपयशी ठरला. यावरून त्याला धारेवर धरलं जात असताना कर्णधार रोहित शर्माने राहुलचं समर्थन केलं आहे. इतकंच नाहीतर संघामध्ये राहुलला का स्थान दिलं आहे याबाबतही खुलासा केला आहे.

'...म्हणून के. एल. राहुलला संघात ठेवलंय', अखेर रोहित शर्माने केला खुलासा
| Updated on: Feb 19, 2023 | 11:40 PM
Share

मुंबई : भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मालिकेमध्ये भारताने 2-0 ने आघाडी घेतली आहे. दोन्ही कसोटीमध्ये आर. आश्विन आणि रविंद्र जडेजा यांच्या दमदार बॉलिंगच्या प्रदर्शनाच्या जोरावर कांगारूंवर दोन्ही सामन्यात सहज विजय मिळवता आला. भारतासाठी सध्या डोकेदुखी ठरत आहे ती म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर के. एल. राहुल. कारण गेल्या अनेक दिवसांपासून राहुलला मोठी खेळी करता आली नाही. दोन्ही कसोटीमध्ये राहुल अपयशी ठरला. यावरून त्याला धारेवर धरलं जात असताना कर्णधार रोहित शर्माने राहुलचं समर्थन केलं आहे. इतकंच नाहीतर संघामध्ये राहुलला का स्थान दिलं आहे याबाबतही खुलासा केला आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा-

गेल्या काही दिवसांपासून राहुलच्या फॉर्मवरून खूप चर्चा होताना दिसत आहे. पण टीम मॅनेजमेंट म्हणून राहुलच्या फॉर्मला पाहता त्याच्यातील क्षमतेकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जर एखाद्या खेळाडूकडे क्षमता असेल तर त्याला जास्तीत जास्त संधी दिल्या जात असल्याचं रोहित शर्मा म्हणाला.

जेव्हा तुम्ही अशा प्रकारच्या पीचवर खेळता तेव्हा तुम्हाला धावा करण्यासाठी मार्ग काढावा लागतो. प्रत्येक फलंदाजाची स्पिनर्सविरूद्द खेळण्याची पद्धत वेगळी असते. कोणता खेळाडू कसा धावा करतो आमच्यासाठी महत्त्वाचं नसून सर्वजण एकत्र येऊन जास्तीत जास्त धावा कशा काढता येतील हे महत्त्वाचं असल्याचंही रोहितने सांगितलं.

कांगारूंविरूद्धच्या उर्वरित 2 कसोटी सामन्यांमध्ये निवड समितीने विश्वास ठेवत त्याला स्थान दिलं आहे. राहुलच्या संघात असण्यामुळे नेटकऱ्यांनी निवड समितीच्या या निर्णयावर ताशेरे ओढले. कारण राहुलच्या जागी दुसऱ्या युवा खेळाडूला संधी दिली तर ते भारताच्या फायद्याचं ठरेल अशा अनेक प्रतिक्रिया बीसीसीआयने संघाची घोषणा केल्यावर आल्या. सामना संपल्यावर काही तासांमध्येच बीसीसीआयने वनडे आणि कसोटी संघांची घोषणा केली होती.

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, इंदूर चौथी कसोटी, 9-13 मार्च,

वनडे सीरिज पहिली वनडे, 17 मार्च, मुंबई दुसरी वनडे, 19 मार्च, विशाखापट्टणम तिसरी वनडे, 22 मार्च, चेन्नई या तिन्ही सामन्यांना दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे.

उर्वरित 2 कसोटींसाठी टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.