Hardik Pandya: जे नव्हतं करायचं तेच केलं;हार्दिककडून Bcci च्या नियमाचं उल्लंघन! कारवाई होणार?
Hardik Pandya : हार्दिक पंड्या याने गुरुवारी बडोद्यासाठी बॅटिंग आणि बॉलिंगने चमकदार कामगिरी केली. हार्दिकने या सामन्यात अर्धशतक झळकावलं. त्यानंतर या ऑलराउंडरने 10 ओव्हर बॉलिंग केली.

टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला 11 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांची ही 2026 वर्षातील पहिलीच मालिका असणार आहे. त्याआधी टीम इंडियातील बहुतांश खेळाडू विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत खेळत आहेत. भारताचा ऑलराउंडर हार्दिक पंड्या या स्पर्धेत बडोदा संघाचं प्रतिनिधित्व करत आहे. हार्दिकने गुरुवारी 8 जानेवारीला कडक कामगिरी केली. हार्दिकने निंरजन शाह स्टेडियममध्ये बडोदाला विजयी केलं. बडोदाने या सामन्यात 391 धावांचा डोंगर उभारला. चंडीगडला प्रत्युत्तरात 242 धावाच करता आल्या.
हार्दिकने या सामन्यात वादळी खेळी साकारली. हार्दिकने चंडीगड विरुद्ध 31 चेंडूत 75 धावा केल्या. हार्दिकने या खेळीत 9 सिक्स आणि 2 फोर लगावले. हार्दिकने या खेळीसह बडोदाला 390 पार पोहचवण्यात निर्णायक भूमिका बजावली. मात्र हार्दिकने सामन्यातील दुसऱ्या डावात मोठी घोडचूक केली. हार्दिकने बीसीसीआयच्या नियमाचं उल्लंघन केलं. हार्दिकने भर मैदानात बीसीसीआयच्या कोणत्या नियमाचं उल्लंघन केलं? हे जाणून घेऊयात.
हार्दिककडून बीसीसीआयच्या नियमाला केराची टोपली!
हार्दिकने चंडीगड विरुद्ध या सामन्यात बॅटिंगनंतर बॉलिंगनेही योगदान दिलं. हार्दिकने या 50 षटकांच्या सामन्यात 10 ओव्हर बॉलिंग केली. हार्दिकने या 10 ओव्हरमध्ये 66 धावा दिल्या. तसेच हार्दिकने चंदीगडच्या 3 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. हार्दिकने बॅटिंग आणि बॉलिगंने चांगली कामगिरी केली. मग त्याचं कुठे चुकलं? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. हार्दिकला बीसीसीआयकडून बॉलिंग करण्याची परवानगी नाही. मात्र त्यानंतरही त्याने बॉलिंग केली. हार्दिकने अशाप्रकारे बीसीसीआयच्या नियमाचं उल्लंघन केलं.
बीसीसीआय निवड समिताने 3 जानेवारीला न्यूझीलंड विरूद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध 3 सामने खेळणार आहे. बीसीसीआयने त्या प्रसिद्धीपत्रकात हार्दिक पंड्या फिट नसल्याचं म्हटलं. मात्र हार्दिकने त्यानंतरही चंदीगड विरुद्ध 10 ओव्हर बॉलिंग केली. त्यामुळे हार्दिकला बीसीसीआयकडून होणाऱ्या कोणत्याही कारवाईचा सामना करावा लागू शकतो. मात्र हार्दिकने या सामन्यात बॉलिंग करण्यासाठी बीसीसीआयची पूर्वपरवानगी घेतली असेल तर त्यावर कारवाई होणार नाही.
भारताता येत्या 7 फेब्रुवारीपासून टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेचा थरार रंगणार आहे. हार्दिक पंड्या भारताचा प्रमुख आणि अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे हार्दिकबाबत बीसीसीआय सतर्क आहे. त्यामुळे बीसीसीआय निवड समितीने हार्दिकची एकदिवसीय संघात निवड केली नाही. मात्र इथे हार्दिकने 10 ओव्हर बॉलिंग केली. त्यामुळे आता हार्दिकने या सामन्यात परवानगीने गोलंदाजी केली की बीसीसीआय विरुद्ध भूमिका घेतली? हे लवकरच स्पष्ट होईल.
