VIDEO : झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर काळा चष्मा घालून गब्बरचा डान्स, इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट,चर्चा तर होणारच

IND vs ZIM : भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यात टीम इंडियाचे खेळाडू तिसर्‍या वनडेत झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर डान्सकरून आनंद साजरा करताना दिसताय.

VIDEO : झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर काळा चष्मा घालून गब्बरचा डान्स, इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट,चर्चा तर होणारच
झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर काळा चष्मा घालून गब्बरचा डान्सImage Credit source: social
Follow us
| Updated on: Aug 23, 2022 | 6:54 AM

नवी दिल्ली : हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये सोमवारी भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना अतिशय रोमांचक झाला. सिकंदर रझा याच्या उत्कृष्ट शतकाच्या जोरावर झिम्बाब्वेचा संघ विजयाच्या जवळपास पोहोचला होता. पण, अखेरीस भारतीय गोलंदाजांनी दडपणाखाली स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि सामना 13 धावांनी जिंकला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातील विजयानंतर भारताने (Team India) तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. झिम्बाब्वेला हरवल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंनी हॉटेलच्या खोलीत जल्लोष साजरा केला. भारतीय संघाचा उपकर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये टीम इंडियाचे खेळाडू तिसऱ्या वनडेत झिम्बाब्वेविरुद्धच्या विजयानंतर नाचून आनंद साजरा करत आहेत. गब्बर या नावाने प्रसिद्ध असलेला धवन काळा चष्मा घालून टीमसोबत नाचताना दिसत आहे.त्याच्यासोबत टीमचे बाकीचे खेळाडूही ‘काला चष्मा’ गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

हा व्हिडीओ पाहा

View this post on Instagram

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिल (130) यांनी 8 बाद 289 धावा केल्या आणि त्यानंतर सिकंदर रझा (115) याच्या शतकानंतरही झिम्बाब्वेचा संघ तीन चेंडू शिल्लक असताना 276 धावांत गुंडाळला. गिलने वनडेतील पहिले शतक झळकावले.त्याने 97 चेंडूत 15 चौकार आणि 1 षटकार ठोकला.गिलने तीन सामन्यांत 122.50 च्या सरासरीने 245 धावा केल्या आणि त्यासाठी त्याला सामनावीर तसेच मालिकावीर म्हणून गौरवण्यात आले.

इशान किशनचं अर्धशतक

  1. इशान किशनसाठी ही बाब चांगली राहिली की, त्याने अर्धशतक झळकावलं.
  2. हरारेच्या कठीण पीचवर इशान किशनने धीमी सुरुवात केली.
  3. इशानने लय पकडली. किशनने 61 चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. यात 6 चौकार होते.

इशान किशन ज्या पद्धतीने रनआऊट झाला, ते खूपच इंटरेस्टिंग होतं. झिम्बाब्वेचे खेळाडू शुभमन गिल विरोधात अपील करत होते. त्याचवेळी इशान किशन रनआऊट झाला.

शुभमन गिलचं शतक

  1. इशान किशन रन आऊट झाल्यानंतर शुभमन गिलने शतक झळकावलं.
  2. शुभमन गिलने आंतरराष्ट्रीय करीयर मधलं आपलं पहिलं शतक झळकावलं.
  3. गिल केएल राहुल बाद झाल्यानंतर क्रीजवर आला होता. मैदानात आल्यानंतर त्याने आक्रमक फलंदाजी केली.
  4. गिलने एका कठीण खेळपट्टीवर 51 चेंडूत अर्धशतक फटकावलं.
  5. पुढच्या 31 चेंडूत तो शतकाजवळ पोहोचला. गिलच्या दमदार फलंदाजीच्या बळावर भारताने 50 षटकात 289 धावा फटकावल्या.

गिल विरुद्ध अपील, विकेट इशानची

43 व्या ओव्हर मध्ये ब्रॅड इव्हान्सच्या पहिल्या चेंडूवर शुभमन गिल विरुद्ध LBW चं अपील झालं. इशान किशनने एक धाव काढण्याचा प्रयत्न केला. पण गिलने त्याला रोखलं. त्याचवेळी मुनयोंगाने जबरदस्त थ्रो केला. त्यावर इशान किशन नॉन स्ट्राइक एन्डवर रन आऊट झाला. त्यानंतर झिम्बाब्वेने शुभमन गिलविरोधात रिव्यु घेतला. पण तो नॉट आऊट होता. त्यानंतर इशान किशनला रनआऊट देण्यात आलं.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.