WTC Final 2021 : विराट-रहाणेची जोडी, भल्याभल्यांना तोडी, न्यूझीलंडचं टेंशन वाढण्याचं कारण काय

भारतीय कसोटी संघाचे कर्णधार आणि उपकर्णधार विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेची जोडीबद्दलचे काही रेकॉर्ड तुम्हाला माहित नसतील. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा तिसरा दिवस सुरु होण्याआधी ते जाणून घ्या.

WTC Final 2021 : विराट-रहाणेची जोडी, भल्याभल्यांना तोडी, न्यूझीलंडचं टेंशन वाढण्याचं कारण काय
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: shashank patil

Jun 20, 2021 | 3:17 PM

मुंबई : भारतीय कसोटी संघात सर्वात विश्वासू जोडी म्हणजे कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) यांची. दोघांनी भारताच्या खात्यात आतापर्यंत बऱ्याच धावा जमा केल्या असून त्यांनी अनेक रेकॉर्डही नावावर केले आहेत. त्यामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या सामन्यात हे दोघे क्रिजवर असेपर्यंत न्यूझीलंडच्या बॉलर्सवर तणाव असणार हे नक्की. (Virat Kohli and Ajinkya Rahane Indias Trusted Duo Playing in ICC WTC Final 2021 May Give India Good lead in first session)

प्रतिस्पर्धी संघाच्या बोलर्सचा धुव्वा उडवण्यासाठी विराट-रहाणे ही जोडी किती ताकदवर आहे. हे आतापर्यंतचे आकडे दाखवून देतात. टेस्ट क्रिकेटमध्ये कोहली आणि रहाणे यांनी चौथ्या विकेटसारख्या खालच्या क्रमातील विकेटसाठी सर्वाधिक अर्धशतकी भागिदारी केल्या आहेत. या दोघांनी महान खेळाडू स्टीव्ह वॉ आणि मार्क वॉ यांनाही मागे टाकले आहे. आतापर्यंत 56 डावांमध्ये 26 वेळा विराट-रहाणे जोडीने अर्धशतकापेक्षा अधिक भागिदारी केल्या आहेत. ज्यात 10 शतकी तर 16 अर्धशतकी भागीदारी शामिल आहेत.

‘ये है जोडी नंबर 1’

विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे टेस्ट क्रिकेटमध्ये अव्वल क्रमाकांच्या जोड्यांमधील एक आहे. याचे कारण ICC WTC Final चा विचार न करताही 2013 पासून आतापर्यंत 58 डावांमध्ये या दोघांनी मिळून तब्बल 3 हजार 404 धावा केल्या आहेत. 61.9 च्या सरासरीने या धावा करण्यात आल्या असून यामध्ये 15 अर्धशतकी आणि 10 शतकी भागिदाऱ्यांचा समावेश आहे.

हे ही वाचा –

Photo : इंग्लंडमधील संयमी खेळीचं विराटला फळ, आशियाभरात नाव, धोनीलाही टाकलं मागे

WTC Final, IND vs NZ : साऊथॅम्प्टनमधील हवामानाची ताजी स्थिती, कसा असेल तिसऱ्या दिवसाचा खेळ?, किती ओव्हर्स टाकल्या जातील?

(Virat Kohli and Ajinkya Rahane Indias Trusted Duo Playing in ICC WTC Final 2021 May Give India Good lead in first session)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें