WTC Final, IND vs NZ : साऊथॅम्प्टनमधील हवामानाची ताजी स्थिती, कसा असेल तिसऱ्या दिवसाचा खेळ?, किती ओव्हर्स टाकल्या जातील?

पहिल्या दिवशी पावसामुळे खेळ रद्द करण्यात आला. दुसऱ्या दिवशीही पाऊस आणि अंधुक प्रकाशामुळे केवळ 64.4 ओव्हरचा खेळच खेळवण्यात आला. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी किती ओव्हर्सचा खेळ होईल याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

WTC Final, IND vs NZ : साऊथॅम्प्टनमधील हवामानाची ताजी स्थिती, कसा असेल तिसऱ्या दिवसाचा खेळ?, किती ओव्हर्स टाकल्या जातील?
साऊदम्पटनचे मैदान
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 11:42 AM

साऊथॅम्प्टन : इंग्लंडच्या साऊथॅम्प्टन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) भारत किंवा न्यूझीलंड (India vs Newzealand) नाही तर, हवामानाचे (Southampton Weather) वर्चस्व दिसून येत आहे. सतत बदलत्या वातावरणामुळे खेळात सारखे अडथळे येत आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशी हवामानाचे काय हालहवाल आहेत? सामना खेळवला जाईल का? आणि खेळवल्यास किती ओव्हर्सचा? याकडे क्रिकेटरसिकांचे लक्ष लागून आहे. (WTC Final 2021 India vs Newzealand Southampton Weather Rain on Day 3 Chances Know Todays Englands Weather)

शनिवारी हवामान खेळासाठी अनुकूल असल्याने खेळ वेळेत सुरु झाला. पण बऱ्याचदा खराब वातावरणामुळे खेळ थांबवण्यात येत होता. ज्यामुळे खेळाडूंना खेळताना अडचणी येत होत्या. अखेर 64.4 ओव्हरचा खेळ झाल्यानंतर दिवसभराचा खेळ थांबवण्यात आला. खेळ संपतना भारताचा स्कोर 3 विकेट्सच्या बदल्यात 146 रन इतका होता. कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे दोघेही क्रिजवर असल्याने भारताला दिलासा आहे. पण आजचं हवामान कसं असेल यावर सगळ अवलंबून आहे.

आज 90 ओव्हर्सचा खेळ होण्याची दाट शक्यता

साऊथॅम्प्टनच्या हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार आजचा म्हणजे रविवारचं हवामान पहिल्यो दोन दिवशीच्या तुलनेत अधिक साफ असेल. त्यामुळे संपूर्ण 90 ओव्हर्सचा खेळ होण्याची शक्यता आहे. दरम्यान पावसामुळे पहिल्या दोन दिवसांत जे नुकसान झाले आहे त्याची भरपाई करण्यासाठी आयसीसीने (ICC) 23 जूनचा एक दिवस राखीव ठेवला आहे.

पहिल्या दिवशीच्या खेळाचा एक आढावा

न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात (62 धावांची भागीदारी) करुन दिली मात्र दोघेही काही वेळातच बाद झाले. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजारा अवघ्या 8 धावांवर बाद झाला. भारताची अवस्था 3 बाद 88 अशी झालेली असताना कर्णधार विराट कोहलीने सावधपणे खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साथ दिली. मात्र त्यानंतर खराब प्रकाशमानामुळे पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला. दिवसभरात केवळ 64.4 षटकं खेळवता आली. दरम्यान, भारतीय संघाने दिवसाखेरीस 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार आणि उपकर्णधाराची जोडी मैदानात असून दोघांनी आतापर्यंत अर्धशतकी (58) भागीदारी रचली आहे. दोघेही डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. विराट 44 तर अजिंक्य रहाणे 29 धावांवर खेळत आहेत.

हे ही वाचा –

ICC WTC Final 2021 : शुभमन गिलवर 6 फूट 8 इंच उंचीच्या बोलरचा हल्ला, हेल्मेटवर चेंडू आदळला, गिल थोडक्यात बचावला

IND W vs ENG W : भारताच्या रणरागिणींची कमाल, इंग्लंडच्या हाता-तोंडाशी आलेला विजय हिसकावला

(WTC Final 2021 India vs Newzealand Southampton Weather Rain on Day 3 Chances Know Todays Englands Weather)

Non Stop LIVE Update
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.