India vs New Zealand Live, WTC Final 2021 2nd Day : खराब प्रकाशमानामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात, कोहली-रहाणे जोडी मैदानात, भारत 146/3

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम | Edited By: अक्षय चोरगे

Updated on: Jun 19, 2021 | 11:30 PM

India vs New Zealand Live Score : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर चांगल्या लयीत असणारे शुभमन आणि रोहित दोघेही बाद झाले. त्यानंतर आता पुजाराही बाद झाला आहे.

India vs New Zealand Live, WTC Final 2021 2nd Day : खराब प्रकाशमानामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात, कोहली-रहाणे जोडी मैदानात, भारत 146/3
WTC Final

India vs New Zealand WTC Final 2021 : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात (WTC Final 2021) आज न्यूझीलंडने टॉस जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात (62 धावांची भागीदारी) करुन दिली मात्र दोघेही काही वेळातच बाद झाले. त्यानंतर आलेला चेतेश्वर पुजारा अवघ्या 8 धावांवर बाद झाला. भारताची अवस्था 3 बाद 88 अशी झालेली असताना कर्णधार विराट कोहलीने सावधपणे खेळ करत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. त्याला उपकर्णधार अजिंक्य रहाणेने साध दिली. खराब प्रकाशमानामुळे पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात केवळ 64.4 षटकं खेळवता आली. दरम्यान, भारतीय संघाने आतापर्यंत 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार आणि उपकर्णधाराची जोडी मैदानात असून दोघांनी आतापर्यंत अर्धशतकी (58) भागीदारी रचली आहे. दोघेही डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. विराट 44 तर अजिंक्य रहाणे 29 धावांवर खेळत आहेत. (India vs New Zealand live score WTC Final 2021 2nd Day Match Scorecard online Southampton in Marathi)

Key Events

शर्मा-गिल जोडीची अर्धशतकी सलामी

भारताला आजच्या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली. सलामीवीर रोहित शर्मा आणि शुबमन गिल या जोडीने सुरुवातीला 20 षटकांमध्ये 62 धावांची भागीदारी करुन दिली. दोन्ही खेळाडूंना चांगली सुरुवात मिळाली होती, परंतु त्यांना मोठी खेळी करता आली नाही. रोहित शर्मा 34 तर शुबमन गिल 28 धावा करुन बाद झाले.

संघर्ष करत विराट-रहाणेने डाव सावरला

भारताला सुरुवात चांगली मिळाली तरी अवघ्या 18 धावांमध्ये 3 महत्त्वाच्या विकेट्स गमावल्याने भारतीय संघ बॅकफुटवर ढकलला गेला होता. परंतु कर्णधार विराट कोहलीने संयमी खेळ करत डाव सावरला. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे चाचपडताना दिसला. त्याला एकेका धावेसाठी संघर्ष करावा लागत होता. चहापानानंतर तो थोडा सावरला आणि एकेरी-दुहेरी धावा घेत विकेट न गमावता कर्णधाराला त्याने साथ दिली. कर्णधार कोहलीने 44 धावा जमवल्या खऱ्या परंतु त्यात त्याला केवळ एकच चौकार लगावता आला. रहाणेने मात्र तिसऱ्या सत्रात साऊथी, जेमिसनच्या गोलंदाजीवर 4 खणखणीत चौकार वसूल केले.

LIVE Cricket Score & Updates

The liveblog has ended.
 • 19 Jun 2021 10:59 PM (IST)

  खराब प्रकाशमानामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ संपुष्टात, कोहली-रहाणे जोडी मैदानात, भारत 146/3

  खराब प्रकाशमानामुळे पंचांनी दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. दिवसभरात केवळ 64.4 षटकं खेळवता आली. दरम्यान, भारतीय संघाने आतापर्यंत 3 बाद 146 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार आणि उपकर्णधाराची जोडी मैदानात असून दोघेही डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. विराट 44 तर अजिंक्य रहाणे 29 धावांवर खेळत आहेत.

 • 19 Jun 2021 08:47 PM (IST)

  अंधुक प्रकाशामुळे तिसऱ्या सत्रातील खेळ स्थगित, भारताच्या 3 बाद 134 धावा

  अंधुक प्रकाशामुळे सामन्याच्या पहिल्या दिवसातील तिसऱ्या सत्राचा खेळ स्थगित करण्यात आला आहे. तत्पूर्वी भारतीय संघाने 3 बाद 134 धावापर्यंत मजल मारली आहे. कर्णधार विराट कोहली (40) आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे (22) ही जोडी भारताचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

 • 19 Jun 2021 07:50 PM (IST)

  चहापानापर्यंत भारताची 3 बाद 120 धावांपर्यंत मजल, कोहली-रहाणे जोडी मैदानात

  चहापानापर्यंत भारतीय संघाने 55.3 षटकात 3 बाद 120 धावांपर्यंत मजल मारली आहे. कर्णधार विराट कोहली (35) सावधपणे डाव पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. तर दुसऱ्या बाजूला उपकर्णधार अजिंक्य रहाणे (13) अजूनही एकेका धावेसाठी संघर्ष करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 54 चेंडू खेळल्यानंतरही तो खेळपट्टीवर सेट झाला आहे असं वाटत नाही. दरम्यान, अंधूक प्रकाशामुळे पंचांनी चहासाठीचा ब्रेक लवकर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

 • 19 Jun 2021 07:31 PM (IST)

  WTC Final 2021 : मोठ्या प्रतिक्षेनंतर भारतीय संघाला चौकार, अजिंक्यकडून सुंदर शॉट

  बऱ्यास वेळानंतर भारतीय संघाला एक चौकार मिळाला आहे. भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने कॉलीन डी-ग्रँडहोमला चौकार खेचला आहे. या चौकारासोबतच 53 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 112 वर तीन बाद झाला आहे.

 • 19 Jun 2021 07:09 PM (IST)

  WTC Final 2021 : भारतीय संघासाठी दिलासा, स्कोरबोर्डवर 100 धावा लागल्या

  भारताकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करुन दिली मात्र दोघेही काही वेळातच बाद झाले. त्यानंतर पुजाराही बाद झाल्यानंतर सध्या कर्णधार विराट आणि अजिंक्य रहाणे खेळत आहेत. भारतीय संघाच्या 100 धावा पूर्ण झाल्या आहेत. 100 धावा पूर्ण करण्यासाठी भारताला 47 ओव्हर लागल्या.

 • 19 Jun 2021 06:37 PM (IST)

  WTC Final 2021 : चेतेश्वर पुजारा बाद, भारतीय संघाच्या अडचणीत वाढ

  संयमी खेळी करणारा भारताचा चेतेश्वर पुजारा बाद झाला आहे. अनुभवी ट्रेन्ट बोल्टने 40 व्या ओव्हरमध्ये पुजाराला पायचीत करत बाद केले आहे. पुजारा 54 बॉल्समध्ये 8 धावा करुन बाद झाला. त्यामुळे 41 ओव्हरनंतर भारतीय संघाची स्थिती 91 वर 3 बाद अशी झाली आहे. (India vs New Zealand live score WTC Final 2021 2nd Day Match Scorecard online Southampton in marathi)

   

 • 19 Jun 2021 06:31 PM (IST)

  WTC Final 2021 : विराट आणि पुजाराकडून डाव सावरण्याचा प्रयत्न, संयमी खेळीचे दर्शन

  काही बॉल्सच्या फरकानेच सेट फलंदाज रोहित आणि शुभमन बाद झाले. त्यानंतर कर्णधार विराट आणि पुजारा हे संयमी खेळीचे दर्शन घडवत भारतीय डावाला सावरण्याचा प्रयत्न करत आहेत.

 • 19 Jun 2021 06:02 PM (IST)

  WTC Final 2021 : बापरे! चेतेश्वरचं हॅल्मेटच तुटलं, घातक बाऊन्सरने पुजारा पुरता हालला

  चेतेश्वर पुजाराने तब्बल 36 बॉल खेळल्यानंतर 33 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर नील वॅगेनरला चौकार खेचत खाते खोलले. त्यानंतर 37 व्या ओव्हरला नीलच्याच एका बाऊन्सरवर पुजाराचं हॅल्मेटचा एक भाग तुटून पडला. सुदैवाने पुजाराला काही दुखापत झाली नाही.

 • 19 Jun 2021 05:44 PM (IST)

  WTC Final 2021 : सलग 17 डॉट बॉलनंतर पहिली धाव, विराटने पुन्हा उघडले संघाचे खाते

  लंच ब्रेक झाल्यानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली. मात्र 17 बॉलनंतरही विराच आणि पुजारा यांना मिळून एकही रन घेता आला नाही. अखेर विराटनेने 18 व्या बॉलवर 1 धाव घेत भारताचा धावफलक बदलला. 31 ओव्हरनंतर भारताची धावसंख्या 70 वर दोन बाद अशी आहे.  (India vs New Zealand live score WTC Final 2021 2nd Day Match Scorecard online Southampton in marathi)

 • 19 Jun 2021 05:10 PM (IST)

  WTC Final 2021 : लंच ब्रेक, भारताच्या आशा विराट आणि पुजारावर

  सामन्यात लंच ब्रेक झाला असून 28 ओव्हरनंतर भारताची स्थिती 69 वर दोन बाद अशी आहे. सध्या कर्णधार विराट कोहली 6 आणि चेतेश्वर पुजारा 0 धावांवर खेळत आहे. सेट फलंदाज शुभमन आणि रोहितच्या बाद होण्याने भारताची परिस्थिती काहीशी बिकट झाली आहे.

   

 • 19 Jun 2021 04:53 PM (IST)

  शुभमन गिल बाद, सेट बॅट्समन बाद झाल्याने भारतीय संघ चिंतेत

  रोहित बाद झाल्यानंतर आता 24 व्या ओव्हरमध्ये सेट फलंदाज शुभमन देखील झेलबाद झाला आहे. नील वॅगनरच्या बॉलवर यष्टीरक्षक बीजे वॅटलिंगने झेल पकडत शुभमनला बाद केले आहे. शुभमन 28 धावा करुन बाद झाला आहे. भारताची स्थिती 63 वर दोन बाद झाली आहे.

 • 19 Jun 2021 04:33 PM (IST)

  WTC Final 2021 : भारताला पहिला झटका, हिटमॅन पॅव्हेलियनमध्ये परतला

  भारताला 20 व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर पहिला झटका बसला आहे. काईल जॅमिन्सनच्या बॉलवर टीम साऊदीने झेल पकडत रोहितला बाद केले आहे. 34 धावा करुन रोहित बाद झाला आहे. त्यामुळे भारताची स्थिती 62 धावांवर एक बाद अशी झाली आहे. (India vs New Zealand live score WTC Final 2021 2nd Day Match Scorecard online Southampton in marathi)

 • 19 Jun 2021 04:16 PM (IST)

  WTC Final 2021 : भारतीय संघाचे अर्धशतक, रोहित आणि शुभमनची भागिदारी

  भारतीय संघाने 50 धावांचा टप्पा पार केला आहे. सलामीवीर रोहित आणि शुभमन यांनी मिळून संघाला 50 धावा करुन दिल्या आहेत. यात रोहितने 29 तर शुभमनने 23 धावा केल्या आहेत.

 • 19 Jun 2021 04:04 PM (IST)

  WTC Final 2021 : Drinks Break पूर्वी भारतीय संघाची दिलासादायक खेळी

  सामन्यात 14 ओव्हरनंतर पहिला ड्रिंक्स ब्रेक झाला आहे. भारतीय संघाची स्थिती 41 धावांवर शून्य बाद अशी असून रोहित शर्मा 21 धावांवर तर शुभमन 19 धावांवर खेळत आहे.

 • 19 Jun 2021 03:47 PM (IST)

  WTC Final 2021 : उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह मारत शुभमनचा चौकार

  भारताचा युवा फलंदाज शुभमनने एक अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह मारत चौकार मिळवला आहे. काईल जेमिन्सनच्या पहिल्याच ओव्हरमध्ये शुभमनने हा चौकार मारत भारताला 11 ओव्हरच्या अखेरीस 41 धावा करुन दिल्या आहेत.

 • 19 Jun 2021 03:40 PM (IST)

  WTC Final 2021 : रोहित चांगल्या लयीत, ठोकला आणखी एक चौकार

  भारताचा सलामीवीर रोहित शर्मा चांगल्या लयीत खेळताना दिसत आहे. टीम साऊदीच्या नवव्या ओव्हरमध्ये रोहितने चौथ्या बॉलवर चौकार ठोकला. त्याआधीच्या बॉलवरही रोहितने अप्रतिम शॉट मारला होता, पण न्यूझीलंडकडून अप्रतिम क्षेत्ररक्षणामुळे चौकार जाता जाता राहिला.

 • 19 Jun 2021 03:30 PM (IST)

  WTC Final 2021 : एका ओव्हरमध्ये हिटमॅनच्या बॅटमधून दोन चौकार

  भारताचा हिटमॅन रोहित शर्माने सामन्यातील सातव्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या टीम साऊदीला 2 चौकार ठोकले. त्यामुळे सातव्या ओव्हरच्या अखेरीस भारताचा स्कोर 26 धावांवर शून्य बाद इतका आहे.

 • 19 Jun 2021 03:28 PM (IST)

  WTC Final 2021 : रोहितनेही चौकाराचे खाते खोलले

  सामन्यातील पहिला चौकार युवा फलंदाज शुभमन गिलच्या बॅटमधून निघाल्यानंतर लगेचच पुढच्या ओव्हरला टीम साऊदी याला हिटमॅन रोहितने चौकार खेचत सामन्यात भारताला दुसरा चौकार मिळवून दिला.

 • 19 Jun 2021 03:26 PM (IST)

  WTC Final 2021 : सामन्यातील पहिला चौकार शुभमनच्या बॅटमधून

  सामन्यातील पहिला चौकार युवा फलंदाज शुभमन गिलच्या बॅटमधून निघाला आहे. त्याने सहाव्या ओव्हरच्या चौथ्या बॉलला ट्रेन्ट बोल्टला चौकार ठोकत भारताला पहिला चौकार मिळवून दिला आहे. सहा ओव्हरनंतर भारताचा स्कोर 16 धावांवर शून्य विकेट इतका आहे.

 • 19 Jun 2021 03:14 PM (IST)

  WTC Final 2021 : शुभमनची डाईव्ह, बाद होता होता वाचला

  अनुभवी टीम साऊदीच्या पहिल्याच ओव्हरमध्ये भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि शुभमन यांच्यात थोडा ताळमेळाचा अभाव दिसून आला. धाव घेण्याची संधी नसतानाही शुभमनने धाव घेण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे तो धावचीत होता होता वाचला. त्याला झेप मारुन बाद होण्यापासून वाचावे लागले.

 • 19 Jun 2021 03:06 PM (IST)

  WTC Final 2021 : एका ओव्हरनंतर भारताच्या बिनबाद 3 धावा

  सलामीवीर रोहित शर्मा शर्माने बोलर टीम साऊथीला पहिल्याच चेंडूवर लेग साईटला शॉट मारुन तीन धावा घेतल्या. त्यानंतरचे पाच बॉल शुभमनने खेळून काढले.

 • 19 Jun 2021 02:54 PM (IST)

  WTC Final 2021 : पीचवर घास नाही, आकाशात काळे ढग!

  दोन दिवसांपूर्वी साऊदॅम्प्टनच्या खेळपट्टीवर घास पाहायला मिळाला परंतु आज मात्र तितकासा घास नाहीय. काल पूर्ण दिवस पाऊस पडला, आज मात्र साऊदॅम्प्टनमध्ये सूर्यनारायणाने दर्शन दिलं.

 • 19 Jun 2021 02:49 PM (IST)

  ...पुन्हा एकदा विराट कोहली टॉस हरला!

  भारतीय कर्णधार विराट कोहली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात टॉस हरला. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने टॉस जिंकून प्रथम बोलिंग करण्याचा निर्णय घेतला. आकाशात काळे ढग जमा झालेले असल्याकारणाने त्याने हा निर्णय घेतला. न्यूझीलंड संघात एकही स्पिनर नाही. न्यूझीलंडने चार वेगवान गोलंदाजांसहित कॉलिन डि ग्रँडहॉम या मिडीयम स्पेसरला खेळवण्याचा निर्णय घेतलाय.

 • 19 Jun 2021 02:44 PM (IST)

  WTC Final 2021 : न्यूझीलंडची प्लेइंग XI

 • 19 Jun 2021 02:43 PM (IST)

  WTC Final 2021 : भारताची प्लेइंग XI

 • 19 Jun 2021 02:41 PM (IST)

  कर्णधार विराटची कॅप्टन म्हणून 61 वी कसोटी!

  कर्णधार विराट कोहलीची कॅप्टन म्हणून ही 61 वी कसोटी आहे. त्याने त्याच्या कर्णधारपदाच्या कारकीर्दीत सलग 9 टेस्ट सिरीज जिंकण्याचा कारनामा केलाय. जो एकेकाळी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज कर्णधार रिकी पॉटिंगने केला होता.

 • 19 Jun 2021 02:27 PM (IST)

  अंतिम 11 मध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही - रवी शास्त्री

  विराटसाठी WTC फायनल ही मोठी संधी आहे. मागील काही वर्षापासून संघाने या क्षणासाठी मोठी मेहनत केलीय. आज त्यांच्या कष्टाचं चीज झालंय. भारतीय संघ सर्वोत्तम दाखवेल. जरी पाऊस झाला असेल तरी अंतिम 11 मध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही, असं रवी शास्त्री म्हणाले.

 • 19 Jun 2021 02:18 PM (IST)

  बीसीसीआयने शेअर केले साऊथॅम्प्टनच्या खेळपट्टीचे फोटो

Published On - Jun 19,2021 2:09 PM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI