AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की…

Virat Kohli on Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीने काल धावांचा पाऊस पाडला. एका षटकात तर त्याने मैदानाच्या सीमारेषा दणाणून टाकल्या. त्याची ही कामगिरी पाहून विराटही अचंबित झाला. या गोलू पराक्रमाने तो प्रभावित झाला आणि त्याने एक खास गिफ्ट दिले.

Vaibhav Suraywanshi: वैभव सूर्यवंशीची तुफान खेळी पाहून विराट कोहलीही दंग! सामना संपल्यानंतर केले असे काही की...
विराट कोहली, वैभव सूर्यवंशी Image Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 11, 2026 | 1:22 PM
Share

Virat Kohli on Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशी…आता नावच बस्स झालं. मैदानाचा कानकोपरा आणि सीमा सुद्धा आता सूर्यवंशीने वैभवशाली करून सोडल्या आहेत. त्याने काल रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरोधात तुफान खेळी खेळली. त्या एका षटकाने तर आरसीबीची झोप उडवली. या षटकात वैभव सूर्यवंशीने विराट कामगिरी केल्यानंतर कोहलीही दंग झाला. तो त्याच्याकडे आणि त्याच्या बॅटकडे पाहत राहिला. आरसीबीचा या सामन्यात पराभव झाला. त्यानंतर कोहलीने सूर्यवंशीची भेट घेतली. त्याला एक खास गिफ्ट दिले.

ऑरेंज कॅपचा मानकरी

राजस्थान रॉयल्सचा 15 वर्षांचा सलामीवीर वैभव सूर्यवंशी आता ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला आहे. त्याने शुक्रवारी गुवाहाटी येथील बारसापारा स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)विरोधात 78 धावांची तुफान खेळी खेळली. या खेळी दरम्यान त्याची आक्रमक शैली दिसली. त्याने तुफान खेळी केली. राजस्थानचा संघ 202 धावांचा पाठलाग करण्यास उतरल्यावर वैभवने मैदान दणाणून सोडले. त्याची खेळी पाहून अनेकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.

सूर्यवंशीला कोहलीचे खास गिफ्ट

भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूडविरोधात सूर्यवंशीने कोणतीच दयामाया दाखवली नाही. आला चेंडू की तो मैदानाबाहेर टोलवण्याचा सपाटाच त्याने लावला. त्यामुळे दिग्गज गोलंदाज घामाघूम झाले. हे गोलंदाजच एकावेळी दबावाखाली आल्याचे दिसले. पॉवरप्ले दरम्यान सूर्यवंशीने त्याने गोलंदाजांची दाणादाण उडवली. कोहलीने सुद्धा त्याच्या या खेळीची स्तुती केली. सामना संपल्यानंतर सूर्यवंशीने विराट कोहलीची स्वाक्षरी घेतली. कोहलीने सूर्यवंशीच्या राजस्थान रॉयल्सच्या कॅपवर ऑटोग्राफ दिला. RCB विरोधात त्याच्या खेळीचे कोहलीने कौतुक केले. त्याने स्वाक्षरी करताना एक संदेश ही दिला. त्याने त्या टोपीवर, ‘डिअर वैभव, खूप छान’ असे लिहिले. या कौतुकाने वैभवला आकाश ठेंगणे झाले.

डिअर वैभव, खूप जबरदस्त

कोहलीचा ऑटोग्राफ आणि त्याचा संदेश सूर्यवंशीसाठी बहुमोल ठरला. एकावेळी 202 धावांचा डोंगर पार करणे राजस्थान रॉयल्ससाठी अशक्य वाटत होते. पण सूर्यवंशीच्या स्फोटक खेळीने RCB ची लय पूर्णपणे बिघडवून टाकली. पण रियान पराग या कर्णधाराच्या मार्गदर्शनाखाली संघाने 12 चेंडू उरलेले असताना 6 गाडी राखत दमदार विजय मिळवला.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...