AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?

Vaibhav Suryavanshi Bat: वैभव सूर्यवंशीची बॅट आज RCB विरुद्ध काय कमाल दाखवते याची त्याच्या चाहत्यांनाच नाही तर क्रिकेट जगताला मोठी उत्सुकता लागली आहे. त्याच्या स्फोटक खेळीची जोरदार चर्चा सुरू असतानाच त्याच्या बॅटवर अनेकांचा डोळा असल्याचे समोर आले आहे. कोणत्या कंपनीची आहे ही बॅट, किती आहे तिचे वजन?

GK: कोणती बॅट वापरतो Vaibhav Suryavanshi? किती आहे वजन? त्याच्या बॅटमध्ये खरंच जादूची पुडी?
वैभव सूर्यवंशीची बॅटImage Credit source: एजन्सी
| Updated on: Apr 10, 2026 | 4:02 PM
Share

Vaibhav Suryavanshi Bat: वैभव सूर्यवंशीने आयपीएलच्या तीनही सामन्यात स्फोटक फलंदाजी केली आहे. आज राजस्थान रॉयल्सचा RCB विरुद्ध सामना आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशी काय कमाल दाखवते याची उत्सुकता आहे. त्याच्या शतकाकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. चेन्नई सुपर किंग्सविरोधात त्याने 17 चेंडूत 52 धावा ठोकल्या. गुजरात टायटन्सविरोधात त्याने 18 चेंडूत 31 आणि मुंबई इंडियन्सविरोधात 14 चेंडूत 39 धावा केल्या आहेत. पण त्याला अजून शतकी खेळी खेळता आलेली नाही. दरम्यान त्याच्या बॅटवर अनेकांचा डोळा असल्याचे समोर येत आहे. त्याच्या फलंदाजीसोबत त्याच्या बॅटचीही चर्चा रंगली आहे. तो कोणत्या कंपनीची बॅट वापरतो. तिचे वजन किती असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत. काय आहे त्याचे उत्तर?

कोणत्या कंपनीची वापरतो बॅट, किती आहे वजन?

वैभव सूर्यवंशीला त्याचे कोच मनीष ओझा यांनी क्रिकेटची ए, बी, सी, डी शिकवली. त्यांनी गेल्या वर्षी टीव्ही 9 नेटवर्कला खास मुलाखत दिली होती. त्यात त्यांनी वैभव सूर्यवंशी विषयीची माहिती दिली. त्यासोबतच त्यांनी वैभव सूर्यवंशी कोणती बॅट वापरतो याची माहिती दिली. वैभव हा SS कंपनीची बॅट वापरतो. ही कंपनी लोकप्रिय आणि प्रसिद्ध आहे. वैभवच्या बॅटचे वजन हे 1120 ग्रॅम ते 1150 ग्रॅम दरम्यान असल्याची माहिती त्यांनी दिली. एका फलंदाजासाठी बॅटचे वजन अत्यंत महत्त्वाचे असते. त्यामुळे तो कसदार आणि झोकदार, पल्लेदार फटका मारू शकतो. तर बॅट अशी निवडावी लागते की त्यामुळे कोणतीही इजा होऊ नये.

एका वेळी किती बॅट नेतो सोबत

तर प्रत्येक फलंदाज हा काही एक अथवा दोन बॅट घेऊन कोणताही सामना खेळायला जात नाही, हे जागतिक सत्य आहे. कोणताही फलंदाज कोणत्याही दौऱ्यावर असला तरी तो अधिक बॅट सोबत ठेवतोच. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणारे अनेक फलंदाज हे त्यांच्यासोबत साधारणपणे 10-12 बॅट सोबत ठेवतात. त्यामुळे एक आत्मविश्वासही असतो. तर एखाद्या सामन्यात बॅटचा जम बसला नाही तर दुसर्‍या सामन्यात फलंदाज बॅट आणि शैली बदलतो. अथवा एकाच सामन्यात तो त्याच्या शैलीनुसार त्याची दुसरी बॅट निवडतो. वैभव सूर्यवंशी सध्या 15 वर्षांचा आहे, एका माहितीनुसार तो त्याच्यासोबत 14 ते 15 बॅट ठेवतो. त्यामागील त्याचा तर्क काहीही असू द्या. पण त्याच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडतो हे नक्की. काल परवाच्या मॅचमध्ये दिग्गज खेळाडू हार्दिक पंड्याला त्याची बॅट पाहण्याचा मोह आवरला नाही.  त्याच्या बॅटमध्ये कोणतीही जादूची पुडी नाही. तर त्याच्या स्फोटक खेळीमुळे तो धावांचा डोंगर उभारतो.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...