Virat Kohli: रहाणे-पुजाराचं भविष्य काय? या प्रश्नावर विराटने दिलं असं उत्तर….

यापुढे दोघांना संधी मिळण्याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काल विराट कोहलीला रहाणे आणि पुजाराच्या भारतीय संघातील भवितव्यादबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

Virat  Kohli: रहाणे-पुजाराचं भविष्य काय? या प्रश्नावर विराटने दिलं असं उत्तर....

केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत (South Africa Test series) भारताचा 2-1 ने पराभव झाला. या पराभवासाठी वेगवेगळी कारण असली, तरी अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) आणि चेतेश्वर पुजाराचं (cheteshwar pujara) अपयश प्रामुख्याने समोर दिसतय. दोघांनी या संपूर्ण मालिकेत एका अर्धशतकाव्यतिरिक्त विशेष चमक दाखवली नाही. दक्षिण आफ्रिका दौऱ्याच्या आधीपासून त्यांचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता. मालिकेत मोक्याच्याक्षणी संघाला गरज असताना दोघे बाद झाले. सोशल मीडियावर अजूनही दोघांना ट्रोल केलं जातय.

काय म्हणाला विराट?
यापुढे दोघांना संधी मिळण्याबद्दल विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. काल विराट कोहलीला रहाणे आणि पुजाराच्या भारतीय संघातील भवितव्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांच्या भविष्याबद्दल चर्चा करणं, हे माझं काम नाही असं उत्तर त्याने दिलं. मागच्या काही वर्षात भारतासाठी त्यांनी जी कामगिरी केलीय, त्याबद्दल त्यांची पाठराखण केल्याचे विराटने सांगितले.

तेव्हाही हाच प्रश्न होता
न्यूलँडसच्या मैदानावर झालेल्या पराभवानंतर विराट पत्रकार परिषदेत बोलत होता. सेंच्युरियनमधील विजयानंतर फलंदाजी चांगली झाली नाही, हे विराटने मान्य केलं. पण म्हणून रहाणे आणि पुजाराच्या भविष्याबाबत मी वक्तव्य करणं योग्य नाही, असही विराट म्हणाला. दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होण्याआधी रहाणे-पुजाराच्या संघातील स्थानाबद्दल प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. रहाणेला उपकर्णधारपदावरुनही काढून टाकण्यात आलं होतं. पण परदेशातील वातावरणाचा विचार करुन संघ व्यवस्थापनाने दोघांना पाठिंबा दिला.

मी पळत नाहीय
“आम्हाला बॅटने चांगली फलंदाजी करायला पाहिजे होती. या प्रश्नाला उत्तर देण्यापासून मी पळत नाहीय. मी इथे बसून भविष्यात काय घडणार? ते सांगू शकत नाही. मी इथे बसून त्या बद्दल चर्चा करु शकल नाही. तुम्हाला निवड समितीशी बोलाव लागेल. त्यांच्या मनात काय आहे, हे माझं काम नाही” असे विराटने स्पष्ट शब्दात सांगितलं.

(Virat Kohli refrains from discussing Pujara, Rahane future after Test series loss in South Africa)

Published On - 3:07 pm, Sat, 15 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI