मोठी बातमी : टीम इंडियात मोठ्या घडामोडी, विराट कोहली कर्णधारपद सोडणार : रिपोर्ट

विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा BCCI कडून मिळाला नाही.

मोठी बातमी : टीम इंडियात मोठ्या घडामोडी, विराट कोहली कर्णधारपद सोडणार : रिपोर्ट
Rohit Sharma_Virat Kohli
Follow us
| Updated on: Sep 13, 2021 | 9:15 AM

मुंबई : टी ट्वेण्टी वर्ल्ड कप (T20 World Cup) तोंडावर आला असताना, टीम इंडियात मोठ्या घडामोडी घडण्याचे संकेत आहेत. कारण नव्या रिपोर्टनुसार विराट कोहली (Virat Kohli) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोडणार असल्याचं म्हटलं आहे. विराट कोहलीऐवजी आता रोहित शर्माकडे (Rohit Sharma) वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोपवण्यात येईल, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त दिलं आहे. मात्र याबाबत अधिकृत दुजोरा BCCI कडून मिळाला नाही. सध्या या प्राथमिक चर्चा असल्याचं सांगण्यात येत आहे. आगामी T20 विश्वचषकानंतर हे फेरबदल होण्याची शक्यता आहे.

टाईम्सच्या रिपोर्टनुसार, विराटच्या जागी रोहितला वन डे आणि T20 चं कर्णधार करण्याची घोषणा होऊ शकते. रोहितला ज्या ज्या वेळी संधी मिळाली, त्या त्या वेळी त्याने आपलं नेतृत्त्व सिद्ध केलं. IPL मध्येही (IPL 2021) त्याने आपल्या नेतृत्त्वाची चुणूक दाखवली होती. IPL मध्ये सर्वाधिक जेतेपदं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सच्या (Mumbai Indians) नावावर आहे.

विराट कोहली स्वत: घोषणा करणार?

BCCI सूत्रांच्या माहितीनुसार, विराट कोहली T20 विश्वचषकानंतर स्वत: कर्णधारपद सोडण्याची घोषणा करु शकतो. आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी तो हा निर्णय घेऊ शकतो. विराट कोहली सध्या क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं कर्णधारपद भूषवतो. मात्र आता नेतृत्त्वाची धुरा रोहित शर्मासोबत ‘शेअर’ करण्याचा निर्णय विराटने घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

यापूर्वी InsideSport.co या वेबसाईटने भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावेळी एक वृत्त दिलं होतं. त्यावेळी त्यांनी विराट कोहली हा रोहित शर्मासाठी वन डे आणि T20 चं कर्णधारपद सोडू शकतो असं म्हटलं होतं. आता ते वृत्त खरं ठरण्याची शक्यता आहे.

नव्या रिपोर्टनुसार, कोहली आणि टीम मॅनेजमेंटने मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये कर्णधारपदाची धुरा रोहित शर्माकडे सोपवण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे.

विराट कोहलीने BCCI ला कळवलं?

दरम्यान, विराट कोहलीने आपला निर्णय BCCI ला कळवल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे रोहित शर्मालाही पूर्वकल्पना देण्यात आली आहे.

कोहलीचं करिअर

विराट कोहलीने भारताकडून 65 कसोटी, 95 वन डे आणि 45 टी 20 सामन्यात कर्णधारपद भूषवलं आहे. यापैकी 38 कसोटींमध्ये विजय मिळवला, 65 वन डे जिंकले, तर 29 टी 20 सामने आपल्या नावे केले.

रोहित शर्मा

टीम इंडियाचा स्फोटक सलामीवीर अशी रोहित शर्माची ओळख आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये जबरदस्त कॅप्टन्सी करुन, मुंबई इंडियन्सला सर्वाधिक 5 विजेतेपदं मिळवून दिली आहेत.

रोहित शर्मा भारताकडून 43 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये एका द्विशतकासह 8 शतकं आणि 14 अर्धशतकं त्याने ठोकली आहेत. तर रोहित शर्माने 227 वन डे सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 29 शतकं आणि 43 अर्धशतकं झळकावली आहेत. 3 द्विशतकं ठोकणारा रोहित हा एकमेव आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू आहे.

टी 20 वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ

भारत (India): विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, सूर्यकुमार यादव, इशान किशन, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत, रवींद्र जाडेजा, राहुल चाहर, वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी, अक्षर पटेल, आर अश्विन | राखीव: श्रेयस अय्यर, दीपक चाहर आणि शार्दुल ठाकूर

टी 20 विश्वचषक

क्रिकेट जगतातील सर्वात मनोरंजनात्मक स्पर्धा असणारा टी-20 विश्वचषक 17 ऑक्टोबर ते 14 नोव्हेंबर दरम्यान यूएईमध्ये होणार आहे. आता स्पर्धेला काही काळच शिल्लक राहिल्याने जगभरातील देश संघ बांधणीमध्ये व्यस्त आहेत. जवळपास सर्वच देशांनी आपले अंतिम खेळाडू जाहीर केले आहेत.

भारताचे विश्वचषकातील सामने

भारत आणि पाकिस्तान या दोघांसह ग्रुप-2 मध्ये न्यूझीलंड आणि अफगानिस्तान हे संघही आहेत. तसेच ग्रुप स्टेजमधून पात्र होणारे दोन संघही याच ग्रुपमध्ये येणार असून या सर्वांच्या सामन्याला 24 ऑक्टोबरपासून सुरुवात होईल. दरम्यान भारताचे ग्रुपमधील सामने पुढीलप्रमाणे-

  • भारत विरुद्ध पाकिस्तान (24 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध न्यूझीलंड (31 ऑक्टोबर)
  • भारत विरुद्ध अफगाणिस्तान (3 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 1 (5 नोव्हेंबर)
  • भारत विरुद्ध ग्रुप स्टेजमधील पात्र संघ 2(8 नोव्हेंबर)

संबंधित बातम्या  

T20 world Cup 2021 साठी भारतापासून ऑस्ट्रेलियापर्यंत सर्वांचे संघ जाहीर, पाहा कोणते खेळाडू खेळणार एका क्लिकवर

T20 world Cup 2021: शिखरच्या गैरहजेरीत रोहित बरोबर सलामीला कोण?, विराट नाही तर ‘या’ खेळाडूवर जबाबदारी

T 20 World Cup : टी 20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा, अश्विनला संधी, शार्दूल ठाकूर रिजर्वमध्ये, धोनी मेंटरच्या भूमिकेत

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.