AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली पुन्हा जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर! टेस्ट सीरिजबाबत आश्चर्यकारक दावा

भारत ऑस्ट्रेलिया बॉर्डर गावस्कर कसोटी मालिका नुकतीच संपली आहे. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा 3-1 ने धुव्वा उडवला. या मालिकेत रोहित शर्मासह विराट कोहलीही फेल गेला. पण आता विराट कोहलीबाबत रवि शास्त्री यांनी आश्चर्यकारक दावा केला आहे.

विराट कोहली पुन्हा जाणार ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर! टेस्ट सीरिजबाबत आश्चर्यकारक दावा
| Updated on: Jan 08, 2025 | 5:43 PM
Share

बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत विराट कोहलीची बॅट हवी तशी चालली नाही. त्यामुळे टीम इंडियाला मोठा पराभवाच्या रुपाने मोठा फटका बसला. पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलं खरं पण त्यानंतर लय कायम ठेवण्यात अपयशी ठरला. असं असताना विराट कोहलीचं कसोटी करिअर संपलं असा दावा करण्यात येत आहे. पण टीम इंडियाचे माजी प्रशिक्षक रवि शास्त्री यांनी एक आश्चर्यकारक दावा केला आहे. रवि शास्त्री यांनी कोड स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘माझ्या मनात कोणतं किंतू परंतु नाही, विराट कोहली पुन्हा एकदा ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी खेळायला येईल.’ इतकंच काय तर रवि शास्त्री यांनी छाती ठोकून सांगितलं की, ‘माझे शब्द लिहून घ्या. विराट कोहली ऑस्ट्रेलियात पुन्हा कसोटी मालिका खेळायला आला तर मला कोणतंच आश्चर्य वाटणार नाही.’ रवि शास्त्री यांच्या दाव्यामुळे विराट कोहली आणखी काही वर्षे क्रिकेट खेळेल असं दिसत आहे. ऑस्ट्रेलियात फेल गेला असला तरी विराट कोहलीने माघार घेतलेली नाही.

रवि शास्त्री यांच्या दाव्यानुसार, ‘विराट कोहली इंग्लंड दौऱ्यावरही जाण्याची शक्यता आहे.’ विराट कोहलीचं वय आता 36 असून 40 वर्षांपर्यंत असं म्हणावं लागेल. कारण पुढच्या दोन वर्षात टीम इंडिया ऑस्ट्रेलियात जाणार नाही. उलट ऑस्ट्रेलिया भारतात कसोटी मालिका खेळण्यासाठी येणार आहे. असं सांगताना रवि शास्त्री यांनी त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला आहे. फॉर्मात परतण्यासठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, असंही त्यांनी पुढे सांगितलं. विराट कोहली मागच्या 13 वर्षांपासून रणजी खेळलेला नाही. त्याने 2012 मध्ये दिल्लीसाठी शेवटचा फर्स्ट क्लास सामना खेळला होता. त्यामुळे रवि शास्त्री यांचा दावा पाहता विराटला अजून चार वर्षे क्रिकेट खेळावं लागले. त्यामुळे असं शक्य नसल्याचं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.

विराट कोहलीने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात सर्वात खराब कामगिरी केली. त्ायने 23.75 च्या सरासरीने 190 धावा केल्या. यात पर्थ कसोटीतील शतकाचा समावेस आहे. त्यानंतर उर्वरित चार कसोटीत त्याने 90 धावा केल्या. विराट कोहली या मालिकेत ऑफ स्टंपबाहेरील चेंडू खेळताना वारंवार बाद झाला आहे.

Follow Us
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.