AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

KL राहुलच्या टीकाकारांना विराट कोहलीचं गाण्यातून प्रत्युत्तर, कोणतं गाणं म्हटला विराट?

के.एल. राहुलच्या टीकाकारांना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने गाण्याच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. लोग कहेंगे, लोगों का कहेना काम हैं, असं म्हणत त्याने के.एल. राहुलसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. | virat kohli

KL राहुलच्या टीकाकारांना विराट कोहलीचं गाण्यातून प्रत्युत्तर, कोणतं गाणं म्हटला विराट?
विराट कोहली
| Updated on: Mar 23, 2021 | 10:38 AM
Share

पुणे :  भारताने पाहुण्या इंग्लंडला 5 टी ट्वेन्टी (india Vs england T20) सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने हरवलं. परंतु या मालिकेत धडाकेबाज फलंदाज के.एल. राहुलच्या (KL Rahul) बॅटचा जलवा काही दिसला नाही. या मालिकेत त्याचा फ्लॉप परफॉरमन्स पाहायला मिळाला. त्याच्या बॅटिंगवर अनेक दिग्गजांनी तसंच क्रिकेट रसिकांनीही टीका केली. याच टीकाकारांना भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने (Virat kohli) गाण्याच्या माध्यमातून उत्तर दिलं आहे. लोग कहेंगे, लोगों का कहेना काम हैं, असं म्हणत त्याने के.एल. राहुलसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. (India Vs England Virat kolhi on KL Rahul Critics kuch to Long kahenge Logon ka kaam hai Kehna)

खेळाडूच्या वाईट काळात त्याला साथ द्यायला हवी

जेव्हा एखादा फलंदाज आऊट ऑफ फॉर्म असतो तेव्हा त्याच्यावर अनेक जण टीका करत असतात. त्याची मजा घेत असतात. पण अशावेळी लोकांना कसं रिअॅक्ट करायचं हे एक खेळाडू म्हणून आम्हाला माहिती असतं. शेवटी खेळाडूंच्या वाईट काळात त्यांच्यासोबत आपण उभं राहिलं पाहिजे. त्यांना साथ दिली पाहिजे, असं विराट म्हणाला.

के.एल. राहुलसाठी विराटची बॅटिंग, राजेश खन्नांचं कोणतं गाणं विराटला आठवलं…?

के.एल.राहुलसाठी बॅटिंग करताना विराट कोहलीला राजेश खन्ना यांच्या अमर प्रेम चित्रपटातील एका गाण्याची आठवण झाली. खेळाडूंच्या वाईट काळात त्यांना साथ दिली पाहिजे हे सांगताना “कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहेना, बेकार की बातों में कहीं बीत ना जाये रैना…”, या गीताच्या ओळी विराटने गुणगुणल्या.

इंग्लंडविरुद्ध राहुलचा फ्लॉप परफॉरमन्स

इंग्लंडविरुद्धच्या टी ट्वेन्टी मालिकेत राहुलचा फ्लॉप परफॉरमन्स पाहायला मिळाला. 5 पैकी 4 सामन्यांत राहुलला संधी मिळाली. ज्यामध्ये त्याने केवळ 15 रन्स केले. दोन सामन्यांत तर त्याला खाते उघडायला देखील अपयश आले. राहुलला टी 20 मध्ये पहिल्या वेळी असं अपयश आलंय की संपूर्ण टी 20 सिरीज फ्लॉप राहिली.

हे ही वाचा 

Virat Kohli | शतक एक फायदे अनेक, विराटला सेंच्युरी झळकावत अनेक रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

PHOTO | रनमशीन विराट कोहलीची 15 महिन्यांपासून शतकाची पाटी कोरीच

Virat Kohli | कर्णधार विराट कोहली ठरला ‘मॅन ऑफ द सीरिज’चा मानकरी

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.