AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीरेंद्र सेहवागच्या मुलाला दुसऱ्याच सामन्यात बसला फटका, पाच चेंडूतच आर्यवीरचं झालं असं

दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत वीरेंद्र सेहवागचा मुलाने दिल्ली किंग्सकडून पदार्पण केलं. पहिल्या सामन्यात तर चांगली खेळी केली. पण दुसऱ्या सामन्यात तसं काही घडलं नाही. त्यामुळे त्याच्या पदरी निराशा पडली.

वीरेंद्र सेहवागच्या मुलाला दुसऱ्याच सामन्यात बसला फटका, पाच चेंडूतच आर्यवीरचं झालं असं
वीरेंद्र सेहवागच्या मुलाला दुसऱ्याच सामन्यात बसला फटका, पाच चेंडूतच आर्यवीरचं झालं असंImage Credit source: DPL
| Updated on: Aug 29, 2025 | 9:44 PM
Share

दिल्ली प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत आर्यवीर सेहवागने आपल्या वडिलांसारखी सुरुवात केली. दिल्ली किंग्सकडून खेळताना पहिल्या सामन्यात आक्रमक बाणा दाखवला. अवघ्या 17 व्या वर्षीत आर्यवीरने आपल्या फलंदाजीचं कौशल्य दाखवलं होतं. डेब्यू सामन्यात आर्यवीरने 16 चेंडूत 22 धावांची खेळी केली आणि बाद झाला. त्याने वेगवान गोलंदाज नवदीप सैनी सलग दोन चौकार मारले होते. पण दुसऱ्या सामन्यात आर्यवीरच्या पदरी निराशा पडली. क्वालिफायर 1 सामन्यात आर्यवीरला फलंदाजी करताना गंभीर दुखापत झाली. त्यात फलंदाजीतही काही खास करू शकला नाही. दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये 29 ऑगस्टला पहिला क्वॉलिफायर सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्ली किंग्स आणि ईस्ट दिल्ली रायडर्स आमनेसामने आले होते. आर्यवीरने पदार्पणाचा सामनाही याच संघासोबत खेळला होता. त्यामुळे दुसऱ्या सामन्यातही त्यांच्याशीच सामना झाला हा निव्वळ योगायोग ठरला.

ईस्ट दिल्ली रायडर्सने फक्त 89 धावांचं आव्हान दिलं होतं. त्यामुळे छोटसं लक्ष्य गाठण्यासाठी आर्यवीर मैदानात उतरला होता. पण यावेळी सामन्यात ट्वीस्ट पाहायला मिळाल. दुसऱ्या सामन्यात नवदीप सैनीने त्याला काही सेट होऊ दिलं नाही. मागच्या सामन्यात नवदीपला दोन चौकार मारले होते. पण आता तसं झालं नाही. नवदीपचा वेगवान चेंडू सरळ आर्यवीरच्या ग्रोइन भागाला लागला. यामुळे तो वेदनेने कळवला आणि थेट जमिनीवर झोपला. त्यानंतर सेंट्रल दिल्ली किंग्सचे फिजिओ आले आणि त्यांनी त्याची तपासणी केली. त्यानंतर खेळण्यासाठी सज्ज झाला. पण त्याचा परिणाम आर्यवीरवर दिसून आला. पुढच्या षटकात राहुल राठीने त्याला क्लिन बोल्ड केले. पाच चेंडूंचा सामना करत 1 धाव करून तंबूत परतला. सेंट्रल दिल्ली किंग्सने हा सामना जिंकला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. ईस्ट दिल्ली रायडर्सने दिलेलं 90 धावांचं लक्ष्य चार गडी गमवून 11.3 षटकात पूर्ण केलं. दिल्ली किंग्सकडून जॉन्टी सिधूने 26 आणि आदित्य भंडारीने 33 धावांची खेळी केली.

दोन्ही संघाची प्लेइंग 11

ईस्ट दिल्ली रायडर्स (प्लेइंग इलेव्हन): सुजल सिंग, अर्पित राणा, हार्दिक शर्मा, अनुज रावत (विकेटकीपर/कर्णधार), मयंक रावत, रोहन राठी, रौनक वाघेला, नवदीप सैनी, अखिल चौधरी, आशिष मीना, वैभव बैसला.

सेंट्रल दिल्ली किंग्स (प्लेइंग इलेव्हन): आर्यवीर सेहवाग, कौशल सुमन (विकेटकीपर), युगल सैनी, जॉन्टी सिद्धू (कर्णधार), जसवीर सेहरावत, आदित्य भंडारी, सिमरजीत सिंग, तेजस बरोका, मनी ग्रेवाल, गेविंश खुराना, अरुण पुंडीर

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.