AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीरेंद्र सेहवागची पत्नी BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास यांना करतेय डेट? सोशल मीडियावरील चर्चेने वादळ

rumor created a stir on social media : समाज माध्यमांवर सध्या एक अफवा वाऱ्याच्या वेगाने पसरली आहे. वीरेंद्र सेहवाग यांच्या वैयक्तिक आयुष्यात यामुळे वादळ उठल्याचा दावा करण्यात आला आहे. काय आहे तो दावा, ज्याची सर्वत्र होत आहे चर्चा?

वीरेंद्र सेहवागची पत्नी BCCI अध्यक्ष मिथुन मन्हास यांना करतेय डेट? सोशल मीडियावरील चर्चेने वादळ
वीरुच्या आयुष्यात वादळ?
| Updated on: Oct 12, 2025 | 10:24 AM
Share

भारतीय क्रिकेट संघाटा ऑलराऊंडर वीरेंद्र सेहवाग सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. वैयक्तिक आयुष्याच्या धावपट्टीवर तो अडखळत असल्याचे दिसते. वीरेंद्र सेहवाग याची पत्नी आरती अहलवात आणि बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांच्यात अफेअर सुरू झाल्याच्या चर्चेने सोशल मीडियात खळबळ उडाली आहे. अर्थात अद्याप तरी ही अफवाच असल्याचे दिसते. कारण याविषयीचा कोणताही सबळ पुरावा अद्याप समोर आलेला नाही.

वीरेंद्र सेहवाग आणि मिथुन मन्हास जुने मित्र

मिथुन मन्हास आणि वीरेंद्र सहवाग हे तसे बालपणापासूनचे मित्र आहेत. मन्हास हे नुकतेच बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आहे. त्यानंतर त्यांचे नाव आरती अहलावत यांच्याशी जोडण्यात येत आहे. 2025 मध्ये रोजर बिन्नी यांनी राजीनामा दिल्यानंतर मिथुन मन्हास यांची निवड झाली. एका पत्रकाराने त्याच्या सोशल मीडियावर 7 ऑक्टोबर 2025 रोजी एक पोस्ट शेअर केली. तेव्हापासून आरती आणि मिथुन यांच्याविषयीची अफवा वाढल्या. क्रिकेटर मुरली विजय आणि दिनेश कार्तिक यांच्या नात्यात असा त्रिकोण तयार झाला होता, याची आठवण या पत्रकाराने करून दिली. त्यानंतर वीरेंद्र सेहवागच्या आयुष्यात वादळ आल्याचा दावा करण्यात येत आहे. अर्थात सध्या तरी ही अफवाच असल्याचे समोर येत आहे.

दोघांच्या आयुष्यात तणाव

वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचे लग्न 2004 मध्ये झाले होते. या जोडप्याला दोन मुलं आहेत. 2007 मध्ये सेहवागला पहिला मुलगा झाला. तर 2010 मध्ये त्यांना दुसरा मुलगा झाला. 20 वर्षाच्या सुखी संसाराला अचानक गालबोट लागले आणि वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर या नवीन अफवेने मोठे वादळ आणले आहे.

जुने फोटो व्हायरल

जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने अफवा वाढल्या आहेत. वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांची दोन्ही मुलं सोशल मीडियावर मिथुन मन्हास यांना फॉलो करतात. याशिवाय 2021 मधील आरती आणि मिथुन मन्हास एका फोटोत एकत्र दिसत आहे. हाच फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यातूनच दोघांच्या संबंधाची अफवा पसरवण्यात येत आहे. याविषयी सेहवाग, आरती अथवा मिथुन यांनी कोणतेही अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.