वीरेंद्र सेहवागने ICC आणि टीम इंडियालाही सोडलं नाही, ट्विट करुन म्हणाला…

इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. (Virendra Sehwag dig ICC team India WTC Final 2021)

वीरेंद्र सेहवागने ICC आणि टीम इंडियालाही सोडलं नाही, ट्विट करुन म्हणाला...
वीरेंद्र सेहवाग
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 2:40 PM

मुंबई : इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात (ICC WTC Final) पहिल्या दिवशीपासून हवामान खराब असल्यामुळे पूर्ण ओव्हर खेळवल्या गेलेल्या नाहीत. सामन्याचे 4 दिवस झाले असले तरी अजून केवळ 141.1 ओव्हरचाच खेळ पार पडला आहे. त्यामुळे महामुकाबल्याचा महाविजेता कसा ठरणार हा सर्वांसमोर प्रश्न आहे. इतका महत्त्वाचा सामना असताना हवामानाकरिता बेभरवशी असलेल्या इंग्लंडच्या भूमीत हा सामना का खेळवला गेला, असा प्रश्न आता सोशल मीडियावर अनेक नेटकरी विचारत आहेत. इंग्लंडचा माजी खेळाडू केवीन पीटरसन याने तर आयसीसीवर कडाडून टीका केली. आता याच्यात भर पडलीय. भारताचा धडाकेबाज खेळाडू वीरेंद्र सेहवागची…! (Virendra Sehwag dig ICC team India WTC Final 2021)

वीरेंद्र सेहवागने एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्याने पहिल्या डावांत निराशाजनक कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाचा समाचार घेतला आहे आणि याच ट्विटमधून त्याने आयसीसीवरही टीका केली आहे. ‘बॅट्समन को भी टाईम नही मिला ढंग से…. और आयसीसी को भी…!’, असं ट्विट करत त्याने एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

पाऊस, कमी सूर्यप्रकाश आणि हवामानाचे अडथळे!

इंग्लंडच्या साऊदम्पटन येथील मैदानात सुरु असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशीपासून पाऊस, कमी सूर्यप्रकाश अशा हवामानासंबधी बाबींचा अडथळा समोर येत आहे. पहिल्या आणि चौथ्या दिवशीचा तर संपूर्ण खेळच पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे सर्वच क्रिकेट रसिकांचा हिरमोड झाला. त्यात आता पाचव्या दिवशी खेळ होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

सामन्यावर किंवींची पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यावर (WTC Final 2021) न्यूझीलंडने मजबूत पकड मिळवली आहे. सामन्याचा तिसरा दिवस पूर्णपणे किवी खेळाडूंनी गाजवला होता. आधी गोलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी भारताचा संघ 217 धावांत गारद केला. त्यानंतर फलंदाजांनी भारताचा गोलंदाजांना जेरीस आणलं. तिसऱ्या दिवसअखेर न्यूझीलंडने 2 बाद 101 धावांपर्यंत मजल मारली आहे. भारताकडे सध्या 116 धावांची आघाडी शिल्लक आहे. परंतु भारताला 49 षटकांमध्ये केवळ दोनच बळी मिळवता आल्याने सामन्यात सध्यातरी न्यूझीलंड सरस आहे.

रिजर्व्ह डे बाबत आयसीसीकडून महत्त्वाची माहिती

सामन्यात कोणताही व्यत्यय आल्यास आयसीसीने सामना सुरु होण्याआधीच 23 जून हा दिवस राखीव ठेवला होता. दरम्यान सध्याची परिस्थिती पाहता राखीव दिवशी खेळ खेळवावा लागणार असल्याने या दिवशीच्या तिकीट आणि प्रवेशांबाबत आयसीसीने महत्त्वाची माहिती दिली आहे. आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटलं की, ‘सहाव्या दिवशी खेळवल्या जाणाऱ्या खेळाच्या तिकीटांचे दर कमी केले जाणार आहेत. तसेच ब्रिटनमध्ये होणाऱ्या सामन्यांची ही स्टँडर्ड प्रैक्टिस असल्याने केवळ ब्रिटनच्या नागरिकांनाच सामन्याला येण्याची परवानगी दिली जाईल.’

Virendra Sehwag dig ICC team India WTC Final 2021

हे ही वाचा :

WTC Final Weather Update : पाचव्या दिवशी खेळ होणार की नाही? साऊदम्पटनमधील हवामानाचे ताजे फोटो समोर

ICC WTC Final : 196 ओव्हर ठरवणार विजेता, जाणून घ्या कोणता संघ होणार विजयी

धोनीचा नवा लुक चर्चेत, मिशीची धांसू स्टाईल, शिमल्यात घेतोय सुट्टीचा आनंद

Non Stop LIVE Update
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि...
ईव्हीएम मशीनबद्दल कोर्टानं काय सांगितलं? याचिकाकर्त्यांना झापलं आणि....
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.