WCL 2024: इरफान-युसूफ पठाण बंधुची विस्फोटक बॅटिंग, कांगारुंना 255 धावांचं आव्हान
Australia Champions vs India Champions 2nd Semi Final: रॉबिन उथप्पा, कॅप्टन युवराज सिंह आणि पठाण बंधूनी विस्फोटक फलंदाजी करत इंडिया चॅम्पियन्सला 250 पार पोहचवलं आहे.

कॅप्टन युवराज सिंह-रॉबिन उथप्पा या दोघांची अर्धशतकी खेळी आणि पठाण बंधुनी केलेल्या विस्फोटक फलंदाजीच्या जोरावर इंडिया चॅम्पियन्स टीमने वर्ल्ड चॅम्पियनशीप ऑफ लिजेंड्स स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 255 धावांचं आव्हान दिलं आहे. इंडिया चॅम्पियन्सने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 254 धावा केल्या. टीम इंडियाकडून रॉबिन उथप्पा, युवराज सिंह, इरफान पठाण आणि युसूफ पठाण या चौघांनी अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाच्या फलंदाजांनी त्यांची भूमिका चोखपणे पार पडली. त्यानंतर आता टीम इंडियाच्या गोलंदाजांवर जबाबदारी आहे.
युवराज, रॉबिन आणि पठाण बंधूंनी विस्फोटक बॅटिंग केली. इंडियाकडून रॉबिन उथप्पा याने सर्वाधिक 65 धावांची खेळी केली. उथप्पाने 185.71 च्या स्ट्राईक रेटने 35 बॉलमध्ये 4 फोर आणि 4 सिक्सच्या मदतीने ही खेळी केली. कॅप्टन युवराज सिंहने 28 चेंडूत 210.71 च्या स्ट्राईक रेटने 5 षटकार आणि 4 चौकारांसह 59 धावा केल्या. त्यानंतर पठाण बंधूंनी कांगारुंच्या बॉलिंगच्या चिंधड्या उडवल्या. दोघांनी विस्फोटक खेळी करत वादळी अर्धशतक ठोकलं. इरफान-युसूफने पाचव्या विकेटसाठी 36 बॉलमध्ये 95 धावांची भागीदारी केली. इरफानने 19 बॉलमध्ये 3 चौकार आणि 5 षटकार ठोकले. तर यूसुफ 23 बॉलमध्ये 4 सिक्स आणि तेवढयाच फोरच्या मदतीने 51 रन्सवर नॉट आऊट राहिला. ऑस्ट्रेलियाकडून पीटर सीडलने 4 विकेट्स घेतल्या. तर कुल्टर नाईल आणि झेवियर डोहर्टी या दोघांना 1-1 विकेट मिळाली. आता इंडियाचे गोलंदाज कांगारुंना किती धावांपर्यंत रोखतात? याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
इंडियाच्या चौकडीची विस्फोटक बॅटिंग, कांगारुंना लोळवलं
Onto the bowlers now 💪#INDvAUS #WorldChampionshipOfLegends #OnceAChampionAlwaysAChampion #WCLIndiaChampions pic.twitter.com/4Zxtmo805o
— WCL India Champions (@India_Champions) July 12, 2024
इंडिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन: युवराज सिंग (कॅप्टन), रॉबिन उथप्पा (विकेटकीपर), गुरकीरत सिंग मान, सुरेश रैना, अंबाती रायडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, पवन नेगी, विनय कुमार, हरभजन सिंग आणि धवल कुलकर्णी.
ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्स प्लेइंग ईलेव्हन : ब्रेट ली (कॅप्टन), आरोन फिंच, कॅलम फर्ग्युसन, बेन कटिंग, डॅनियल ख्रिश्चन, टिम पेन (विकेटकीपर), बेन डंक, बेन लॉफलिन, पीटर सिडल, झेवियर डोहर्टी आणि नॅथन कुल्टर-नाईल.
